दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल.
तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता
स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा
कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे
फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम.
कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का?
(संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको)
धन्यवाद.
वाचने
61935
प्रतिक्रिया
143
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येतोय.
मी येतोय.
जेवण राजधानी सोडून कुठेही चालेल.
राजधानीचं नाव पण नका काढु!
In reply to मी येतोय. by प्रचेतस
राजधानीचं नाव पण नका काढु!
अगदी अगदी.
In reply to राजधानीचं नाव पण नका काढु! by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी.
आपटे प्र्शालेच्या समोरचा
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
डायनींग हॉल चांगला आहे आशापुरी की काय नावानी.
अनुभवी जाणकारांनीच (फक्त) खुलासा टाकावा.
ह्यात गुर्जी जाणकार म्हणत
In reply to आपटे प्र्शालेच्या समोरचा by नाखु
ह्यात गुर्जी जाणकार म्हणत असाल तर त्यांची खाण्याची ठिकाणं गंडलेली असतात असा आण्भव आहे. उदा. मामा मिसळ :)
धाग्यावर
In reply to ह्यात गुर्जी जाणकार म्हणत by प्रचेतस
गुर्जी आमंत्रण द्यायची पद्धत आवडली आहे.
भेटुतिथे़कट्टाकरूचट्टामट्टाफेम्यमकेगुरुजींच्याफॅनसंघाकडून खुलासा
मामा मिसळ
In reply to ह्यात गुर्जी जाणकार म्हणत by प्रचेतस
मंगला टॉकिजबाहेरची?
हो हो. तीच ती.
In reply to मामा मिसळ by अनुप ढेरे
हो हो. तीच ती.
तो आशा डायनिंग हॉल. रविवार
In reply to आपटे प्र्शालेच्या समोरचा by नाखु
तो आशा डायनिंग हॉल. रविवार असल्याने मेन्यु खालीलप्रमाणे असेलः
१. बटाट्याची भाजी
२. अळुचे फदफडे
३. छोले
४. कढी
५. वरण भात
६. पापड, चटणी, कोशिंबीर आणि केळ्याचे रायते.
जेवण गरमागरम वाढतात. टेस्ट चांगली आहे. स्वच्छ आहे. खाणावळीचा फील आहे (पाठीला पाठ लावुन नाही बसायला लागत). जेवण घरगुती असते. प्रचंड अपेक्षा ठेवुन जाऊ नका.
कट्ट्ञाला शुभेच्छा.
बाहेर घरगुती जेवायला कशाला
In reply to तो आशा डायनिंग हॉल. रविवार by मृत्युन्जय
बाहेर घरगुती जेवायला कशाला जायचं =)) ते तर घरी पण मिळतं. बाहेर बाहेरचं हादडायला जायचय.
सार?
In reply to तो आशा डायनिंग हॉल. रविवार by मृत्युन्जय
रविवारी सार देत नाहीत का? ईतर दिवशी असतं म्हणून विचारलं
अरे वा वा!
प्रथेनुसार तिसर्या धाग्यात कट्टा फायनल झाला! शुभेच्छा! कट्ट्याला फोनवरून हजेरी लावण्यात येईल. माझ्या नावाने दोन दोन घास जास्त खावा!
त्यापेक्षा प्रत्यक्ष आलात तर
In reply to अरे वा वा! by पैसा
त्यापेक्षा प्रत्यक्ष आलात तर जास्तं बरं वाटेल. कट्ट्यानंतर प्रसिद्ध अमृततुल्यामधे पाहिजे तेवढा चहा पाजु. सूडक्या काय म्हणतोस रे ह्याच्यावर?
तू दोन आख्खे घास खातेस? !!!!!
In reply to अरे वा वा! by पैसा
तू दोन आख्खे घास खातेस? !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हो
In reply to तू दोन आख्खे घास खातेस? !!!!! by बिपिन कार्यकर्ते
नायतर हे लोक माझ्या नावाने कावळ्याला खाऊ घालतील!
वेळः रविवारी पहाटे ११.००
वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता?
चय महाराजा
In reply to वेळः रविवारी पहाटे ११.०० by मांत्रिक
रवीवारी पहाट दहा ते १२ च्या दरम्यान सुरू होते अशी एक वंदता आहे.
खुलासेदार नाखु
वंदता की वदंता?
In reply to चय महाराजा by नाखु
वंदता की वदंता?
,
एंटी वैय्याकरणी अभ्या
जो जे
In reply to वंदता की वदंता? by अभ्या..
जो जे वाचील तो ते पाहो प्राणी जात !
ज्ञानीयांचा रेडा नाखु.
कट्टयाला शुभेच्छा.मजा करालच.
कट्टयाला शुभेच्छा.मजा करालच.
सुकांता बघा बरे जमतयं का ते..
सुकांता बघा बरे जमतयं का ते...
ब्येष्टच. येणार आहेस काय?
In reply to सुकांता बघा बरे जमतयं का ते.. by द-बाहुबली
ब्येष्टच.
येणार आहेस काय?
हो ना म्हणता कट्ट्याची वेळ
हो ना म्हणता कट्ट्याची वेळ ठरली... आमीबी येनार !
नेहमीच्या प्रथेप्रमाणे खादाडी कुठे करायची यावर कट्ट्यातच एक चर्चासत्र होईलच ;) तेव्हा त्याबद्दल काळजी न करता आपापल्या खादाडीच्या ठिकाणांच्या "युएसपीज"ची टिपणे घेऊन येऊन घमासानात भाग घ्या... कट्ट्याच्या गफ्फांत तो एक म्हत्वाचा आजेंडा आस्तोय ;) :)
वाल्गुदाचार्यही येताहेत.
वाल्गुदाचार्यही येताहेत.
मुंबापुरीहून कुणी हाय का?
तेवढीच जरा कंपनी.
ईच्छुक..!
ईच्छुक..!
येणार
अर्रर !
कट्टा व्हेज दिसतोय !
येणारेस
In reply to अर्रर ! by कपिलमुनी
का चवकशी करतोयस ???
हो बरेच जण सुद्द साकाहारी
In reply to अर्रर ! by कपिलमुनी
हो बरेच जण सुद्द साकाहारी असल्याने वेज कट्टा आपण जौ रे रानमळा ला.
एकदम रानोमाळी वाचलं....
In reply to हो बरेच जण सुद्द साकाहारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
एकदम रानोमाळी वाचलं.... nonveg साठी चिमण रानोमाळी का जातोय समजेना.
बाकी करा ऐश खा मटार उसळ शिकरण वगैरे नेहमीचं आहेच. ;)
तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स
In reply to एकदम रानोमाळी वाचलं.... by प्यारे१
तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स अॅप वर चिंता नसावी =))!
@#$#-@%&*@@@+**@@@
In reply to तुम्हाला फोटो पाठवुच व्हॉट्स by कॅप्टन जॅक स्पॅरो
@#$#-@%&*@@@+**@@@
तिकडे इनो मिळत नाही का?
In reply to @#$#-@%&*@@@+**@@@ by प्यारे१
तिकडे इनो मिळत नाही का?
मी पण येणार...
मी पण येणार...
kattyas शुभेच्छा. वृत्तांत
kattyas शुभेच्छा. वृत्तांत टाका फोटो सहित.
ठरला एकदाचा तिसऱ्या धाग्यात
ठरला एकदाचा तिसऱ्या धाग्यात कट्टा;)
कट्टयाला जळजळीत शुभेच्छा!!
नक्की ११ ला येणार का कट्टेकरी
नक्की ११ ला येणार का कट्टेकरी? ११ ला येऊन भेट घेऊन आम्ही ऑफिसला पळणार. तेह्वा ११ वाजता कोणीतरी हजर रहावे.
रविवारी हापिस??? गुनाह है ये.
In reply to नक्की ११ ला येणार का कट्टेकरी by यशोधरा
रविवारी हापिस??? गुनाह है ये.
मी आणि वल्ली असु वेळेत शुअर
अगदी अगदी रे :(
In reply to रविवारी हापिस??? गुनाह है ये. by कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी रे :(
फक्त
In reply to अगदी अगदी रे :( by यशोधरा
रवीवारी हाफीस आणि उरलेले ५ दिवस सुट्टी असे असेल तर अगदी उत्तम.
असं हापिस मिळालं असतं तर मी
In reply to फक्त by नाखु
असं हापिस मिळालं असतं तर मी दर रविवारी सुट्टी टाकुन जगभर भटकलो असतो. हाकानाका.
काय मिठाचं पोतं घेऊन बसले का
In reply to फक्त by नाखु
काय मिठाचं पोतं घेऊन बसले का काय! ५ दिवस सुट्टी म्हणे!! भ्यांऽऽऽ
५ दिवस सुट्टीचा मिठाच्या
In reply to काय मिठाचं पोतं घेऊन बसले का by यशोधरा
५ दिवस सुट्टीचा मिठाच्या पोत्याशी काय संबंध ते कै झेपलं नाही.
जखमेवर मीठ चोळणे =
In reply to ५ दिवस सुट्टीचा मिठाच्या by बॅटमॅन
जखमेवर मीठ चोळणे = सुट्ट्यांची मारामार असताना ५ दिवस सुट्टी आणि शनिवार रविवार काम अशा दिवास्वप्नांचा जाहीर उच्चार करणे= मिठाचं पोतं.
=)) धन्यवाद!
In reply to जखमेवर मीठ चोळणे = by यशोधरा
=))
धन्यवाद!
जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही
In reply to जखमेवर मीठ चोळणे = by यशोधरा
जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही हापिसात नैतर हिमालयात अस्ता...तुम्ही म्हणाल तर तुम्च्या घरच्यांकडे मिपाच्यावतीने शब्द टाकून बघावा कै? =))
इन्शुरन्स आहे का रे तुझा? =))
In reply to जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही by टवाळ कार्टा
इन्शुरन्स आहे का रे तुझा?
=))
खिक्क
In reply to इन्शुरन्स आहे का रे तुझा? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क
ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट बेस कँप चा ट्रेक आयोजीत करता का? मला फार इच्छा आहे तो करायची....अगदी १ वर्षे आधीपासून तयारी करावी लागली तरी चालेल...
तयारी करायला लाग. चाललेय मी
In reply to ओ यशोधरा तै, तुम्ही एव्हरेस्ट by टवाळ कार्टा
तयारी करायला लाग. चाललेय मी पुढच्या वर्षी.
काय काय तयारी करावी लागेल ते
In reply to तयारी करायला लाग. चाललेय मी by यशोधरा
काय काय तयारी करावी लागेल ते व्यनी कराल का :)
खरंच येणार आहेस का आपली
In reply to काय काय तयारी करावी लागेल ते by टवाळ कार्टा
खरंच येणार आहेस का आपली टवाळगिरी चाललेय?
मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार
In reply to जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही by टवाळ कार्टा
मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार? इतके वाईट दिवस आले काय मिपावर? कैच्या कै! =))
डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर
In reply to मिपाच्या वतीने तू शब्द टाकणार by यशोधरा
डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर
ल्ल्ल्लूऊऊऊउ
हुर्रर्रऽऽ
In reply to डोनट अनडरयेश्टीम्येट माय पावर by टवाळ कार्टा
हुर्रर्रऽऽ
ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे
In reply to हुर्रर्रऽऽ by यशोधरा
ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे र्हैले की =))
तुला म्हायतीये ना तू आहेस ते?
In reply to ते "दूत्त दूत्त" ल्हिहाय्चे by टवाळ कार्टा
तुला म्हायतीये ना तू आहेस ते? मग काय, विषय संपलाच की! =))
ब्वॉर्र :)
In reply to तुला म्हायतीये ना तू आहेस ते? by यशोधरा
ब्वॉर्र :)
ह्या, ह्या ह्या!!
In reply to ब्वॉर्र :) by टवाळ कार्टा
ह्या, ह्या ह्या!!
शेव्टी तुम्ही पण पुण्याच्याच.
In reply to ह्या, ह्या ह्या!! by यशोधरा
शेव्टी तुम्ही पण पुण्याच्याच....बोल्ण्यात थोडीच हार जाणार :)
नेहमीप्रमाणे तिसर्या धाग्यात पुणे कट्टा.....
तारीख,वेळ आणि ठिकणा सहित ठरला....
कट्ट्याला मनापासून शुभेच्छा.
वृत्तांत लिहून जखम करणार नसालच आणि वरून खादाडीचे फोटो टाकून, मीठ पण टाकणार नसालच, अशी माफक अपेक्षा.
वृत्तांत यंदा अत्रुप्त
In reply to नेहमीप्रमाणे तिसर्या धाग्यात पुणे कट्टा..... by मुक्त विहारि
वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत. तुम्हालाही व्हॉट्स अॅपवरुन फोटो नक्की पाठवु =)) इनोचे.
@ वृत्तांत यंदा अत्रुप्त
In reply to वृत्तांत यंदा अत्रुप्त by कॅप्टन जॅक स्पॅरो
@ वृत्तांत यंदा अत्रुप्त लिहिणार आहेत.>>. परस्पर निर्णयसागर चिमणमंडळाचा णिसेध! :-/
माताय.. मी येणारच १वाजता.. त्यामुळे व्रुत्तांत चिमण लिहीणार अता! ल्लुल्लुल्लुल्लु :-/
व्रुत्तांतासाठी
In reply to @ वृत्तांत यंदा अत्रुप्त by अत्रुप्त आत्मा
दारूगोळा+रसद पुरवली जाईल याची नोंद घेणे
परस्पर भागवत मित्रमंडळ पुणे महनगर कट्टा आयोजन समीती.
@ परस्पर भागवत मित्रमंडळ>>
In reply to व्रुत्तांतासाठी by नाखु
@ परस्पर भागवत मित्रमंडळ>> यावरूण (एखाद्याचा..) "भागवत डाव करणे" या प्राचीन पुणेरी फ्रेजची आठवण झाली. ;)
नाखुनकाका आणि कुंपणीने
In reply to @ परस्पर भागवत मित्रमंडळ>> by अत्रुप्त आत्मा
नाखुनकाका आणि इतर चौकडीने पुरवलेल्या माहितीवरुन लिहिलेल्या वृत्तांमधुन काही विशेष माहिती मिपावर उघड झाल्यास मंडळ जबाबदार नाही ह्याची नम्र णोंद घेणे =)) ;)!!!
तुम्ही पण चक्कर टाका. अनायासे
In reply to नेहमीप्रमाणे तिसर्या धाग्यात पुणे कट्टा..... by मुक्त विहारि
तुम्ही पण चक्कर टाका. अनायासे चिरंजीवांनाही भेटता येईल ! :)
म्या बी एनार …
जेवायच अजून नक्की नाहीये . पण गप्पा नक्की झोडीन .
शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा. वृत्तांत आणि फोटूची वाट बघत आहे.
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याला शुभेच्छा.
उत्सवमूर्ती येणार आहेत का?
त्यांनी प्रतिसादच नाही दिलेला
In reply to कट्ट्याला शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
त्यांनी प्रतिसादच नाही दिलेला. पण धागा वाचुन येतील अशी अपेक्षा.
प्रयत्न करत आहे.
येण्यासाठी प्रयत्न करत आहे. पेठकर काका येणार आहेत का?
नाही.
In reply to प्रयत्न करत आहे. by हर्षद खुस्पे
पेठकर काका येणार आहेत का?
१६०० कि.मी दूरुनच शुभेच्छा...
बि. का. येणार असतील तर मज्जा
येऊ नाही शकलो.
In reply to बि. का. येणार असतील तर मज्जा by हर्षद खुस्पे
येऊ नाही शकलो.
पण मजवरी एवढी प्रिती का बरे?
कट्ट्यास शुभेच्छा... पोटभर
कट्ट्यास शुभेच्छा... पोटभर जेवा, मनभर हसा.
कट्ट्यास शुभेच्छा!
हाॅटेल ठरवावे आणि फटू टाकावेत. बाकी व्हेज असल्यामुळे इनो घेण्याची काही गरज वाटत नाही. ;)
मटार उसळ, शिकरण, उकडीचे मोदक
In reply to कट्ट्यास शुभेच्छा! by बोका-ए-आझम
मटार उसळ, शिकरण, उकडीचे मोदक पानामधे असले की इनोचे दोन चार डबे हवेचं =))
मी पण इच्छुक आहे येण्यास.
मी पण इच्छुक आहे येण्यास.
मी पण येईन, मी समीर पाठक,
मी पण येईन, मी समीर पाठक, आल्यावर भेटतोच, बाय द वे हे "पाताळेश्वर" एरिया कि हॉटेल?? आणि पत्ता कळेल का??
शिवाजीनगर स्टेशन पासून चालत
In reply to मी पण येईन, मी समीर पाठक, by समीर_happy go lucky
शिवाजीनगर स्टेशन पासून चालत दहा मिनिट अंतरावर आहे..जंगली महाराज रोडवर. विचारत विचारत आल्यास मिळू शकेल..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
असे आहे!
आधीच्या कट्ट्याला मला अर्धा
In reply to शिवाजीनगर स्टेशन पासून चालत by अत्रुप्त आत्मा
आधीच्या कट्ट्याला मला अर्धा तास लागला सापडायला. वल्ल्या त्याची सातवाहनकालीन पल्सर घेऊन आला म्हणून बरे.
पुण्यातले पत्ते पुण्यातल्याच
In reply to आधीच्या कट्ट्याला मला अर्धा by अभ्या..
पुण्यातले पत्ते पुण्यातल्याच लोकांना सापडतात. ते समजावून सांगिलेले तरी पुण्यातल्याच लोकांना कळतात. बाकीच्यांनी गुगल मॅप वापरावे.
फुटलो!
In reply to आधीच्या कट्ट्याला मला अर्धा by अभ्या..
त्यांचा टीशर्ट (सुंदरा मनामध्ये भरली, टीशर्टात शिरली, डाबर वाटिकाचा भांग) घेऊन जाताय ना अभ्याभाऊ?
कोणत्या सालची खरेदी हाये.
In reply to आधीच्या कट्ट्याला मला अर्धा by अभ्या..
कोणत्या सालची खरेदी हाये. आमची पण लय जुनी हाय पण अजुन चांगली चालतेय. पल्सर बद्दल बोलतोय मी.
कट्टयापूर्वी या धाग्याची
कट्टयापूर्वी या धाग्याची शेंच्युरी व्हावी हीच सदिच्छा!
सुपारी वाजवून घेतली का?
In reply to कट्टयापूर्वी या धाग्याची by प्यारे१
सुपारी वाजवून घेतली का?
चिमण आपला 'भाव' हाय म्हणून
In reply to सुपारी वाजवून घेतली का? by टवाळ कार्टा
चिमण आपला 'भाव' हाय म्हणून फुक्कट! ;)
तो असेल...बाकीच्यांच्या
In reply to चिमण आपला 'भाव' हाय म्हणून by प्यारे१
तो असेल...बाकीच्यांच्या च्यापान्यासाठी कै नको का?