मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

gazal

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

गझल mashup : insp. Sajan Bendre dedicated to Sumeet Music

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
जायचेच होते दूर तर केलीस सलगी कशासाठी? वाजवलीस अंगावर शहाऱ्यांची हलगी कशासाठी? शेवटचे बोल मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, नकार देण्याआधी करतेस दिल्लगी कशासाठी? जायचे होते माझ्या लाडीला घेऊन सासरवाडीला, स्वप्नकोंबड्यांवर टाकलीस तू डालगी कशासाठी? फुटक्या तोंडास या, तेरे गली में बघती राठ बाया , दगड व्ह्यायचे सोडून झालीस तू मुलगी कशासाठी? प्रेरणा : https://youtu.be/XfivqjQzu8Y?si=K7ZmBaWFo6e86hDc मूळ थोर लिरिक्ष : बोल मै हलगी बजावू क्या ए माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं कोण कोण नाचणार ?

हवी दाद जर का

नाहिद नालबंद ·
बदललो कधी ना समाजाप्रमाणे सदा वागलो मी मनाच्याप्रमाणे कसा मार्ग चुकला कळेना कुणाला जरी चालले ते गुगलच्याप्रमाणे स्वतःची बनावी इथे खास ओळख कशाला लिहावे कुणाच्याप्रमाणे खरे सांग मित्रा, असा वागला तू कशाला कुणाच्या इशाऱ्याप्रमाणे उगा भावना का दुखाव्या कुणाच्या कला पाहिली जर कलेच्याप्रमाणे लिहाया हवे आणखी चांगले तुज हवी दाद जर का पुण्याच्याप्रमाणे

परखड

नाहिद नालबंद ·
यामुळे वाट्यास माझ्या रोज परवड बोलतो कायम म्हणे मी फार परखड वेळ येता कर्जमाफीची बळीच्या मग तिजोरी शासनाची जाम खडखड एकही नेता गुणी ना भ्रष्ट सारे भाषणे आता तयांची हीन बडबड इंग्रजीला शक्य तितकी टाळतो मी टिकविण्या करतो मराठी हीच धडपड यामुळे हरकत तयांची लेखनाला वापरत नाही कधी मी शब्द जडजड

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला (तरही)

नाहिद नालबंद ·
सानी मिसऱ्याची ओळ क्रांतिताई (क्रांति साडेकर) यांची, तरही साठी ओळीबद्दल आभार, त्यांना न विचारता ही ओळ वापरली त्याबद्दल क्षमस्व!

बघ

नाहिद नालबंद ·
बघ ती सावलीच ठरली वरचढ उन्हावरी बघ माझाच जीव जडला माझ्या व्यथेवरी बघ वारीत पांडुरंगा सावध रहा जरा तू मारेल चोर डल्ला तुझिया विटेवरी बघ म्हणतात जे मराठी चित्रपट अता न चाले नसते पकड जराही त्यांची कथेवरी बघ साहेब जे कधीही दिसले मुळी न मजला होते हजर परंतू कायम पटावरी बघ वाऱ्यामुळे खरेतर पडली कळी उमलती आरोप त्या बिचाऱ्या आला दवावरी बघ करतात यार आग्रह बहुतेक याचसाठी मी बोलतो खरे ते, थोडी पिल्यावरी बघ

पश्चिमाई

कुमार जावडेकर ·
पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन् भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई - कुमार जावडेकर (अलीकडेच 'पश्चिमाई' हा ब्लॉग (त्रैमासिक स्वरूपात) आम्ही यु.के.त सुरू केला. त्याच्या दिवाळी अंकासाठी लिहिलेली ही गझल.) https://pashchimaai.blogspot.com/2024/10/blog-post_18.html

सांज

कुमार जावडेकर ·
अता आर्त हळवी हवा सांज असते स्मृती पाखरांचा थवा सांज असते जरी रात्र असते तुझी दाट छाया छटांचा तुझ्या कारवा सांज असते दिशा क्षितिज संदिग्ध करती पुन्हा अन् पुन्हा जीवनी नाखवा सांज असते जुने तेच ते रंग लेवून परके समारंभ अवघा नवा सांज असते न तू आज येथे न मी आज तेथे अता रोज ही मारवा सांज असते - कुमार जावडेकर

पाहू

नाहिद नालबंद ·
एकदा भेटून पाहू ये पुन्हा बोलून पाहू मागचे विसरुन सारे भूमिका बदलून पाहू क्रोध, मत्सर, मद वगैरे षडरिपू टाळून पाहू पावतो बाप्पा म्हणे हा चल नवस बोलून पाहू बस जरा साथीस 'नाहिद' ही गझल गाऊन पाहू

इलाज नाही

सागरसाथी ·
कविवर्य विंदा करंदीकर यांची माफी मागून...... गर्भात वेदनेच्या रुजवू नकोस काही उसळू दे वेदनांना त्याला इलाज नाही. उसने घेवून बीज पेरु नकोस काही मातीत खोट आहे त्याला इलाज नाही. सद्भाव माणसांचा आणि स्वप्ने सुखाची विषवल्लीनी वेढली त्याला इलाज नाही. बोल ते फुकाचे आणि आदर्श देवाघरचे नजरेत विखार आहे त्याला इलाज नाही. ------- अभय बापट २९/०७/२०२३