एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)
चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये
माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये
हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये
ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये
पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
5153
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो मग???
sandy __/\__
In reply to अहो मग??? by चांदणे संदीप
वा वा ! क्या बात है डॉक्टर !
धन्यवाद सरजी __/\__
In reply to वा वा ! क्या बात है डॉक्टर ! by वेल्लाभट
छानच आहे.. पण बांधणी सैल
अगदी. सैल बांधणी असणार्या
In reply to छानच आहे.. पण बांधणी सैल by अत्रुप्त आत्मा
ल्लुल्लुल्लुल्लु
In reply to अगदी. सैल बांधणी असणार्या by सतिश गावडे
जोरदार !
छान आहे कविता. आवडली.
छान आहे, पण वाचल्यावाचल्या
ते सैल बांधणीमुळे झाले असेल.
In reply to छान आहे, पण वाचल्यावाचल्या by सूड
अगदी बरोब्बर हो गा'वडे काका!
In reply to ते सैल बांधणीमुळे झाले असेल. by सतिश गावडे
छान
सुरेख!
मस्तच हो डाॅक्टर!
मस्तं लिहिलय!!
आत्मबंध, सतिश गावडे,शार्दुल
छान जमलीय! आवडली
मस्त मला
वाह्
सुंदर !