कधी कधी

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
17 Nov 2014 - 11:19 am

हसी तो फसी या हिंदी सिनेमातलं 'ज़हनसीब' हे अत्यंत आवडतं गाणं ऐकत असताना सुचत गेलेल्या ओळी. विडंबन नाही, पण ज़हनसीब च्या चालीवर बसणारी ही कविता.

कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी

अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी धृ

कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १

कधीतरी वाटेवरती जेंव्हा मी विसावतो
उगाचच मागे का मी तेंव्हा वळून पाहतो
अजूनही कुणाला तरी शोधत असा राहतो
खुणवती
खुणवती
ती हिरवी गर्दराने
कधी कधी २

a

कधी कधी नकळत होतो थोडासा उशीर अन
अनोळखी चेहरे ही मग देती कधी धीर अन
चहुकडे बघता बघता होतो मी अधीर अन
हरवतो
बघुनिया
चमचमती ती दुकाने
कधी कधी ३

कधी मग दरबारी अन प्याला वाटतो हवा
अन कधी भैरवीतही ऐकू येई मारवा
कधी ठेका त्या इंग्रजीचाही हवा हवा
उमगती
उमगती
गज़लाही त्या नव्याने
कधी कधी ४

कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी

अजूनही
अजूनही
आठवते एक गाणे
कधी कधी

कधी कधी
कधी कधी
मी गातो एकट्याने
कधी कधी

- अपूर्व ओक

शांतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

17 Nov 2014 - 7:15 pm | प्रकाश१११

कधी काळी त्या ओळी माझ्या मला वाटल्या
मनाच्या गोष्टीही त्या शब्दांमध्ये दाटल्या
धूळीच्या राशी त्या दिवसांवर आता साठल्या
तरी पुन्हा
तरी पुन्हा
उलगडतो तीच पाने
कधी कधी १....सुरेख

वेल्लाभट's picture

18 Nov 2014 - 2:44 pm | वेल्लाभट

मनापासून धन्यवाद प्रकाश

क्या बात.. मस्त कविता एकदम. मुळ गाणे मला माहितीच नाही किंवा आठवत नसेल त्यामुळॅ तर कविता आनखिनच छान वाटली.

वेल्लाभट's picture

26 Nov 2014 - 11:04 am | वेल्लाभट

धन्यवाद

स्वप्नज's picture

25 Nov 2014 - 9:17 pm | स्वप्नज

कविता वाचली नाही... चक्क कविता गाईली...(शेजारी कोणी नव्हते याची खात्री करुन) मस्त जमलेय गीत/कविता...

वेल्लाभट's picture

26 Nov 2014 - 10:59 am | वेल्लाभट

मनापासून आभार :)