मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

शशिकांत ओक · · जनातलं, मनातलं

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे. यासंदर्भात ज्यांनी ही कल्पना उचलून धरली आहे अशा काहींची नावे अशी- श्री पांडुरंग बलकवडे, डॉ. सचिन जोशी (डेक्कन कॉलेजमधील एक वरिष्ठ इतिहास तज्ज्ञ), प्रो.प्र के घाणेकर, डॉ सदानंद शिवदे, श्री.आशुतोष बापट, डॉ शेषराव मोरे, डॉ. अजीत जोशी (आग्र्याहून सुटका पुस्तकाचे लेखक), डॉ. राजगुरू, श्री. विशाल खुळे व श्री. उमेश जोशी (इतिहासाच्या पाऊलखुणाचे लेखक), डॉ.रविंद्र लोहोकरे (रायगड वर अभ्यासात्मक डीव्हीडी बनवणारे), श्री मोहन शेटे (दिेवाळीत अनेक गडांच्या प्रतिकृती सादर करणारे). जनरल शेकटकर आणि जनरल पाटील, आमदार जगदीश मुळीक, रानवारा.कॉम चे गडप्रेमी स्वप्निल पवार, व्हर्चुअल टूर ऍपचे निर्माते अमोल चाफेकर आणि अनेक मित्र मंडळीतील सहकारी... मिसळपाववर अनेक जण संगणक विद्यापारंगत आहेत. पैकी काहींनी यापूर्वी वेगळ्या विषयावर मला 5 ऍप्स बनवायला मदत देखील केली होती. तद्वत यावेळी विविध ऐतिहासिक वास्तूंना संगणकाच्या करामती करून त्या मुळरुपात कशा दाखवता येतील यावर त्यांचे तात्रिक बाबींचे सहकार्य व मार्गदर्शन अपेक्षित आहे.

वाचन 20113 प्रतिक्रिया 0