आज मै उपर , आसमां नीचे
करुणा... नावात काय असते म्हणा. जिथे करुणेचा पाझर फुटायला हवा तिथे नेमके हे नाव सापडत नाही आणि जिथे नको तिथे हे नाव सापडते. आमच्या शाळेच्या वर्गात दोन करुणा होत्या. खरे तर त्या वेळेस साथच होती दिपाली रुपाली सोनाली अशा नावांची. प्रत्येक काळात असते तशी .शाळेच्या वर्गात चार तरी दिपाल्या , सोनाल्या आणि रुपाल्या असायच्या. मुलांच्या बाबतीत दोन विजय चार सुनिल आणि तीन संजय नक्की सापडणार म्हणजे सापडणारच. आडनाव सारखे असणे समजू शकते.नाव आणि आडनावही सारखे निघायचे.