सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
19 Dec 2021 - 10:23 am

वेड असो वा प्रिती
वसंतात मने जुळती
पण, प्रणय उचंबळून येता
हा दोष कुणाचा साथी?

हरखुन सळसळणारे
हास्य आपुल्या गाली
अलवार सांगते तेव्हा
संगित नाचते ताली

नवनीत क्षण सरण्यापूर्वी
पाकळी पाकळी मखमली
रूतलेल्या हुंकारांना
अंधारात सुलगव खुशाली

खुलती सुगंध कायेचे
कोवळी फुले सु'मनाची
स्वप्नांचे पंख पांखरुनी
सजणूक दे फुलोर्‍याची

* येथून सु'डंबण प्रेर्ना

गुलमोहर मोहरतो तेव्हाप्रेम कविताफुलपाखरूभूछत्रीमुक्त कवितारतीबाच्या कवितालाल कानशीलविडम्बनशृंगारस्पर्शशांतरसप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

19 Dec 2021 - 10:34 am | चांदणे संदीप

सुरेखच एकदम! काव्य आवडले!

सं - दी - प

मदनबाण's picture

19 Dec 2021 - 8:34 pm | मदनबाण

वा... विडंबन आणि प्रेरणा दोन्ही मस्त ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Я буду ебать

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Dec 2021 - 11:50 am | ज्ञानोबाचे पैजार

छान, स्वतंत्र कविता म्हणून पण आवडली.

पैजारबुवा,