सुखवार्ता

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
22 Nov 2019 - 4:49 pm

समाजात अनेक जण विविध क्षेत्रांत पारंगत असतात. काहीजण तर त्या कामातून कुठलाही आर्थिक वा अन्य लाभ मिळत नसतानाही ते मन लावून करीत असतात. अशा कार्याला कुणी समाजसेवा म्हणेल तर कुणी 'लष्कराच्या भाकऱ्या' म्हणेल. अश्याच काही हटके व्यक्तीमत्वांची दखल घेवून, या सुखवार्ता शेअर कराव्या असं ठरवलंय

वावरप्रकटन

बटर गार्लिक मश्रुम प्राँस

गणपा's picture
गणपा in पाककृती
22 Nov 2019 - 3:20 pm

नमस्कार मंडळी,
कसे आहात सगळे? खाता पिताय ना?
बरेच दिवसांनी हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तरी आपलं मानुन घ्या.

साहित्य :

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Nov 2019 - 11:23 am

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा
-------------------------------------------
१}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक
*
दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता
समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता
शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला
व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला
भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ?
जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ? हुस्न्या चित्रे समजावत होता
हुस्न्या - मला सारे समजते पण तिच्यावर लहानपणा पासून प्रेम करत होतो आपण -ती जगात नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही

कथाप्रकटन

India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा

गणेशा's picture
गणेशा in राजकारण
19 Nov 2019 - 5:18 pm

India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा

पार्श्वभुमी

चित्रपट परीक्षण/रिव्यू : फत्तेशिकस्त : दमदार सर्जिकल स्ट्राइक

bhagwatblog's picture
bhagwatblog in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 4:58 pm

“शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥ शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥ शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥ शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥“ शिवराया बद्दल कितीही पुस्तके लिहिली आणि कथा चित्रपटात दाखवल्या तर कमीच पडेल. राजांची प्रत्येक लढाई, पराक्रम, कर्तृत्व, माणसं जिंकण्याची कला, आणि बुद्धीबळातील अजोड चाली प्रमाणे खिंडीत गाठून शत्रूवर केलेली मात यावर चित्रपट निघू शकतो. राजांचे उत्तुंग कर्तृत्व आणि पराक्रम आभाळाच्या परीघा सारखा होता.

चित्रपटसमीक्षा

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 8:31 am

प्रेम एक अनुभुति..सायुज्जते कडे जाण्याचा प्रवास...

*

प्रेम भावना हि सा~यांनाच हवि हविशी वाटणारी आहे.."पहिलिच भेट झाली,पण ओढ हि युगाची"अशी हि भावना असते..क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा" हे गडक~यांचे म्हणणे किति सार्थ आहे.

आपण कुणावर तरी प्रेम करावे..अन कूणी तरी आपणावर जिव तोडुन प्रेम करावे हि मानवाचि उपजत अन निसर्ग दत्त अशी भावना आहे..असते..

*

प्रेमाचि सुरवात आपल्या विचारां पासुन होते..प्रेमाच्या विचाराचे तरंग मनात आले कि प्रेमाचा विचार सुरु होतो...मनात घोळणा~या प्रेमाच्या विचाराने प्रेमाची अनुभुति, व प्रेमानुभव निर्माण होतात.

*

प्रेमकाव्यविचार

एक घटना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Nov 2019 - 8:17 am

एक घटना
.................
दुपारची वेळ होती -मी पेपर वाचत होतो
ते व्हढ्यात तिने माझी खोडी काढली
एका सेन्सेटिव्ह विषया वर माझी खिल्ली उडवली
मला संताप आला
मी तिचा प्रिय फ्लॉवर पॉट जमिनीवर आपटत फोडून टाकाला
माझ्या अनपेक्षित कृतीने ती चक्रावली
व तरातरा आली अन माझ्या पाठीत चार पाच गुद्दे घातले
मी काही बोललो नाही
बराच वेळ आम्ही आतून धुमसत होतो
मग मी शांत झालो
व चपला घालून बाहेर पडलो
कुठे निघालास ??
गप्प बस तुला काय करायचा ???
खर तर मला खूप वाईट वाटत होते खूप खुश असायची ती

नाट्यप्रकटन

मुंबईचे धडे - ४

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 4:07 pm

मुंबईचे धडे - ४
मुंबईचे धडे - १ http://misalpav.com/node/43794
मुंबईचे धडे - २ http://misalpav.com/node/43805
मुंबईचे धडे - ३ http://misalpav.com/node/43868

मुक्तकअनुभव

कीप डॉक्टर अवे..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
18 Nov 2019 - 12:55 pm

मी सध्या सत्तर वर्षांची झालेली असल्याने, म्हातारडी, थेरडी वगैरे झालेली आहे. सभ्य भाषेत ज्येष्ठ नागरिक. वयपरत्वे माझे सर्व अवयव दुखत असतात. मी तिकडं लक्ष देत नाही.
म्हातारपणी दुखायचंच म्हणून समाधान मानून घेते. माझे गुढगे दुखतात इथंपर्यंत ठीक आहे. पण माझी बोटं दुखतात, विशेषतः दोन्ही हातांचे अंगठे दुखतात, हे वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल.
अंगठे हा काय दुखावा असा अवयव आहे का? उद्या भुवई दुखेल, नखं दुखतील, कानाची पाळी दुखेल!

जीवनमानविचार