ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
20 Jan 2016 - 12:28 pm

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन
मित्रांनो,
गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर.
सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

This is an embedded Microsoft Office presentation, powered by Office Online.

यासंदर्भात ज्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे अशा काहींची नावे अशी-
श्री पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी (डेक्कन कॉलेजमधील एक वरिष्ठ इतिहास तज्ज्ञ), प्रो.प्र के घाणेकर, डॉ सदानंद शिवदे, श्री.आशुतोष बापट, डॉ शेषराव मोरे, डॉ. अजीत जोशी (आग्र्याहून सुटका पुस्तकाचे लेखक), डॉ. राजगुरू, श्री. विशाल खुळे व श्री. उमेश जोशी (इतिहासाच्या पाऊलखुणाचे लेखक), डॉ.रविंद्र लोहोकरे (रायगड वर अभ्यासात्मक डीव्हीडी बनवणारे), श्री मोहन शेटे (दिेवाळीत अनेक गडांच्या प्रतिकृती सादर करणारे).
जनरल शेकटकर आणि जनरल पाटील, आमदार जगदीश मुळीक, रानवारा.कॉम चे गडप्रेमी स्वप्निल पवार, व्हर्चुअल टूर ऍपचे निर्माते अमोल चाफेकर आणि अनेक मित्र मंडळीतील सहकारी...
मिसळपाववर अनेक जण संगणक विद्यापारंगत आहेत. पैकी काहींनी यापूर्वी वेगळ्या विषयावर मला 5 ऍप्स बनवायला मदत देखील केली होती. तद्वत यावेळी विविध ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे.

संस्कृतीप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

खेडूत's picture

20 Jan 2016 - 12:35 pm | खेडूत

चांगली कल्पना आहे.
प्रायोगिक तत्वावर बाजूलाच एखादी प्रतिक्रुती बनवता आली तर त्याने मूळ पुरातन वास्तूला बाधा येणार नाही.
नंतर त्या कल्पनेचा स्वीकार होऊ शकेल.

मित्रांनो, गड आणि किल्ले संवर्धन मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा पाठपुरावा. यावर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आता एक PPT सादर करत आहे. त्यावर आपले विचार वाचायला आवडतील.
https://1drv.ms/p/s!AhSp1CGLg_dVuywYq8U1syZo-otB

सतिश गावडे's picture

2 Mar 2017 - 12:01 am | सतिश गावडे

काका, पीपीटी एडीट करता येत आहे. रीड ओन्ली अ‍ॅक्सेस द्या इतरांना.

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 12:40 am | शशिकांत ओक

सतीशजी,
रीड ओनली अॅक्सेस कसा द्यावा ते सांगितले तर धन्यभागी राहीन...
जसे जमले तसे पुन्हा देत आहे...

<This is an embedded Microsoft Office presentation, powered by Office Online./code>

...

ही पीपीटी पहा... थोडी कल्पना येईल...

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 1:12 am | शशिकांत ओक

... ...

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 1:32 am | शशिकांत ओक

मदत हवी आहे. पुर्व परीक्षणात जर मेसेज बॉक्स मोकळा ठेवला तर पीपीटी दिसते... पण प्रकाशित करायच्या वेळी काही तरी लिहा असे येते. तसे केले तर प्रकाशित प्रतिसाद पीपीटी विना दिसतो... काय चुकते आहे माझे....

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 1:36 am | शशिकांत ओक

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 1:41 am | शशिकांत ओक

काही वेँधळेपणाने अजूनही नीट समजलेले नाही मी काय चुकलो ते माहीत नाही...पण असो...

प्रयत्न आवडले. वरची दिलेली लिंक वापरून स्लाइडशो पाहिला.
१) पिपिटी माध्यम नको.
२) दहा पंधरा फोटो क्रमांक देऊन धाग्यात अपलोड करा. तुम्हाला काय सांगायचे आहे या उपक्रमाविषयी त्याचे पाच मिनिटांचे साउंड रिकॅार्डींग mp3 करा. ती साउंड फाईल clyp dot it या साइटवर अपलोड करून त्याची जी लिंक येईल ती द्या.
३) हे सोपे आहे कुणा एक्सपर्टची मदत लागणार नाही.

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 6:58 pm | शशिकांत ओक

कंजूस जी आणि अन्य मित्रांनो,
या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

शशिकांत ओक's picture

2 Mar 2017 - 7:00 pm | शशिकांत ओक

कंजूस जी आणि अन्य मित्रांनो,
या धाग्यावरील माहिती व त्यातील संकल्पना यावर विचार वाचायला आवडले. यापुढे काय काय करता येईल ते आपल्याकडून समजून घ्यायला आवडेल. सध्या पीपीटी माध्यमातून मला ते तयार करायला सहज जमते म्हणून वापरले जाते. मिलिटरी जनरल्सशी संपर्क करून चर्चा करायला, प्रेझेंटेशन सोपे जाते. यानंतर मॉक ड्रिल ची संकल्पना आहे. त्यात अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरून घ्यायला हवी आहे. इथे काय चालले आहे याची कल्पना द्यायला धाग्याचा उपयोग करत आहे.

मराठीतील सिने व नाट्यक्षेत्रज्ज्ञ श्री राजू फुलकराचे विचार सादर

ते म्हणतात... अनेक गोष्टींचे भान हवे. सलग दीड तासाचा कार्यक्रम हवा. अँफिथिएटर हवे. कार्यक्रम असा अंगावर येणारा वाटला पाहिजे. पोरकट वाटता कामा नये.सामान्य आणि जाणकार यांना भावला पाहिजे. ऋतुजा फुलकर म्हणतात यात नविन तंत्राचा वापर करयाला बवा. डायलॉग आघिच रेकॉर्डेड असावेत.
आपल्या काही सुचनाअसतील तर त्याचे स्वागत आहे.

संग्राम's picture

2 Mar 2017 - 12:14 pm | संग्राम

पन्हाळा

सौजन्य :- TripAdvisor

लोणावळ्यात एके ठिकाणी दिवाळीत तीस किल्ले बनवलेले पाहिले होते. बरेच हुबेहुब होते रचनात्मक.त्यांचे फोटो घेऊन त्यापासून व्हर्चुअल टुअर बनवणे सोपे आहे.प्रायोजक गाठून प्रतिकृती बनवणाय्रा मुलांना काही देताही येईल.

शशिकांत ओक's picture

20 Jan 2016 - 7:21 pm | शशिकांत ओक

आपल्या सुचनांबद्दल...
आपण स्लाईड्स त्या संदर्भात सुचना कराव्यात ही विनंती..

उदा० पुरंदर आणि तो उडालेला बुरुज,रायगडावर शेजारच्या पोटल्याच्या डोंगरावरून तोफगोळे कसे डागले इत्यादी चित्रण करता येईल.

आदूबाळ's picture

20 Jan 2016 - 10:23 pm | आदूबाळ

शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं सिम्युलेशन केलं तर कसली मजा येईल! कारतलबखान प्रकरणाचं पण...

शशिकांत ओक's picture

20 Jan 2016 - 11:16 pm | शशिकांत ओक

स्लाईड्स दिसायच्या बंद झाल्या काय? 'This item won't load right now' असे म्हटले जात आहे. म्हणून विचारले...

खटपट्या's picture

21 Jan 2016 - 5:39 am | खटपट्या

चित्र दीसत नाही

शशिकांत ओक's picture

22 Jan 2016 - 12:09 am | शशिकांत ओक

पीपीटी पाहून प्रतिसादाची खटपट पटपट करा.

कंजूस's picture

21 Jan 2016 - 7:34 am | कंजूस

"शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याच्या प्रसंगाचं--" ते आलं आहे कुठल्याशा सिनेमात पण सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना/सैनिकी व्युहरचना या दृष्टीने त्यात काय दाखवणार?एखाद्या गडाचा ३६० अंशात फोटो स्मिर्टफोनमध्ये फिरवता आला तर तुमच्या PPT पेक्षा अधिक परिणामकारक होईल.फोटो लोड केल्यावर त्यिला वाचकालाच फिरवता आला पाहिजे सर्व बाजूने/ढोनाततून/वरून वगैरे. PPT बोअरिंग असते.

शशिकांत ओक's picture

22 Jan 2016 - 12:26 am | शशिकांत ओक

आपले म्हणणे बरोबर आहे. खालील फोटोंना पुढेमागे करून पाहून तसे बोअर वाटणार नाही हे खरे.पण त्यातील अंतस्थ नक्षीकाम, खरवडलेल्या भिंती, छत पाहून वाईट वाटते. ते कॉम्पच्या सहाय्याने सुंदर करावे असा प्रयत्न आहे.

Tomb of Itimad-ud-Daulah- Inside View_2

---

Tomb of Itimad-ud-Daulah_8

शशिकांत ओक's picture

24 Jan 2016 - 1:05 am | शशिकांत ओक

आणि अन्य मित्रांनो, वरील फोटोतील खराब जागा भरून काढल्या तर ती ती कबर आणखी किती सुंदर दिसली असती नाही काका का?

शशिकांत ओक's picture

21 Jan 2016 - 10:03 am | शशिकांत ओक

कंजूस व अन्य मित्रांनो
वरील सादर केलेल्या पीपीटीतून फक्त एक उदाहरण म्हणून काय करावे लागेल याचा विचार केला आहे. जे प्रत्यक्षात करायला हवे ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच करायला हवे आहे. पीपीपी का दिसत नाही यावर येथील तज्ञांनी मदत करावी. तोवर पुन्हा एकदा ती पीपीपी सादर केली तर चालेल का?

करण्यासाठी अॅप्स बनवायचे काम आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी तज्ज्ञ मंडळी असतील तर संपर्कात राहायला आवडेल.
कंजुसानी सुचवलेल्या ३६० अंशातून चित्र पहायची सोय पहाण्यात आली त्या वर प्रतिसाद वाचायला आवडेल.

पीपीटी काही दिसली नाही, पण उपक्रम स्तुत्य आहे.

शशिकांत ओक's picture

22 Jan 2016 - 12:11 am | शशिकांत ओक

पीपीटी नीट दिसत आहे तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.

मित्रांनो
जोवर वरील पीपीटी नीट दिसत नाही तोवर या ठिकाणी भेट देऊन पहा. ही विनंती.
This is an embedded Microsoft Office presentation, powered by Office Online.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2016 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम प्रकल्प. शुभेच्छा !

अनिरुद्ध प's picture

24 Jan 2016 - 9:11 am | अनिरुद्ध प

उत्तम प्रकल्प ,शुभेच्छा

प्रचेतस's picture

24 Jan 2016 - 9:19 am | प्रचेतस

सैनिकी पर्यटन म्हणजे नेमके काय ते समजले नाही.
पीपीटी पाहिली. अशा प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल. अजिंठा लेणीच्या पायथ्याला लेणीची प्रतिकृती उभारून ठेवली आहे.

सध्या मात्र सैन्याच्या ट्रेनिंग सेंटरच्या नावाखाली पुरंदर किल्ल्याचे विद्रुपीकरण सुरु आहे त्याची आठवण झाली.

हाच तर त्याचा योग्य वापर होतोय,सैन्य प्रशिक्षनासाठीच या गडकोटांचा वापर व्हायला हवा.

एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.
http://www.museomav.it/
माउंट वेसुविअसमुळे उद्ध्वस्त होण्यापूर्वीची पोंपेई व हर्क्युलेनिअम ही शहरे आणि तिथलं राहणीमान या आभासी म्युझिअममध्ये पाहता येतं.

शशिकांत ओक's picture

26 Feb 2017 - 12:31 pm | शशिकांत ओक

नमस्कार आपण सुचवलेल्या लिंक पाहिली. असे काही करायचे तर काय काय तयारी करावी लागेल याची आखणी करायचे काम चालू आहे.

कंजूस's picture

25 Jan 2016 - 10:24 pm | कंजूस

"ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे."

यासाठी लागणारे CADचे प्रगत सॅाफ्टवेर दोन लाख रुना विकत घ्यावे लागते हे कुठेतरी वाचले होते.साक्षीदाराच्या जुजबी माहितीवरून गुन्हेगाराचा चेहरा तयार करतात तसलेच.त्या सॅाफ्टवेअरची पाइरेटिड सीडी मिळत नाही बहुधा.करामत करणे नंतर सोपे आहे.फक्त चारपाच फोटो हवेत.

शशिकांत ओक's picture

27 Jan 2016 - 12:08 pm | शशिकांत ओक

नमस्कार, कंजूसजी अशा प्रकल्पांना खर्च भरपूर येणार आहे हे मान्य. सध्या बाहुबली, बाजीराव मस्तानी व असे अन्य भारतीय भाषात अनेक चित्रपट निर्मित झाले आहेत त्यामुळे पैसे खर्च करायला, भव्य निर्मितीसाठी कलाकार आणि गुणी तत्रज्ञ आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. अशा कलाकृती पहायला इच्छुक तरुण पिढीतील ती मंडळी आहेत. प्रयत्न करून पाहिला पाहिजे. त्यातून आणखी नाविन्यपुर्ण सादर करायची प्रेरणा मिळेल...

शशिकांतभाऊ अशक्य नाहिये हे वर दिलेल्या उदाहरणावरून दिसतंच आहे पण खर्च करणार कोण?

शशिकांत ओक's picture

27 Jan 2016 - 2:33 pm | शशिकांत ओक

नितीन देसाई यांच्या सारख्या महाराष्ट्र राज्य इतिहास प्रेमी मंडळी पैकी कोणी कोणी लोकांच्या संपर्कात जायचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. मिपाकरांच्या परिचयाचे कोणी असे इतिहास प्रेमी असतील तर मला त्यांच्याकडे संपर्कात राहायला आवडेल.

तुमच्या पुण्यातच आहे.अविनाश धर्माधिकारी यांनी स्वारस्य दाखवल्यास चक्रे वेगाने फिरतील.

शशिकांत ओक's picture

28 Jan 2016 - 12:09 am | शशिकांत ओक

नमस्कार कंजूस जी,
आपल्या सूचनेबद्दल. आपण अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे संपर्क कसा साधावा या बद्दल मार्गदर्शन केलेत तर आभारी राहीन. आपण म्हणता तर जरूर भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन स्वीकारेन.

शशिकांत ओक's picture

26 Feb 2017 - 12:28 pm | शशिकांत ओक

काही ना काही कारणाने भेट टळत आहे... अविनाश धर्माधिकारी यांनी मला दलाई लामा यांच्या सत्कार समारंभात नाडी ग्रंथ भविष्य विषयावर ही बोलू म्हटले होते. असो वेळ आली की ते घडेल.. पण

शशिकांत ओक's picture

19 Feb 2016 - 6:34 pm | शशिकांत ओक

कंजूस जी,
यांना भेटून घ्या, अशा आपल्या सल्ल्यानुसार मी संपर्कात आहे. काही कारणाने ती भेट पुढे पुढे सरकते आहे.

पुण्यात एक संस्था/गट आहे ते लोक जुने नवे इंग्रजी/इतर सिनेमे आणतात त्या क्लबातही बरेच लोक आहेत हे करू शकणारे.थोडी चौकशी केल्यास सापडेल नाव.
मध्यंतरी एक कलाकाराबद्दल पाहिले टिव्हिवर.तो असल्या मोन्युमेंट्सचे हाइ रेझलुशन फोटो बनवतो.एखाद्या गोष्टीचे असंख्य फोटो वेगवेगळ्या स्थानातून घेऊन ते कंप्युटरने एकत्र करून एकच हाइ रेझ फोटो होतो.त्यावर कितीही झूम करता येते।फिरवून पाहता येते.थोडक्यात तंत्र आहे पण परवडायला हवे.

शशिकांत ओक's picture

12 Nov 2016 - 1:03 am | शशिकांत ओक

कालांतराने मिपाकरांच्या संपर्कात आल्यावर आधी काय काय सादर केले होते ते पाहताना नव्या सदस्यांसाठी धागे उपसून वर काढतोय. राग नसावा.

चित्रगुप्त's picture

12 Nov 2016 - 7:09 am | चित्रगुप्त

हजारो ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले... यापैकी एक प्रकार. तरी पण वयाच्या साठीतही आपण असे काहीतरी नित्य नवनवीन नेटाने करत-शोधत असता हे कौतुकास्पद. "ठेव ते वर"...Keep it Up.

शशिकांत ओक's picture

12 Nov 2016 - 10:41 am | शशिकांत ओक

पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला
निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58
एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे.

वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला
निशाचर - Sun, 24/01/2016 - 18:58
एकंदर पुरातत्वशास्त्र, इतिहास आणि युद्धकला यांची सरमिसळ दिसत आहे. सैनिकी पर्यटन म्हणजे काय आणि त्याचा पुराणवास्तूंच्या संवर्धनाशी संबंध कसा, हे कळले नाही. देवळे किंवा लेणी यांची मूळ रचना आणि त्या काळचे समाजजीवन आभासी स्वरूपात दाखविणे शक्य होऊ शकेल. या प्रकारचे म्युझिअम इटलीमध्ये एर्कोलानो (Ercolano) इथे आहे
.

वरील विचारणेला दिलेले उत्तर -

वरील सर्व विषयांची सरमिसळ हाच या कामाचा गाभा आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हीअंगे कशी पुढे आणता येतील यावर चर्चा व प्रत्यक्ष कामगिरीची गरज आहे. रामोजी फिल्मसिटीच्या सीईओच्या पत्नीच्या अनौपचारिक भेटीतून असे कळले की ते नवी टुरिझम संकल्पनेवर आधारित सिटी उभी करत आहेत त्यात मिलिटरी टुरिझम संकल्पनेचा जोरदारपणे पाठपुरावा करता येईल. असे म्हटले गेले. पुढे काय होणार ते हळूहळू कळून येईल. असो.

हा धागा उचकायचे कारण असे की मधल्या काळात काय घडले याची नोंद मिपात हवी म्हणून ....
रामोजी फिल्म सिटीत श्री. जालनापुरकरांना जे CEO of Film city आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून असे लढाईचे चित्रिकरण शक्य आहे काय याची चाचपणी करायला म्हणून गेलो होतो.. त्या आधी त्यांचा फोन क्रमांक शोधून त्यांना सवडीची वेळ आहे का हे ठरवण्यात बराच काळ लोटला. नमूद करावेसे वाटते की तो पत्ता मिळवून द्यायला एयर मार्शल बिंगो गोखल्यांनी आपुलकीने मदत कली. जालनापुरकर बालपणी नुमविचे विद्यार्थी होते म्हणून गोखल्यांची त्यांच्याशी ओळख होती. असो.
त्याची भेट ठरल्याप्रमाणे झाली...भेटीत ते रोज किती व्यस्त असतात याचा अनुभव आला. फोन, मोबईल, कनिष्ठ स्टाफचे मधे मधे व्यत्यय यांना पार करून तरीही ते माझ्या PPT ला पहायला त्यांच्या कॉन्फरन्स रूम मधे आले. बोलणे झाले.
ते म्हणाले, 'आमचे रामोजीचे मालक सध्या इतके लक्ष घालत नाहीत. त्यांनी इथले बरेच मालकी हक्क इतरांना विकले आहेत वगैरे वगैरे.... म्हणून तुम्ही त्यांना भेटून काही हाती लागेल असे वाटत नाही. (पुण्यात एका फिल्मी हस्तीने सुचवले होते की रामोजींना अशा विषयात रस असतो. त्यांना ही संकल्पना नक्की आवडेल. एकदा त्यांनी हाती प्रकल्प घेतला की मग फायनान्स, शूटींग, आणि अन्य तांत्रिक बाजूंची चिंता राहात नाही. तुम्ही त्यांची भेट घ्या की काम झालेच म्हणून समजा... म्हणून मी श्री जालनापुरकरांना मध्यस्त करून रामोजीरावंची भेट मिळवता येते का? ते पाहायला व भेटायला गेलो होतो.) म्हणून तुम्हाला अर्थ सहाय्य आमच्या कडून होईल असे वाटत असेल तर ते शक्य नाही. 'पैसा' हे एक कारण असल्याने शिवसृष्टीचे बाबासाहेबांचेही काम लांबणीवर पडलेले आहे. मी त्यांच्या, शिरडीच्या, शेगावच्या नवीनीकरणातून पर्यटनाच्या सुविधांसाठी सल्लागार म्हणून कामे करत आहे. पुज्य बाबासाहेब पुरंदरे पंतप्रधान मोदींना देखील भेटून आर्थिक सहाय्य मिळवायला प्रयत्नशील आहेत. ('ते कटोरा घेऊन गेले'. नेमके शब्द) तेंव्हा तुम्ही पण फायनान्सर मिळवलात तर आमच्या फिल्म सिटीत शूटिंग करायला परवानगी द्यायचे काम माझ्या हातात आहे ते मी करीन... असो...
थोडक्यात... 'पैसे की कोई बात करो... फिर इधर आओ'....
नितिन देसाईंना भेटा म्हणून सल्ला अनेकदा मिळतो. 'पैसे टाका सगळे काम करता येईल'... हा संदेश मिळतो...
अर्थात हे नवीन नाही 'दाम करी काम' ही दुनियेची रीतच आहे... !
आता गळ टाकून बसल्याशिवाय फायनान्सर भेटणार कसा...!!
एका फिल्म बनवणाऱ्या मुंबईच्या कंपनीला विचारणा करत होतो... 'काहो हे फायनान्सर कुठे उपलब्ध असतात? त्यांचे पत्ते मिळतील का?...!!!
'साहेब असे ते बाजारात मिळत नाहीत...! शिवाय 'मार्कट टाईट' आहे!!! कोण माहिती असलेल्या स्टूरीला हात लावणार?'
'मग अजय देवगण तर याच विषयावर फिल्म काढतायत त्याचे काय?
'आहो, माहित नाही का तुम्हाला? ते लोढणं त्याने आपल्या गळ्यात बांधून घेतलं आहे!!'
'मैं समझा नही?' या विचारणेला, 'वो हीरो है, तो फायनान्सर हट गया तो अब अजय प्रोड्यूसर बना है. उसके इज्जत सवाल हैना बाबा...'
रझाक खानच्या इस्टाईल मधे तो माझ्यावर इंप्रेंशन मारून बोलत असावा'...
...
या सर्वाला श्रद्धेच्या विषयाची एक मजेशीर झालर आहे... ऑटोरायटिंग मधून मला जे संदेश मिळतात त्यातून मार्ग सुचवला जातो.... 'अमक्या अमक्या ला जाऊन भेट माझे नाव सांग तुझे काम होईल!' असे ते नसते...!! पण त्या संदेशातील सूचकतेतून काय करायला हवे याचे मार्गदर्शन होते!!!
आता हे काय नवीन लचांड असे अनेकांना वाटेल म्हणून तो विषय मी नवीन धाग्यातून वेळ मिळाला की मांडेन...

सनातनी's picture

26 Apr 2019 - 6:34 am | सनातनी

छान कल्पना