मुक्तक

पहिला पाऊस

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जे न देखे रवी...
29 May 2013 - 10:08 am

नो चिकचिक नो झिगझिग
अन दरवळणारा मातीचा वास
आज आमच्याइथे पहिला पाऊस पडला !

अंग भिजवायला पुरेसा नव्हता,
मन मात्र पार न्हाऊन निघाले..

- तुमचा अभिषेक

मुक्तक

आईसक्रीमवाले गंदे अंकल..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
27 May 2013 - 3:39 pm

घरापासून थोड्या अंतरावर, पण हाउसिंग कॉम्लेक्समधेच मेडिकलचं दुकान.

आमचं आरोग्य असं की केमिस्टचं अर्धं दुकान गिळून जिवंत रहावं लागतंय. पण ते आता ठीकच. मी ठरीव गोळ्या मागितल्या. त्यानेही माझ्यासाठी ष्टॉक करुन ठेवलेल्या होत्या त्यातल्या काढून दिल्या.

मेडिकलवाला म्हणजे फक्त केमिस्ट आणि ड्रगिस्ट नव्हे. मेडिकलच्या दुकानात मॅगी, ब्रेड, बटर, कोक-पेप्सी आणखीही काय काय मिळतं.
तसंच आईसक्रीमही मिळतं. बाहेरच क्वालिटी वॉल्सचा आईसक्रीम फ्रीझर ठेवला आहे.

पुन्हा एकदा तंगडतोड करायची टळावी म्हणून घरी फोन केला,"काही आणायचं आहे का?"

"आईसक्रीम आण", अर्धांगाकडून आवाज आला.

मुक्तकप्रकटनविचार

स्टराइल किड्स

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
26 May 2013 - 10:05 pm

एकदा शाळेच्या सहलीबरोबर गेलो होतो.
वाटेत , पुणं सुटल्यावर लगेच तासाभरात शिरवळला गाडी चाऊ-म्याऊ ला थांबली.
लग्गेच पोरं आणी त्यांच्या आया सरसावल्या [खरं म्हणजे आयाच] :-

चला रे कुणाला शुवा-शिया करायच्या असतील तर उरकून घ्या....
काही काही पालिका , (त्यांत काही महापालिकाही होत्या) तर पोरांना बळंच उभं करून ..
श....श.... करत होत्या.

मला वाटायला लागलं - पोरांना सोडून इतर सगळ्यांना होईल कि काय !

असो. तर शुवा-खाणी झाल्यावर सगळे गाडीत बसू लागले, तर तेवढ्यात सोहमला नेमकी नं.२ ला लागली [नतद्रष्ट मेलं]

मुक्तकविरंगुळा

महज़बीन बानो - इतर भाषेतील रत्ने

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
26 May 2013 - 9:07 pm

टुकड़े-टुकड़े दिन बीता, धज्जी-धज्जी रात मिली
जिसका जितना आँचल था, उतनी ही सौगात मिली

रिमझिम-रिमझिम बूँदों में, ज़हर भी है और अमृत भी
आँखें हँस दीं दिल रोया, यह अच्छी बरसात मिली

जब चाहा दिल को समझें, हँसने की आवाज़ सुनी
जैसे कोई कहता हो, ले फिर तुझको मात मिली

मातें कैसी घातें क्या, चलते रहना आठ पहर
दिल-सा साथी जब पाया, बेचैनी भी साथ मिली

होंठों तक आते आते, जाने कितने रूप भरे
जलती-बुझती आँखों में, सादा-सी जो बात मिली

मुक्तकप्रकटनआस्वादविरंगुळा

अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज

साळसकर's picture
साळसकर in जनातलं, मनातलं
26 May 2013 - 7:12 pm

बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.

मुक्तकजीवनमानमौजमजाप्रकटनविचारआस्वादलेखअनुभव

इराण्याची हॉटेलं ..........

१००मित्र's picture
१००मित्र in जनातलं, मनातलं
24 May 2013 - 4:18 pm

कालच दादर टीटी ला होतो. पाहतो तर काय , तिथल्या [पुणे बस-स्थानकासमोरचं] इराण्याच्या जागेवर चक्क वामन-हरी-पेठे आले. एका कोप~यातलं मराठी उद्योजक [निरुद्योजक] मन सुखावलं-उगाचच. की मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो ई.ई. पण विषय तो नाही. त्या-निमित्तानी आठवली - नामषेश होत जाणारी इराणी हॉटेल्स ![वा.ह.पेठेंचं आम्हांस कौतूकच आहे - उगाच त्यांचा राग कशाला ? - आमचं डिप्लोम्याटिक सहिष्णू मन]

मुक्तकविरंगुळा

मैं तैनू फ़िर मिलांगी (अमृता प्रीतम) इतर भाषेतील रत्ने

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 10:43 pm

प्रेम म्हणजे अनुभूती असते, असेच कधी तरी मी व माझा मित्र प्रेम या विषयावर चर्चा करत होतो. नवतारुण्याच्या उंबरठ्यावर आम्ही दोघे ही तेव्हा होतो त्यामुळे भावना महत्त्वाची की संबध महत्त्वाचे यावर चर्चा चालू होती, अचानक त्या चर्चे मध्ये आमचीच एक मैत्रीण सामील झाली. सर्व चर्चा ऐकल्यावर तीने फक्त आपल्या केबीन मधून एक डायरी घेऊन आली व खालील कविता समोर ठेवली, अमृता प्रीतम यांची.

मुक्तकप्रकटनविचारप्रतिसाद

श्रावण बाळ

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 2:32 pm

तो बसला होता …. हताश …. भिंतीला पाठ लावून ….
मांड्यांच्या बेचकीत डोकं आणि डोक्यावर स्वतःच्याच हातांचा आधार ….
त्याचे अर्धोन्मीलित डोळे आणि पापण्यांच्या ओल्या कडा ….
पाठीवर पडलेल्या मायेच्या प्रत्येक स्पर्शागणिक निघालेला हुंदका ….
सांत्वनाचे शब्द ऐकत फुटलेले आसवांचे बांध ….
एकाच रेषेत घरंगळत विसावणारे अश्रू ….
जमिनीवर पडून हळूहळू नाहीसे होत होते ….
पण दुःख असं हवेत विरतं का?
ओठ विलग झाले तर क्वचितच निघणारे अस्फुट शब्द ….
अर्थहीन …..
त्याला तर सगळंच निरर्थक …
येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अगम्य शब्दां सारखे…

मुक्तकसमाजजीवनमानराहणीप्रकटनअनुभव

विक्रांत वरील आयुष्य ५

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
19 May 2013 - 2:24 pm

सकाळी रत्नागिरीच्या समुद्रातून आम्ही निघालो तेंव्हा सकाळचे ६.३० वाजले होते. आता कोठे जायचे होते ते माहित नव्हते ( लष्करात कोणतीही माहिती ज्याला आवश्यक आहे त्यालाच दिली जाते. अर्थात त्यामुळे फार फरक पडतो असे नाही. माझ्यासारखा माणूस जो कोणत्याही विभागात काहीही कारण नसताना जात असे त्याला हे माहित होतच होते. तसे मी ब्रिज वर(जेथून जहाजाचे नियंत्रण केले जाते तेथे गेलो तेंव्हा तेथे नौकाचलन अधिकारी ( navigating officer) नकाशावर रेघोट्या ओढत होता.

मुक्तकविचार