अरून सवास, सायं सवास! भाग - २

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
7 Jun 2008 - 12:15 am

अरून सवास वरून पुढे चालू...
सायं सवास - संध्याकाळचे अभिवादन करण्याची थायलंडमध्ये इतकीशी काही पद्धत नाही पण तुम्ही थायलंडमधले नसाल तर हे अभिवादन कानी पडतं. थायलंडमधलं विदेशी पर्यटकांचं प्रमुख आकर्षण म्हणजे 'फ्लोटिंग मार्केट'. नदीच्यालगत काढलेल्या कालव्यांतून इथे लहान मोठे बाजार भरतात. फळं, फुलं , भाज्या, कपडे, टोप्या, छत्र्या, थाई रेशीम, शोभेच्या वस्तू इतकंच काय अगदी नूडल्स पासून केळ्याचं साटंही इथे चाखता येतं! सफर कबाजाराची एक चक्कर मारायला नावेतून जायला माणशी १०० बाह्थ लागतात. (१ बाह्थ - थाई चलन = १.२५ रू).
काही प्रकाशचित्रे -
निघालो बाजारा...

भाऊगर्दी!

आधी पोटोबा

गाँन् - सिप् गाँन् (१० - १२) प्रकार!

खाऊन तर पहा!

जिस गली में तेरा घर ना हो बालमा, उस गली से हमको गुजरना नहीं!

मा फलेषु... ?

सावर रे- ऊंच झुला

कालव्याच्या काठावरच्या घरासमोरचे तुळशी वृंदावन.. आपले बुद्ध - वृंदावन.

नो ट्रॅफिक!

मला बघून विचार करत असावी - नुस्ता फोटूच काढणार की काही विकत पण घेणार

एक धागा सुखाचा ....

साखरेचे खाणार !


फ्लोटिंग मार्केट मधेच एका नावेत हा मस्त गोड पदार्थ विकत घेतला. तांदळाच्या डोश्यासारख्या छोट्या द्रोणांत पपईचा कीस, खवलेल्या नारळाची गोड पेस्ट आणि साखर. जीभेवर ठेवताच विरघळायला लागतो असा हा खाद्यप्रकार!

याचसोबत थायलंडमध्ये अगदी हमखास मिळणारा लोकप्रिय खाद्यपदार्थ चाखला - लोती (रोटी) . पण ह्याचा पोळी अथवा रोटीशी फारसा संबंध नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास साध्या डोश्यात "बुढ्ढीके बाल" भरा आणि त्याची गुंडाळी करून खा! खायला मजा येते.

मी हाय कोली
समुद्रमंथनातून काहीका निघालं असेल, मात्र ओहोटीच्यावेळी समुद्रकिनारी मिळणारे जीव आणि सी-वीडस् यांचा हा रूचकर पदार्थ मस्त होता.

आणि मासा! (ह्यापेक्षा त्याचं अधिक वर्नन करणं म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखं आहे! )

अरेच्चा, आत्ता होता! गेला कुठे?
वरच्या फोटूंतील पदार्थ आणि नदीतला मोठा खेकडा असा बेत तीन माणसांत होता. सगळं फस्त! आणि मस्त!

जपानचे खानपान

थायलंडमध्ये जपानी खाण्यावर प्रेम करणारे बरेच खवय्ये आहेत. मला व्यक्तीशः जपानी खाणं खास वाटलं नाही. पण खाता न येण्याइतकं वाईट तर नक्कीच नाही. ह्या खाण्यातही एक थाटामाटाचा प्रकार आहे. ह्यात हिरव्या कच्च्या भाज्या, मांस, नूडल्स, चटणी , रॉ सी-फुड, तोफू यांची चळत आणून देतात.
टेबलाच्या मध्ये विजेवर चालणारी अगदी निटस हॉटप्लेट असते. यात पाणी गरम करून वरचे पदार्थ घालून खात रहायचे.
सोबत नूडल्स आणि सुशी.सोबत आम्ही खाल्ला तो खाना म्हणजे रोस्टेड डक! दील खुश हो जाता है!
१)

२)

३)

४)

५)

अप्रस्तुत तरी अपरिहार्य
मांसाहार खाणं म्हटलं आणि त्यात बीफ म्हणताच त्रागा करणारे लोक आहेत. त्यामुळे एखादवेळेस बीफ अप्रस्तुत वाटेल पण खाण्याचे लाड असल्याने त्याची आठवण अपरिहार्य आहे.

तसं म्हणावं तर हा प्रकार वातड. त्यातही टी-बोन, न्यूयॉर्क असे प्रकार आहेत. थायलंडमध्ये गाय आणि डुक्कर तेतक्याच चवीने खातात. त्यापेकी जे बीफ खाल्ले ते वर चित्रात आहे. पोर्क त्यामानने बरं लागतं.

अदरक मारके!
आल्याचा गरम तिखट रस त्यात लिंबू आणि साखर आणि त्यात अगदी मुलायम तोफू!

ह्याने घसा सुटला नाही तर नवल. अशी हुकमी खादाडी करायला तुम्हाला थाई मित्र-मैत्रिणींसोबतच फिरावं लागेल.

कावासान - बँकॉकमधली खाऊगल्ली
रस्त्यावरचं चमचमीत खायचं असेल तर कावासानला जावं.

नूडल्स, सूप, भात इथपासून चिकन, पोर्क, मासे ते अक्षरशः तळलेले, भाजलेले चतूर, बीटल्स, साप ह्यातलं काहीही खायला मिळेल इथे! ( हो हो खायला, तुम्ही बरोबर वाचत आहत ;) )

तरंगते रेस्तराँ
बँकॉक मधल्या नदीच्या काठांवर मोजकी तरंगती रेस्तराँ आहेत. लाकडी पायांवर बांधलेली ही रेस्तराँ नदीच्या पाण्यावर तरंगत असतात. त्यापैकी एकात मासे खायचा योग होता-

चित्रातल्या मध्यभागी चिकन रस्सा. तो सतत गरम रहावा म्हणून ज्योतीने गरम करायला खास पात्र! हा पदार्थ थायलंडमध्ये अगदी आवर्जून मागवतात. डावीकदच्या पुढच्या ताटलीत मासा. मागच्या ताटलीत अननस -भात - बिर्याणी. उजवीकडच्या ताटलीत नारळाच्या पानांमध्ये बांधून शिजवलेली कोलंबी.

थायलंडमध्ये स्टिक्स-कांड्या घेऊन खायला शिकायला मला ३-४ दिवस लागले. पण चमच्याने खाण्यापेक्षा याची सवय करणंच चांगलं. थायलंडपध्ये प्रत्येक ठिकाणी काटा चमचा मिळेलचं असं नाही. थायलंडमध्ये थाई थंड कॉफी प्यावी. मधुमेही व्यक्तींनी मात्र याच्या वाट्याल जाऊ नये. मातीच्या भांड्यात जर केली असेल तर चव न्यारीच. पण भरपूर गोड.

पुढच्या भागात खाओ हाई नॅशनल पार्क आणि काही इतर स्थळांबद्दल लिहीन...

वावरसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरमौजमजाआस्वादअनुभवमतमाहितीसंदर्भविरंगुळा

प्रतिक्रिया

पक्या's picture

7 Jun 2008 - 12:33 am | पक्या

मस्तच चित्र सफर. माशाच्या आकाराची डिश खासच. जपानी खानपान मध्ये वर्णन केलेला खाद्यप्रकार/खाद्यक्रिया म्हणजे स्टीमबोट. .हो ना. आपणच आपले पदार्थ उकडून / उकळून घेउन खायचे. मीठ - मीरपूड सोडल्यास इतर काही मसाले नसतात त्यात.
अर्ध्या अननसाचा डीश सारखा केलेला वापर पण खास. सर्व फोटोज छान.

शितल's picture

7 Jun 2008 - 12:52 am | शितल

सचित्र माहिती छान
फोटो ही अगदी खास आहेत, आणि फळा॑नी भरलेली नाव तर अगदी सही.

भाग्यश्री's picture

7 Jun 2008 - 8:10 am | भाग्यश्री

मला पण अननसाचा भांड्यासारखा वापर आवडला.. सगळीच चित्रं मस्त!

http://bhagyashreee.blogspot.com/

यशोधरा's picture

7 Jun 2008 - 9:36 am | यशोधरा

सह्ही फोटो टाकले आहेत ॐकार!! मस्त!! बसल्या जागी थायलंडची सफर झाली!! बुद्ध वृंदावन मस्तच :)

बेसनलाडू's picture

7 Jun 2008 - 10:02 am | बेसनलाडू

फोटोज बघून भूक लागली :)
(खादाड)बेसनलाडू

मदनबाण's picture

7 Jun 2008 - 10:04 am | मदनबाण

ॐकारराव मस्तच !!!!!,,,फोटो मस्त आहेत.....
ताटलीत अननस -भात - बिर्याणी हा एकदम सॉलिड प्रकार दिसतोय.....

(अननस प्रेमी)
मदनबाण.....

अरुण मनोहर's picture

7 Jun 2008 - 12:18 pm | अरुण मनोहर

ॐकार , फोटो फारच छान आहेत. आम्ही पण त्या कॅनॉल मधून खूप भटकून आलो होतो, त्याची आठवण झाली.