कथा

एका अतिसामान्य माणसाची रोजनिशी... भाग १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Nov 2022 - 5:01 pm

image host

इव्हॅन तुर्गेनेव्ह
(९ नोव्हेंबर १८१८ ते ३ सप्टेंबर १८८३)
Turgenev: the Novelist's Novelist

कथालेख

१०८ वेळेस बेल

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
4 Nov 2022 - 5:23 pm

खरं  तर आज  शाळेला सुट्टी  होती , तरीही  गुंड्याला भल्या पहाटे  उठवले  होते.  सुट्टीचा दिवस  असूनही त्याने अजिबात कुरबुर केली नाही , उलट   आज स्वारीचा  उत्साह  दांडगा  होता. कारण आज महाशिवरात्री  होती.  शंभू महादेव त्याचं  आवडतं  दैवत  आणि   उपवासाचा छान छान फराळ खायला मिळणार म्हणून अजून  जास्त  खुश.  गुंडया  जसा आंघोळ करुन तयार  झाला तसं  आईनं   हातात  बेलान भरलेली पिशवी  दिली  आणि सांगितलं  -   "हे बघ  गुंड्या  ह्यात  एकशे आठ  बेलाची पानं  आहेत.  मंदिरात जाऊन महादेवाला वाहून  ये. पण  तिथं जाऊन बद्द करून पिशवी  पिंडीवर उलटी करून रिकामा होऊ नको.

कथालेख

पायावर पाणी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
28 Oct 2022 - 6:36 pm

पालखी मंदिरातून निघून जवळपास तीन तास झाले होते. पालखी निघाली ती देखील भर दुपारची. डोक्यापासून नखापर्यंत तो भंडाऱ्यात न्हाला होता. अंगातून निघणाऱ्या घामासोबत ओघळत भंडारा थोडा खाली सरकत होता. अनवाणी पायांना रस्त्यावरचे खडे टोचत होते. पण ती देवाची पालखी, ढोलाच्या तालावर, टाळाच्या चालीवर नामघोषसोबत पुढे सरकत राहिली. मानकरी आलटून पालटून पालखी घेत होते. पालखी पुन्हा एका चौकात येऊन थांबली, तसा देवाच्या नावाचा मोठा जयघोष झाला. ढोलाचा आवाज अजून वाढला, भंडारा आभाळाला भिडला. पुन्हा एकदा त्याला पालखी घ्यायचा मान मिळला.

कथालेख

लघुकथा

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
13 Sep 2022 - 3:51 pm

लघुकथा

अलक 1
आजोबांपासून चालत आलेला गाण्याचा वारसा आपण समर्थपणे पुढे नेतोय याबद्दल गायत्रीताईना समाधान होते. एवढंच नव्हे तर पंतांची मुलगी अशी ओळख संपून गायत्री दांडेकर अशी ओळख निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो याचा त्यांना अभिमानच होता. पण एक खंत मात्र होती. प्रेमाने ज्याच नाव त्यांनी गंधार ठेवलं होतं, दुर्दैवाने तो मुलगा मुका होता. आपला कलेचा वारसा इथेच संपला या जाणीवेने त्या अस्वस्थ होत. पण वयाच्या तिसर्या वर्षापासून गंधार आई रियाजाला बसली कि समोर बसायचा. खरं तर गायत्रीताईना ते आवडायचं नाही. पण आधीच व्यंग असलेल्या मुलाला आणखी काय बोलणार म्हणून सोडून द्यायच्या.

कथाप्रकटन

खरकट्या मिसळीची गोष्ट

मीउमेश's picture
मीउमेश in जनातलं, मनातलं
27 Aug 2022 - 5:28 pm
मिसळ म्हणजे माझा जीव की प्राण !! प्रवासात चांगली आणि प्रसिद्ध मिसळ कुठे मिळते या शोधात मी असतो. कित्येक वेळा तर मिसळ खाण्यासाठी फार दूरवरचा प्रवास मी केला आहे. मी मुळचा ठाणेकर असल्यामुळे मामलेदार मिसळ ही आमच्यासाठी पंढरी आणि आम्ही मिसळपंढरीचे वारकरी. सध्या मुंबई पुण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मिसळीचा सुळसुळाट झालेला आहे. पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ, नाशिकच्या काळया मसाल्याची मिसळ, कुठे चीज मिसळ, सर कुठे तंदुरी मिसळ, कुठे मडक्यातली मिसळ, तर कुठे अजून काही.. काल-परवा सर कुठेतरी चिकन मिसळ आणि मटण मिसळ मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं वाचण्यात आलं.
कथाजीवनमान