मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अरे पाचशे हजार

मधुका · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
(बहिणाबाईंची माफी मागून) अरे पाचशे हजार, जसा खिशावर भार आधी रांगेचे चटके, तेव्हा मिळती शंभर अरे पाचशे हजार, बंद झाला, खोटा नाही, भरा स्वतःच्या खात्यात, काम सोपे, तोटा नाही! अरे पाचशे हजार, नको रडनं कुढनं, येड्या, जरा सोस कळ, फायदा तुझा रांगेनं अरे पाचशे हजार, कर देशाचा विचार देई रोखीला नकार, ई-पैशा तिथे होकार!

वाचन 4547 प्रतिक्रिया 6