फुलपाखरू

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 10:23 am

वेड असो वा प्रिती
वसंतात मने जुळती
पण, प्रणय उचंबळून येता
हा दोष कुणाचा साथी?

हरखुन सळसळणारे
हास्य आपुल्या गाली
अलवार सांगते तेव्हा
संगित नाचते ताली

नवनीत क्षण सरण्यापूर्वी
पाकळी पाकळी मखमली
रूतलेल्या हुंकारांना
अंधारात सुलगव खुशाली

खुलती सुगंध कायेचे
कोवळी फुले सु'मनाची
स्वप्नांचे पंख पांखरुनी
सजणूक दे फुलोर्‍याची

* येथून सु'डंबण प्रेर्ना

गुलमोहर मोहरतो तेव्हाप्रेम कविताफुलपाखरूभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितालाल कानशीलविडम्बनशृंगारस्पर्शशांतरसप्रेमकाव्य

वस्त्र विणताना..

Bhakti's picture
Bhakti in जे न देखे रवी...
12 Oct 2021 - 9:57 pm

वस्त्र विणताना, मन धागा गुंफताना..हवा

रंगांचा कोमल बाज, गहिवर स्पर्श साज!
रेशीम पाण्याची धार, त्यात चंद्राची साद..

अलगद सांडलेले, प्राजक्त देठ सहवास..
चोचीत धरलेले, आकाश मोतियाचे भास!

वाऱ्याची मंगल गुज, हिरवळ मखमल पाऊल वाट..
सागराची तुफान गाज, मातीवर रेंगाळलेली वेडी लाट!

-भक्ती

कविता माझीफुलपाखरूकविता

फुलपाखरू

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
9 Jun 2020 - 9:22 am

फुलपाखरू

एक होते रंगेबेरंगी
फुलपाखरू ..
त्याचे 'मन'
ऐसे नाव..
ईवलेसे नाजुक
पंख तयाचे
त्यावर सुंदर नक्षी
संस्कारांची.

फुलपाखराच्या
पंखावरचे काही रंग
लाल-गुलाबी
स्वप्नांचे
बालपणीच्या आठवणींचे
उमलणार्या फुलांचे
चांदण्या रातींचे
तर
काही रंग आहेत.,मात्र
निळे-काळे
नको त्या
कटु आठवणींचे
भळभळत्या जखमांचे
चुलीतल्या विस्तवाचे..

प्रेरणात्मकमुक्त कवितामुक्तकफुलपाखरूमनरंग