मुलुंड कट्टा… केल्याने पंडितमैत्री !!!

विश्वनाथ मेहेंदळे's picture
विश्वनाथ मेहेंदळे in जनातलं, मनातलं
25 Dec 2013 - 1:10 am

अनेक महिने झाले मुंबईत कट्टा असा झाला नव्हता. काही वेळा ठरतो आहे असे वाटेपर्यंत रद्द झाला होता आणि सलग २-३ डोंबिवली कट्टे झाल्याने पुढील कट्टा खुद्द मुंबईत व्हावा अशी मंडळाच्या काही कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही इच्छा मंडळाचे तरुण सळसळते रक्त मुवि काकांच्या कानावर घातली होती आणि तसे करण्याचे आश्वासन पण मिळवले होते. वाट बघत होतो ती संधीची. काही दिवसांपूर्वी अशी संधी चालून आली. एके दिवशी सकाळी सकाळी मिपावर आल्यावर डॉक्टर खरे यांचा धागा दिसला, कट्ट्याच्या आमंत्रणाचा. इस्पिकचा एक्का हे मिपाकर काही तासांसाठी मुंबईत येत आहेत अशी वार्ता मिळाली म्हणून शनिवारी दुपारी विमानतळाजवळ कट्टा आयोजित केल्याची खबर लागली. धागा वाचल्यावर उरात धडकी भरली, कारण कट्ट्याचे ठिकाण विमानतळाजवळ हवे होते आणि आता काहीजण तो विमानतळ हलवून मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी(?) आणा असे म्हणतात की काय अशी धास्ती लागून राहिली. पण मध्यवर्ती मुंबईकरांनी तशी मागणी केली नसावी, कारण विमानतळ अजून तिथेच आहे :-)

असो, तर शनिवारी भल्या पहाटे ९:३० फोन वाजला. जड डोळ्यांना ताण देत पाहिले तर विलासराव. कट्ट्याचे कुठे ठरले असे विचारण्यासाठी त्यांचा फोन आला होता. आता अजूनपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर फार प्रतिक्रिया दिसत नव्हत्या आणि शिवाय तिथे तपशील पण नव्हते. आयोजक डॉक्टर खरे आणि मुवि काका. दोघांचेही नंबर माझ्याकडे नव्हते. मग २-३ ठिकाणी संदेश पाठवून शेवटी संपर्क झाला आणि कळले की कट्ट्याची जागा बदलण्यात आली आहे. मुलुंड पूर्व येथे बावर्ची हॉटेलला १:३० वाजता या असे सांगण्यात आले.

१२:३० च्या सुमारास घरून कूच केली. विलासरावांना दादर स्टेशन वर भेटलो तर त्यांनी मेकोव्हर केला होता. २० महिन्यांची परीक्रमाफेम दाढी गायब. बरेच दिवसांनी भेटत असल्याने एकमेकांना उप्दते देत मुलुंडला आलो.विलासरावांना ठिकाण माहित असल्याने अल्प कष्टात तिथे पोहोचलो. कोपऱ्यातल्या टेबलावर ४ जण बसले होते. मुवि आणि नूलकर काका सोडता तिथे अजून दोन नवे चेहरे. एक शहाणा सभ्य सरळ दिसणारा युवक आणि एक भारदस्त व्यक्तिमत्व. शहाणा मुलगा म्हणजे भाते हे कळले पण भारदस्त काकांची कुणी ओळख करून देइना. शेवटी आपण होऊन विचारले तर, अरे हे इस्पिकचा एक्का, फोटो नाही हा पाहिलेस असे उत्तर आले. आता आली पंचाईत. कारण मी त्यांची प्रवासवर्णने वाचली नव्हती. वाचली होती ती सर्वात महान प्रवासाची लेखमाला. हे स्पष्टीकरण दिल्यावर १-२ जणांच्या डोळ्यात, काय खुळचट माणूस आहे, इतक्या चांगल्या लेखमाला नाही वाचल्या याने, असे भाव तरळलेले दिसले. एक्का काकांना बघून त्यांनी कधी सिनेमात रोल केला तर जरब असलेला पोलिस अधिकारी किंवा ग्रामीण चित्रपटातील पाटील, सरपंच असा रोल त्यांना स्क्रीन टेस्ट न घेता देतील असे वाटून गेले. भातेचा आवाज फक्त नाव सांगतानाच ऐकला. नंतर त्याला बिचाऱ्याला कुणी बोलू दिले नसावे.

ऑर्डर काय द्यायची हे आधीच ठरवून ठेवले गेले होते, त्यात थोडे फेरफार करून वेटरला ऑर्डर दिली गेली आणि गप्पा सुरु झाल्या. विषय अर्थात मिसळपाव. मग मिसळपाव आणि इतर संस्थळे यांची तुलना हा नेहमीचा यशस्वी विषय आला. मुविंनी आमच्या बंड्याची आवर्जून चौकशी केली. विलासरावांची ब्राझील लेखमाला, परीक्रमेचे अनुभव हे विषय झाले. ४ वर्षे होत आली तरी विलारावांची लेखमाला अजूनही चर्चेत असते. त्यानंतर त्यांनी परत कधीही काही लिहिले नाही यावरून त्यांचे एक छोटेसे बौद्धिक घेण्यात आले. एक्का काकांसारख्या लेखकाकडून त्यात लीड घेण्यात आल्याने विलासराव आता मनावर घेतील अशी आशा. हे सगळे चालू असताना एक्का काकांच्या लेखांवर चर्चा न होणे शक्यच नव्हते. त्यांची महान प्रवासाची लेखमाला मी आजवर वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखामालान्पैकी होती, हे मी आवर्जून नमूद केले.

हे होईतो अजून एक काका दाखल झाले. ज्ञानव अशी ओळख करून दिल्यावर कट्टेकरांना आनंद झाला. नुकतेच शेअर मार्केट वर लिहिलेले त्यांचे लेख आले असल्याने उत्सुकता होतीच. इतक्या लगेच त्यांची ओळख झाली याच आम्हाला आनंद झाला. मग पेठकर काकांची चौकशी झाली आणि ते फेब्रुवारीत येतील तेव्हा कट्टा करण्याचा संकल्प सोडण्यात आला. नूलकर काकांना मी आधी दोनदा भेटलो होतो. एकदा ओरिगामी कट्ट्याला आणि एकदा आम्ही फ्लेमिंगो बघायला गेलो होतो तेव्हा. फ्लेमिंगोंचा शिजन जवळ आल्याने परत एकदा फ्लेमिंगो बघायला जाण्याचा संकल्प सोडण्यात आला. नूलकर काकांनी अजून एक इंटरेस्टिंग कल्पना मांडली. त्यावर अंमल करण्याची संधी लवकर मिळो अशी इच्छा. ही कल्पना काय होती असे विचारू नये. नाही, घाबरु नका, आम्ही मुंबईकर असल्याने अपमान करण्याची धमकी देणार नाही, पण सध्या ही मूठ झाकलीच राहू दे. नूलकर काका आमंत्रण देतील तेव्हा कळेलच.

अपमानावरून आठवले… पुण्याचा विषय पण निघाला. पण एक्का काका समोर असल्याने पुणेकरांची फार निंदानालस्ती केली नाही. पुढील कट्ट्याला कसर भरून काढली जाईल असे वाटते. तितक्यात डोंबिवलीचा ज्याक स्प्यारो आला. कट्ट्याचे ठिकाण बदललेले त्याच्या पथ्यावर पडले, कारण अन्यथा त्याला जमले नसते. मधील काळात वेटर येउन ऑर्डर केलेले पदार्थ देऊन गेला होता. त्यांचा आस्वाद घेणे चालूच होते. थोड्याच वेळात डॉक्टर खरे यांचे आगमन झाले. माणूस लय भारी. दिसायचे म्हणाल तर 'त्वचासे मेरी उम्र का पता नाही चलता' या प्रकारात मोडणारा. ते आल्यावर गाडी परत कुठूनतरी पुण्यावर आली. खरेकाकांनी आपले चार अनुभव सांगून मते मांडली. त्यांचा क्यामेरा भारी होता. त्याच्या optical झूम चे प्रात्यक्षिक त्यांनी कुणाच्यातरी नाकाचा क्लोज फोटो ४ फुटांवरून घेऊन केले. तो फोटो टाकून "ओळखा पाहू कुणाचे नाक आहे" हा खेळ खेळण्याची त्यांची मनीषा आहे हे आम्हाला माहित नव्हते.

इतका वेळ आम्हाला मस्त कडेचे मोठे टेबल मिळाले होते. पण आत तिथे उन यायला लागले होते. म्हणून आम्ही जागा बदलली. त्यात माझ्या एका बाजूला ज्ञानव काका आणि दुसरया बाजूला खरे काका अशी अरेंजमेंट झाल्याने माझी चंगळ झाली. इथे दोन टेबले जोडून घेतली होती तरी आपसूक दोन सबग्रुप पडले. माझ्या टेबलावर ज्ञानव काका, खरे, मी, स्पा आणि नुकतेच आलेले मिपाचे तरुण आणि तडफडणारे…आपलं…. तडफदार नेत्रुत्त्व किसनचन्द्र साहेब शिंदे सरकार. आणि उरलेले म्हणजे एक्का, विलासराव, मुवि, नूलकर, भाते हे दुसऱ्या टेबलावर. आमच्या टेबलावर मग ज्ञानव काका आणि डॉक्टर यांचे वैचारिक आदानप्रदान सुरु झाले. फुकटचा सल्ला मागणाऱ्यांना कसे कटवावे याच्या टिप्स दिल्या गेल्या. त्यामुळे ज्ञानाव काकांकडून माझा portfolio फुकटात revamp करून घेण्याच्या माझ्या बेताला सुरुंग लागला. पलीकडून विपश्यना, साधना, अनुभव असे शब्द ऐकू येत होते. माझा या विषयावरच अन्भव दांडगा असल्याने, तिथे काय चालू असेल याची पूर्ण कल्पना मला आली. हा विषय म्हणजे विपश्यना नाही, तर त्यावर चर्चा. चहा कॉफी चे १-२ राउंड होऊन गेले होतेच. पण आता घड्याळाचा काटा चार ओलांडून गेला होता, त्यामुळे निघणे क्रमप्राप्त होते.

निघण्याआधी खरे काकांच्या हस्ते एक्का काकांना फूल न फुलाची पाकळी म्हणून एक फ़ुल्ल फूल त्यांना देण्यात आले. अरेंजर मुवि काकांची कल्पना. मग नूलकरांनी पण त्यांना एक ओरिगामी फूल दिले. नूलकर काका ओरिगामी मध्ये तरबेज. इतके कि त्यांचे पैशाचे wallet हे चक्क कागदी होते. मी दर महिन्याला नवीन पाकीट वापरतो असे ते विनोदाने म्हणाले. आधी बरेच फोटो झाले होते पण तरीही प्रथेप्रमाणे परत फोटोसेशन झाले आणि पुढील कट्ट्याचे बेत करत एक्का काकांना टाटा करून मंडळी पांगली. खाणे पिणे काय झाले ते नीटसे आठवत पण नाही. कारण तो मूळ मुद्दा नव्हताच. शेवटी कट्टे होतात ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी नाही तर भेटण्यासाठी. अन्यथा आपला उपास असताना दहिसर वरून पार मुलुंड ला ज्ञानव काका का म्हणून आले असते? माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी कट्ट्यांना जातो ते इंटरेस्टिंग माणसे भेटावीत, त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळावी म्हणून.

चाकोरीतले आयुष्य असणारा मी. बहुतेक मित्र संगणक क्षेत्रातले. मिपामुळे मित्रमंडळ आणि अनुभवक्षेत्र विस्तारले. अन्यथा एक ओरिगामी जाणणारा निसर्गप्रेमी, विपश्यनेत गती असणारा आन्त्रप्रिन्यर, लष्करातला डॉक्टर, Anthropology मध्ये अभ्यास असलेला जातिवंत भटक्या असे एक एक इंटरेस्टिंग नमुने कुठे भेटणार होते मला? केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार असे म्हटलेले आहे. त्या दिवशी माझी अनेक पंडितांशी मैत्री झाली. तेव्हापासून मी आपसूकच थोडा जास्त चतुरपणे वागतो आहे असे मला वाटते.

हे ठिकाणवावरसंस्कृतीजीवनमानप्रवासदेशांतरअर्थकारणमौजमजाप्रकटनविचारसद्भावनाअभिनंदनआस्वादअनुभवमतविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

25 Dec 2013 - 1:30 am | प्रभाकर पेठकर

सुंदर, खुसखुशीत आणि तपशिलवार वृत्तांत.
पुढच्या वेळेस वृत्तांत्त आणि छायाचित्र एकत्र येतील असे पाहावे ही विनंती.

नंदन's picture

25 Dec 2013 - 9:07 am | नंदन

सुंदर, खुसखुशीत आणि तपशिलवार वृत्तांत.
पुढच्या वेळेस वृत्तांत्त आणि छायाचित्र एकत्र येतील असे पाहावे ही विनंती.

--- असेच म्हणतो.

केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येत असे फार असे म्हटलेले आहे. त्या दिवशी माझी अनेक पंडितांशी मैत्री झाली. तेव्हापासून मी आपसूकच थोडा जास्त चतुरपणे वागतो आहे असे मला वाटते.

--- व्वा! :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2013 - 2:01 am | विश्वनाथ मेहेंदळे

त्या शेवटच्या वाक्यांवर घासुगुर्जींच्या एका वृत्तांताचा प्रभाव आहे.;-)

विलासराव's picture

26 Dec 2013 - 6:50 pm | विलासराव

1
2
3
4
5
6
7
8

अभ्या..'s picture

27 Dec 2013 - 1:50 am | अभ्या..

मस्त फोटू ईलासराव.
तुमचा मेकओव्हर भारी दिस्तोय. राहू द्या. :)

अभ्या..'s picture

27 Dec 2013 - 1:50 am | अभ्या..

मस्त फोटू ईलासराव.
तुमचा मेकओव्हर भारी दिस्तोय. राहू द्या. :)

खटपट्या's picture

27 Dec 2013 - 9:22 am | खटपट्या

फोटो क्रमांक ३ मधील पदार्थ कोणता ?

प्रभाकर पेठकर's picture

27 Dec 2013 - 9:33 am | प्रभाकर पेठकर

व्हेज सिझलर असावे.

यशोधन वाळिंबे's picture

4 Jan 2014 - 12:32 pm | यशोधन वाळिंबे

फोटो बघून, खूपच भारी वाटलं..
२००५ ते २००९ बावर्ची होटेलच्या बिल्डिंगमध्येच रहायला होतो.. (अहो एवढच काय शेवटच्या फोटोमध्ये आमच्या किचनच्या ग्रीलचा एक तुकडाही डोकावतोय :-D)
असो, गेले ४-५ वर्ष जाण झालं नाही, म्हणून फोटो पाहून नोस्टॅजिक झालो.. बाकी होटेल झाकपाक झालेलं दिसतय,पण पदार्थांचा दर्जा सुधारला काय हो ??
अजून फोटो असतील तर येउद्यात..!!

बॅटमॅन's picture

25 Dec 2013 - 1:40 am | बॅटमॅन

मस्त खुस्खुशीत वृत्तांत!

छायाचित्रे असती तर अजून मजा आली असती. दोन्ही एकत्र पायजे या म्हण्ण्याला आपला दुजोरा.

श्रीरंग_जोशी's picture

25 Dec 2013 - 1:40 am | श्रीरंग_जोशी

विमेंना अनेक धन्यवाद. कट्टा प्रत्यक्ष अनुभवता आला असला तरी हे वर्णन वाचून प्रत्यक्ष उपस्थित असल्यासारखे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

25 Dec 2013 - 2:00 am | अत्रुप्त आत्मा

मस्त !!!

@तितक्यात डोंबिवलीचा ज्याक स्प्यारो आला. :D कट्ट्याचे ठिकाण बदललेले त्याच्या पथ्यावर पडले, कारण अन्यथा त्याला जमले नसते.>>> =))

चाणक्य's picture

25 Dec 2013 - 6:57 am | चाणक्य

फटु कुठायत??

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 9:07 am | ज्ञानव

उत्तम रीपोर्ताज ...

आनंदराव's picture

25 Dec 2013 - 9:28 am | आनंदराव

च्याय्ला, मी नेमका पुण्यात नव्हतो. श्या..
पुधच्या वेलेला नक्की.
बाकी हा लेख छान आहे. तुमच्यावर जळफळाट होतोय. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2013 - 1:51 am | विश्वनाथ मेहेंदळे

च्याय्ला, मी नेमका पुण्यात नव्हतो. श्या..

पण कट्टा मुंबईला होता. तुम्ही पुण्यात असतात तरी काय झाले असते ??? ;-)

बाकी हा लेख छान आहे.

धन्यवाद!!!

आनंदराव's picture

30 Dec 2013 - 8:26 am | आनंदराव

अहो, आलो असतो भेटायला.

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 9:40 am | मुक्त विहारि

आवडला...

त्याच्या optical झूम चे प्रात्यक्षिक त्यांनी कुणाच्यातरी नाकाचा क्लोज फोटो ४ फुटांवरून घेऊन केले.
ओळखा पाहू कुणाचे नाक आहे ते ?

सुबोध खरे's picture

25 Dec 2013 - 9:57 am | सुबोध खरे

हा फोटो अजून पाच पट मोठा(डिजिटल झूम) होऊ शकतो. १२ X ऑप्टीकल आणि ५ X डिजिटल झुम आहे

पैसा's picture

25 Dec 2013 - 10:10 am | पैसा

फोटो आणि वृत्तांत यांचा घटस्फोट झाल्याचे पाहून जिवाला यातना झाल्या. जेव्हा कोणीतरी विमेकाका वृत्तांत लिहिणार असे म्हटले तेव्हा तो २०१४ मधे येणार नाही एवढे बघा एवढेच सांगू शकले होते! २०१३ मधे वृत्तांत आल्यामुळे जीव भांड्यात पडला. डॉ खरेंनी एक्का यांना दिलेला पूस्प्गुच लै आवडला.

आय डी नावाला ला जागून टाकलेल्या काही वाक्यांची नोंद घेतली आहे! =))

नूलकरांचा उपक्रम अभिनव असणार याबद्दल खात्री आहे. वाट बघत आहे. आणखी त्या बिचार्‍या भातेचा साते कशाला केला आहे?

सुबोध खरे's picture

25 Dec 2013 - 10:56 am | सुबोध खरे

पैसा ताई, बरीच वाट पाहून शेवटी मी फोटो तरी टाकावे या विचारणे फोटो टाकले. मुळात मी सिद्ध हस्त लेखक वगैरे नाही त्यामुळे वृत्तांत टाकण्याच्या नादात वृत्ताचा किंवा लेखनाचा अंत होऊ नये अशी इच्छा होती. विमेने उत्तम वृत्तांत टाकून ती पुर्ण केली.

पैसा's picture

25 Dec 2013 - 11:41 am | पैसा

तुम्ही पण नक्कीच छान लिहिलं असतंत! मात्र फोटो आधी आल्यामुळे विमेला लवकर लिहिणे भाग पडले हा मोठ्ठाच फायदा झालाय! नाहीतर विमेच्या लेखासाठी अजून एक वर्ष वाट बघायला लागली असती, किंवा कोणा सदस्याशी भांडण तरी काढावं लागलं असतं. :P :-/

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Dec 2013 - 11:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

आय माय स्वारी भाते... रात्री 1:30 ला टाकलाय वृत्तांत. तेवढे करेक्ट करून द्या ना कुणीतरी...

पैसा's picture

25 Dec 2013 - 11:39 am | पैसा

केला बदल!

आनंद घारे's picture

25 Dec 2013 - 10:46 am | आनंद घारे

वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे वगैरे भागात नवी मुंबईमद्ध्ये कोणी उत्साही मिपाकर राहतात का? एकादा कट्टा इकडेही होऊन जाऊद्या.

भाते's picture

25 Dec 2013 - 11:50 am | भाते

आयत्या वेळी ठिकाण बदलुनसुध्दा मुलुंडला येणाऱ्या मुंबईतल्या मिपाकरांना वाशी, नेरूळ, बेलापूर लांब निश्चितच नाही आहे. ठिकाण, तारीख, वेळ इत्यादी आधीच ठरवुन त्याची माहिती धाग्यावर दिली तर सहज नवी मुंबई कट्टा शक्य आहे.

एक्का काकांना बघून त्यांनी कधी सिनेमात रोल केला तर जरब असलेला पोलिस अधिकारी किंवा ग्रामीण चित्रपटातील पाटील, सरपंच असा रोल त्यांना स्क्रीन टेस्ट न घेता देतील असे वाटून गेले. +१ *biggrin*
बाकी मस्त वृत्तांत .
*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

भाते's picture

25 Dec 2013 - 11:42 am | भाते

विमे काका, छान लिवलंय ओ तुम्ही.

एक महत्वाचा मिपाकरांसाठी जळजळीचा फोटो अजुन आला नाही आहे. त्या फोटोशिवाय वृत्तांत अपुर्ण आहे.
डोंबिवलीकर स्पा यांच्या कडे तो फोटो असल्याने, त्यांनी त्वरित तो फोटो टाकुन वृत्तांत पुर्ण करावा ही विनंती.

प्रसाद गोडबोले's picture

25 Dec 2013 - 1:06 pm | प्रसाद गोडबोले

भारीच आहे वृतांत !!

पण राव मुलुंड मधे असुन मला कळालं कसं नाही :( ...का ओन्ली बाय इन्व्हिटेशन होता ??
...मीही आलो असतो ना ...मी पवईलाच तर राहतो ...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Dec 2013 - 2:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

इन्व्हिटेशन ओन्ली कट्टे मुंबईत सहसा होत नाहीत.
तो मान दुसर्या शहराकडे आहे.

http://www.misalpav.com/node/26432
हा धागा वाचला नाहीत वाटते.

सुबोध खरे's picture

25 Dec 2013 - 7:20 pm | सुबोध खरे

गोडबोले साहेब
मुंबई कट्टा म्हणून मी धागा टाकला होता.सर्वानाच निमंत्रण होते. आपण त्यावर प्रतिसाद दिला असतात किंवा व्य नि केला असतात तर आम्ही नक्कीच आपल्याला वैयक्तिक आमंत्रण दिले असते. more the merrier

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 8:21 pm | मुक्त विहारि

गोडबोल्यांचा मो.नं. घेतला आहे. त्यांचे आणि माझे बोलणे झाले.पुढल्या वेळीस त्यांना न विसरता बोलावू.

@ सुधांशू नुलकर,

पुढचा कट्टा कधी?

जोशी 'ले''s picture

25 Dec 2013 - 1:22 pm | जोशी 'ले'

मस्त झालाय कट्टा ... बाकि नुलकरांच्या ईंट्रेस्टींग कल्पनेच्या प्रतिक्षेत :-)

गणपा's picture

25 Dec 2013 - 2:16 pm | गणपा

असेच म्हणतो.

कालच्या धाग्यातले काही फोटो या लेखात पेरता आले असते तर अजुन मस्त वाटलं असतं. :)

सध्या तरी त्या फोटोंचे कॉपीराईट घेतलेले नाही आहेत.

अपमानावरून आठवले… पुण्याचा विषय पण निघाला
*aggressive*
आता पुण्यात कट्टा भरवतोच.. फक्त मुंबैला नावं ठेवायला.

---
जोक्सापार्ट, मस्त झालाय लेख..

यसवायजी's picture

25 Dec 2013 - 1:49 pm | यसवायजी

हे काय? कंटेंट कुठं गायबला?

राही's picture

25 Dec 2013 - 3:36 pm | राही

लेख आवडला. विशेषतः टपल्या आणि चिमट्या फारच आवडल्या.
चतुराईचे डिक्लरेशनसुद्धा आवडले.

मस्त जमलाय वृत्तांन्त विमे.
भारी.

प्यारे१'s picture

25 Dec 2013 - 5:24 pm | प्यारे१

मस्त वृत्तांत!
कोपरखळ्या, चिमटे, ढुसण्या, रेसलिंग सगळे एकदमच!
जास्त करुन प्रतिसादांमध्येच रमणारा ;) हा नाकवाला माणूस बोर्डावर जास्त का लिहीत नाही ह्या बुचकळ्यात पडल्या गेले आहे.

मी मनातल्या मनात कधी काय झालं असावं चा अंदाज घेऊन फोटो नि वृत्तांताची सांगड घालतोय.

चौकटराजा's picture

25 Dec 2013 - 6:31 pm | चौकटराजा

या उत्तम वृतांताबद्द्ल मी विमेकाकांचा आभारी आहे. पण ते पुण्याविषयी ते काय ? लोणावळ्याला वाघा बॉरर्डरवर कट्टा करा
आमच्या जनरल अआ लाच घेउन येतो .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Dec 2013 - 6:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आम्ही चचा ला घेउन येऊ ;-)

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 6:51 pm | ज्ञानव

पुणेकरांबरोबर असेल तर वाघा बोर्डर काय थेट सदशिवात हि येऊ...

"बाकी पूर्वीसारखे पुणे आता राहिले नाही"

यसवायजी's picture

25 Dec 2013 - 7:11 pm | यसवायजी

ओये
*aggressive*
जिंक जिंक महादेव..

स्पा's picture

25 Dec 2013 - 6:45 pm | स्पा

झकास व्रूतांत :-)

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 7:03 pm | मुक्त विहारि

अहो, ते तुमच्याकडचे फोटो पण टाका...

माझ्याकडे फोटो नाहीत, मी पक्त फोटो काढले

मुक्त विहारि's picture

25 Dec 2013 - 8:17 pm | मुक्त विहारि

ठीक आहे...

भाते's picture

26 Dec 2013 - 5:42 pm | भाते

विमेकाका, तुमच्या क्यामेऱ्यात स्पा यांनी काढलेला 'तो' फोटो इथे टाकावा ही विनंती.

सुधांशुनूलकर's picture

25 Dec 2013 - 7:50 pm | सुधांशुनूलकर

लई झ्याक वृत्तान्त लिवलाय हो विमेकाका!

कट्टा आज पुन्हा एकदा झाला, असं वाटलं... जणू ‘अॅक्शन रीप्ले.’ असे वृत्तान्त वारंवार वाचायला मिळावेत, यासाठीतरी कट्टे वारंवार व्हावेत. (संपादक किसनद्येवा, प्लीज नोट!) तसंच, यानंतरच्या प्रत्येक कट्ट्याला विमेंनी उपस्थित राहून कट्ट्याचा वृत्तान्त त्यांनीच लिहिला पाहिजे, ही आग्रहाची विनंती.

खूप दिवसांनी मिपाकरांची भेट झाली.
आता पुढच्या कट्ट्याची वाट बघणारा,

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर

प्रभाकर पेठकर's picture

25 Dec 2013 - 8:19 pm | प्रभाकर पेठकर

यानंतरच्या प्रत्येक कट्ट्याला विमेंनी उपस्थित राहून कट्ट्याचा वृत्तान्त त्यांनीच लिहिला पाहिजे, ही आग्रहाची विनंती.

अरे व्वा! विश्वनाथ मेहेंदळे साहेब, मिसळपावच ब्यूरोचे अधिकृत प्रेस रिपोर्टर.

प्रभाकर पेठकर's picture

25 Dec 2013 - 8:21 pm | प्रभाकर पेठकर

स्वसंपादित......मिसळपाव ब्यूरोचे......

ज्ञानव's picture

25 Dec 2013 - 8:46 pm | ज्ञानव

नुलकरांच्या आग्रहाच्या विनंतीला माझ्याकडून अनुमोदन

@सुधांशू जी फ्लेमिंगो बघायला जेव्हा केव्हा जाल तेव्हा कळवा मी सह-कुटुंब (२+२) येईन.

कट्टयाच्या वृत्तांताच्या निमित्ताने का होईना परंतू आम्हा सर्व मुलांचे लाडके विमेकाका लिहिते झाले. ;)

कवितानागेश's picture

25 Dec 2013 - 9:06 pm | कवितानागेश

अगदी अगदी. ;)

बॅटमॅन's picture

25 Dec 2013 - 10:00 pm | बॅटमॅन

अग्गदी अस्सेच म्हंटो...

(विमेकाकांच्या पुतणेमंडळीपैकी) बट्टमण्ण.

माझीही शॅम्पेन's picture

25 Dec 2013 - 10:42 pm | माझीही शॅम्पेन

विमे काका लिहाल्याला लागले अजुन काय पाहिजे ..!!!
अचानक आलेल्या काही जबबदारी मुळे कट्याला यायल्या जमल नाही !!! बघुया पुढे :)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 4:06 pm | मुक्त विहारि

खरे तर कट्टा , साकीनाकाच्या आसपास भरवायचे असे शुक्रवार पर्यंत नक्की झाले होते.मी आणि भाते त्यासाठी शुक्रवारी भेटलो.

शनिवारी पहाटे (म्हणजे, भा.प्र.वे. नुसार, स.१०) वाजता उठलो.दात घासता-घासता, मोबाईल बघीतला तर इ.ए. ह्यांचा मिस कॉल आलेला.(त्यांचा कॉल मी मिस केला, हेवेसांनल).चहा पिवून त्यांना फोन केला तर ते अर्ध्या वाटेवर आलेले होते.लगेच डॉ. खरे ह्यांना फोन केला, तर त्यांनी सांगीतले, की त्यांच्या मुलीची तब्येत बरी नसल्याने, ते साकीनाक्याला यायची शक्यता कमी आहे.

लगोलग इ.ए. ह्यांना विचारले , की ते मुंबईला कुठे येणार आहेत.तर त्यांनी सांगीतले, मुलुंड.

इधर हमारे दिमागकी बत्ती जल गई.

आणि मग ऐनवेळी कट्टा मुलुंडला करायचे ठरले.

ही सगळी यातायत का?
तर एकाचवेळी दोन-दोन डॉ.ना एकाच व्यासपीठावर भेटायची आम्हा सगळ्या मिपाकरांना ओढ होती म्हणून.

मागच्या वेळेप्रमाणे हे बिल पण डॉ. खरे ह्यांनी दिले.आता त्याची फिट्टंफाट म्हणून अजून एक कट्टा ५/६ जानेवारी सुमारास करायचे घाटत आहे. सौजन्य, प्रमोद देर्देकर.

भाते's picture

26 Dec 2013 - 5:48 pm | भाते

धाग्याची वाट पहातोय. यावेळी तरी आयत्या वेळी गडबड न होता आधी ठरलेल्या ठिकाणी/वेळी कट्टा होईल (?) ही माफक अपेक्षा.
वृत्तांत देण्यासाठी अर्थातच विमेकाकांची उपस्थिती आवश्यक.

एखाद आठवडा पुढे ढकलता येतंय तर बघा जरा. एक तारखेला मुंबैला आल्यानंतर पुन्हा पाच-सहा तारखेला फेरी मारायची म्हणजे....!! जमलं तर हो, नायतर काय शुभेच्छा देईन बापडा नेहमीसारख्याच. ;)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2013 - 6:55 pm | मुक्त विहारि

धागा टाकणार आहेत.

त्यावेळी ता. पुढे-मागे करता येईल.

शक्यतो ता. पुढेच ढकलू या. कारण आपण सगळेच ३१ आणि १ बिझी असतो आणि पुढचा आठवडा परत नॉर्मलला येण्यात जातो.

सुबोध खरे's picture

26 Dec 2013 - 6:59 pm | सुबोध खरे

पाच सहा तारखेस मी पण मुंबईत नाही. कट्टा जमल्यास एक आठवडा पुढे ढकलता आला तर बरे नाही तर शुभेच्छा आहेतच.

असंभव...

आणि शिवाय सूड पण आहेच...अज्जून काय हवे...

ठीक आहे.. कट्टा ११/१२ जाने. च्या सुमारास करूया.

(मिपाचे भोगी संमेलन असे नांव ठेवायला पण हरकत नसावी.)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2013 - 1:58 am | विश्वनाथ मेहेंदळे

मागच्या वेळेप्रमाणे हे बिल पण डॉ. खरे ह्यांनी दिले.

पुढचे किमान ५/६ कट्टे डाॅक नी खिशात हात घालू नये असा प्रस्ताव मांडतो.

विलासराव's picture

30 Dec 2013 - 9:29 pm | विलासराव

विमेंशी सहमत

ज्ञानव's picture

30 Dec 2013 - 10:06 pm | ज्ञानव

आणि विलासराव दोघांशी सहमत.

चकलीला मोहन परफेक्ट पडलं की चकली जितकी खुसखुशीत होते तेवढा खुसखुशीतपणा वृत्तांतात आला आहे. बाकी नूलकर काका कसलं आमंत्रण देतायेत त्याकडे लक्ष ठेवून आहेच. काही अपरिहार्य कारणास्तव पुणे आणि मुंबई दोन्ही कट्टे हुकल्याची हळहळ वाटत आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2013 - 10:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काही अपरिहार्य कारणास्तव

हम्म्म्म्म !!!
खावेत कांदेपोहे कधिमधी. बरे असतात प्रकृतिला... ;-)

साती's picture

27 Dec 2013 - 1:42 pm | साती

मस्तं वृत्तांत.
नूलकर काकांच्या पाकिटाचा फोटो काढला असल्यास टाका?

आमच्यासाठी फोटोतल्या लोकांची ओळख करून द्या.

पराग पाटील's picture

27 Dec 2013 - 11:00 pm | पराग पाटील

आमच्या मुलुंड ला कट्टा झाल्याचे वाचून आनंद झाला,मी तिथे नसल्याने येउ शकलो नाही. वृत्तांत मस्त जमला आहे..पुढच्या कट्ट्यासाठी शुभेछ्छा!

मुक्त विहारि's picture

27 Dec 2013 - 11:12 pm | मुक्त विहारि

"पुढच्या कट्ट्यासाठी शुभेछ्छा!"

का?

तुम्ही ठरवा की, आम्ही आलोच बघा.

पराग पाटील's picture

28 Dec 2013 - 1:54 am | पराग पाटील

मी भारताबाहेर असतो, भारतवारीत कट्टा करायला नक्की आवडेल.

ज्ञानव's picture

29 Dec 2013 - 1:01 pm | ज्ञानव

वाचलात. पाटीलसाहेब म्हणले असते या कि करूया हिथ...लंडनला स्वखर्चाने..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

30 Dec 2013 - 10:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

वृत्तांताचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
दर वेळेला वृत्तांत मी लिहायची सुचना वाचून पैसाताईंच्या चेहर्यावर काय भाव उमटले असतील याची कल्पना करतोय :-)

माझा लिहायाचा वेग जाम कमी आहे. लोकं एकटाकी कसे काय लिहीतात देव जाणे. कट्ट्याच्या वृत्तांतात उशिर करता येत नाही. असो, पुढचे पुढील वेळेस बघू. सद्ध्या तरी कट्टे परत सुरू झाले याचा आनंद साजरा करतो आहे.

ज्ञानव's picture

31 Dec 2013 - 9:08 am | ज्ञानव

पुतणे पुतणे पुताण्यांचे दुखणे (संदर्भ : दुनियादारी)
एक काम करू वृतांत भरायला घ्या. जरा चूर चुरीत झाला आणि संपत आला की कट्टा कुठे करायचा ते ठरवू.
काय? (काहीच्या काय)

पैसा's picture

4 Jan 2014 - 2:52 pm | पैसा

पुढच्या वेळी कट्टा होणार म्हणून बातमी आली की, "विमे, वृत्तांत लिहिलास का?" म्हणून विचारायला सुरुवात करीन! हाकानाका!

सुधीर's picture

30 Dec 2013 - 11:15 pm | सुधीर

माझ्या राहत्या एरीयात कट्टा झाला, पण भेटता नाही आलं. संधी गमावली. :(

स्वाती दिनेश's picture

4 Jan 2014 - 3:40 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत वृत्त्तांत!
स्वाती

टवाळ कार्टा's picture

5 Jan 2014 - 12:20 pm | टवाळ कार्टा

आयला...मी मुंबैमधे असताना कधीच कट्टा नसतो :(

मुक्त विहारि's picture

5 Jan 2014 - 6:47 pm | मुक्त विहारि

"मी मुंबैमधे असताना कधीच कट्टा नसतो"

तुम्ही येण्यापुर्वी धागा काढा, आपण करू या कट्टा...

किसन शिंदे's picture

5 Jan 2014 - 7:51 pm | किसन शिंदे

आयला...मी मुंबैमधे असताना कधीच कट्टा नसतो

चुक. मुंबईत कट्टे असताना आवतान देवूनही तुम्ही कधीच येत नाही, असं म्हणायला हवं खरं तर. :D

टवाळ कार्टा's picture

6 Jan 2014 - 8:01 pm | टवाळ कार्टा

"त्या" वेळी मी नेमका केरळमध्ये होतो :(

प्रास's picture

5 Jan 2014 - 5:56 pm | प्रास

कट्टवृत्तांतचा तुफानी आविष्कार!

आवडला.

प्रास's picture

5 Jan 2014 - 5:58 pm | प्रास

कट्टावृत्तांताचा*