दिवाळी - वैचारिक क्षणिका

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
26 Oct 2014 - 5:40 pm

चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.

फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.

आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.

शांतरसचारोळ्या

प्रतिक्रिया

सतिश गावडे's picture

26 Oct 2014 - 5:43 pm | सतिश गावडे

मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती.

ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात.

रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)

माम्लेदारचा पन्खा's picture

26 Oct 2014 - 7:34 pm | माम्लेदारचा पन्खा

जाऊ द्या....हे असंच चालायचं.....आता पुढच्या दिवाळीत पाहू...