मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गॅस साठी दाही दिशा ....

बाजीगर ·
लेखनविषय:
गॅस साठी आता | धावा दाही दिशा | आम्हा फिरविली कसा |जगदीशा || काय आमची चूक |कसा सत्यनास | कुणी देता का गॅस | विठू राया || झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा | सुरू करा टांगा | पांडुरंगा || ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी | हाताने धुवा धुणी | चक्रपाणी || कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण | पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी || घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब| पुन्हा पेटवा बंब| मोरी तला|| अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव || डिलीट करा स्विगी |झाले बंद हॉटेल | कसे चालेल हॉस्टेल | चिंतामणी || बाजीगर खरेदी | इंडक्शन तवा | राईस कुकर नवा | इलेक्ट्रिक ||

"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम

पाषाणभेद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम (सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.) २१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते.

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद ✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम ✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै ✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास ✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट ✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ ✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत ✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना नमस्कार. गेल्या जानेवारीमध्ये दक्षिण भारतात "आरोग्यासाठी योग" हा विषय घेऊन १८६१ किलोमीटर सोलो सायकल प्रवास केला होता. परभणीच्या निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राचा हा उपक्रम होता.

शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..

आजी ·
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे.. हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच.. आमच्या वेळी.. काय सांगू? ३५ टक्क्यांना पासिंग होतं. ७० टक्के मिळाले की डिस्टिंक्शन.

सैरभैर डायरी - ३

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सैरभैर डायरी - १ सैरभैर डायरी - २

गावाकडच्या गप्पा

बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या . दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ होमसिक झाल्याची भावना! ✪ रामगंगेच्या किनार्‍याने घाट वाटेचा प्रवास ✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम! ✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन ✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन ✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता ११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय! पहाटेचा अंधारातला परिसर!

सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)

Bhakti ·
लेखनविषय:
सावित्रीबाई फुले यांना आज स्मृतिदिनानिम्मित विनम्र अभिवादन! 1 इतिहासात कुठेही अहमदनगर म्हटलं की,उत्सुकता आणखिनच निर्माण होते.पुस्तक प्रदर्शनात तिथल्या वृध्द पुस्तक विक्रेत्याने मला "ह्या सावित्रीबाईच्या शिक्षिका होत्या आपल्या नगरच्या वाच.तुला आवडेल "असं म्हणत एक छोटेखानी पुस्तक दिले.कामिल पारखे

मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...

कंजूस ·
मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी... कवितेची काही कडवी असतात आणि दोन कडव्यांमध्ये समजा चार किंवा अधिक ओळींचे अंतर ठेवायचे आहे तर असे लिहिता येईल. [<br /> किंवा <p> </p> यांचा उपयोग होत नाही.]

रिकाम्या ओळींसाठी &nbsp; type करणे.

Ready template
कवितेच्या ओळी

जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'

श्वेता२४ ·
लेखनविषय:
अक्षरांचे पंख होऊनी परकी मला मी प्रश्न आज विचारते बेहिशेबी जीवनाचा ताळमेळच मांडते का कला साहित्य सारे ठेविले वेशीवरी अन् कुणाची पत्नी होऊन माप हे ओलांडते त्या नळाचे गीत सोबत ताल साधे भाकरी तान्हुल्याचा गोड चेहरा चंद्र म्हणूनी पाहते चांदण्यांचे शब्दमोती विखुरले दारी सडा कल्पना सारूनीही घर लख्ख माझे झाडते सोडुनी मज अन्य सर्वांना इथे प्राधान्य पण मीच मजला उचलूनी मग अग्रस्थानी ठेवते! अक्षरांचे पंख मजला हार का मग मानू मी? घेउनी स्वप्ने आभाळी मुक्त मी झेपावते...!! — श्वेता माईणकर सूर्यवंशी © 2026

खेळ मांडला...

बाजीगर ·
लेखनविषय:
युद्धाचा भडका, सामान्यांना धडका || तेलासाठी खेळ, अवघड वेळ || उच्च तंत्र युद्ध, सामान्य हतबुद्ध || काय चांगले, काय वाईट, मिडिया ला पाहिजे, फक्त बाईट || बुडाला एकदाचा, खामेनेई कातील, अमेरिका जगाचा पोलिस पाटील