आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे
आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे
आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १
तितली रानी तितली रानी
मुझको दे दो अपने पर
पर लगाके उड जाऊंगी
अपनी नानी के घर
मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं.
लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल.
माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.)
रसरशीत बालुशाही ...
राम राम मिपाकर्स ,
खूप दिवसांनी पाककृती विभागात लुडबुड करण्याचा योग आला ,थोडं भीत- भीतच ही रेसिपी बनवण्याचं धाडस केलं होत. खाणेबल बनेल कि नाही याचीच शाश्वती नव्हती म्हणून स्टेप बाय स्टेप फोटो काढायचे राहूनच गेलं ,पण यकींन मानो इतका मस्त आउटपुट मिळेल असं स्वप्नात पण नव्हतं वाटलेले, मी बनवली म्हणजे कुणीही बनवेल सहज , तर मग घ्या करायला रसरशीत बालुशाही ती पण हलवाईला मागेल टाकेल इतकी खुसखशीत न स्वादिष्ट !
"पोर"खेळ
आजकाल गावांची शहरे झाली, घरांच्या इमारती झाल्या, कौले जाऊन स्लॅब आला आणि जग कुठच्या कुठे गेले. पण, काहीही बदलो, चिमुलवाडा आणि त्यातली माणसं मात्र जशीच्या तशी उरलीयेत. दारातल्या गावठी कुत्र्याची चेन आता लॅब्राडोरच्या गळ्यात, तर माऊ, काळूच्या जागी पर्शियन मांजरांनी शहरात ठाण मांडले आहे. आता हे जुन्या गावचे सगळे मोती, टॉम वा माऊ, काळू चिमुलवाड्याचे आश्रित झालेत!
"तो" आणि "ती"
ऑक्टोबर महिन्यातल्या कडक उन्हाचे दिवस होते. म्हाळ महिना चालू होता. परोब काकांकड़े आज म्हाळ करण्याचे ठरले होते. देवळातल्या साधले भटास लागणारे साहित्य आणि बाकी भट आणण्याची जबाबदारी दिली होती. घरात सगळीकडे लगबग सुरु होती. घराच्या उजव्या बाजूला, परसात ४ चुली तयार होत्या. कुमार मिलिंद त्यात जाळ करण्यासाठी घरातल्या शेगडीवरून पेटती कट्टी झेलवत झेलवत आणत असता त्यातील एका किटाळाणे साधले भटाने आणलेल्या एका भटाच्या धोतराला खिंडार पाडून खळबळ माजवली. धोतर पेटायच्याच मार्गावर होते !
अन रात झाली शाम्भवी
अलवार त्याचा अस्त झाला
अन रात झाली शाम्भवी
चांदवा घेऊन तारे
जणू सूर छेडे भैरवी
कोण या हृदयात आले ?
वाट शोधून ती नवी
प्रहर भासे वेगळा जणू
अंतःपुरा उगवे रवी
गुंजते सुमधुर कर्णी
नाद लावे भार्गवी
श्वास गेले लोपुनी
अन चित्त झाले पाशवी
भेट होता लोचनांची
आत फुटली पालवी
बहरला तो प्रेमवृक्ष
दृष्टी सृष्टी हिरवी
=======================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
जग सारे सुंदर व्हावे?
जग सारे सुंदर व्हावे?
-----------------------------------------------------------------------------------------------
आज शाळेचा पहिला दिवस होता. अंजली खुशीत होती. तिला मुलं आवडायची. ती एसटीमध्ये बसली होती. बसायला जागा मिळाली तसे तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा चेहरा होता. निधी, तिची मुलगी. नुकताच पहिला वाढदिवस झालेली. नाजूक अन गुटगुटीत.
एसटी थांबली. ती शाळेत निघाली. स्टॅन्डपासून शाळा पंधरा- वीस मिनिटांच्या अंतरावर होती . ढग यायला लागलेले. पण पाऊस नव्हता.
विरह X शब्दकथा
रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते.
किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला-
बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.