दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Nov 2019 - 11:23 am

दिलीप चित्रे व जॅकलिन - अधोविश्वातली {Underworld}एक प्रेमकथा
-------------------------------------------
१}जान्हवी चा मृत्यू व हुस्न्या खाटीक
*
दिलीप चित्रे बार मध्ये बसला होता
समोर हुसेन खाटीक त्याचा जुना शाळेतला मित्र होता
शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला
व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला
भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ?
जान्हवी भाभी थोडी ना वापस आने वाली है ? हुस्न्या चित्रे समजावत होता
हुस्न्या - मला सारे समजते पण तिच्यावर लहानपणा पासून प्रेम करत होतो आपण -ती जगात नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही
बोलताना चित्रेच्या डोळ्यात पाणी तरारले
*
२}दिलीप चित्रे व चौबळ - व्यक्तिरेखा
*
देवदत्त चित्रे नगरपालिकेत कामाला होते
दिलीप त्यांचा एकुलता एक लेक
दिलीप ची आई आजारी असायची -बाबांकडून बोलताना ऐकले होते तिच्या हाडात बाळन्त रोग मुरला होता -दिलीप ला फार काही कळले नाही पण आई आजारी एव्हढेच त्याला समजले
आई अन खास करून बाबा च दिलीप वर व दिलीप चे बाबा वर जीवापाड प्रेम होते
चित्रे नगरपालिकेत अर्थ विभागात कामाला होते त्याना शेअर्स व मार्केट मध्ये खास रुची होती
त्यांनी जमेल तसे अनेक जुन्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेऊन ठेवले होते
त्यातून ब-या पैकी अर्थ प्राप्ती पण होत असायची
एकंदरीत त्यांची आर्थिक परिस्थिती बरी होती म्हणायची
नगरपालिकेच्या कॉलनीत त्यांच्या ब्लॉक ला लागूनच रघुनाथ चौबळांचा ब्लॉक होता
ब्लॉक कसला वन रम किचन च खुराड
रघुनाथ ची पत्नी या जगात नव्हती त्यांना एक कन्या होती जान्हवी
पत्नी निधन व विरहाने रघुनाथ ला वैराग्य आले होते
सर्व कर्मे तो ना खेद ना खन्त या भावनेने करत असे
जीवनावर निराशेचे मळभ आलेले होते
जान्हवी दिसायला सुदर होती रेखीव नाक डोळे घनदाट केस लोभसवाणी चेहेरे पट्टी
दिलीप जान्हवी दोघेही समवयस्क होते
दोघेही एकाच शाळेत जायचे
दिलीप ची शाळेतच हुसेन शी मैत्री झाली दोघेही एकाच वर्गात होते
जान्हवी निराळ्या वर्गात होती तिची तुकडी निराळी होती
जान्हवी ला दिलीप खूप आवडायचा
तसा तो होताच स्मार्ट पाच फु सात इंच उंची गौर वर्ण मस्त भाग पाडलेला
चित्र व चौबळ दोघांनाही सून जावई पसंत होते
दोघान्चा विवाह व्हावा असे त्यांना वाटत होते
काळ पुढे सरकत होता चवथीचे वर्ष होते
जान्हवी महाराष्ट्रात स्कॉलर शिप च्या परीक्षेत पहिली आली
मात्र दिलीप ३५% गुण मिळवून कसाबसा पास झाला होता
त्या वेळी दिलीप ला जाणवले आपले डोके अभ्यासात चालत नाही
शिकवलेले त्याच्या डोक्यात उतरत नव्हते
त्याची अभ्यासातली रुची कमी झाली
म्याट्रिक चा निकाल लागला जान्हवी बोर्डात आली शाळेत ती पहिली आली
शाळेत तिचा सत्कार झाला
दिलीप थर्ड क्लास मध्ये पास झाला
मात्र जान्हवी यश पाहून तो सुखावला
तिचे कौतुक करताना त्याला आनंद वाटला
चित्रे तू नर्व्हस नको होऊस -शाळेत न चमकलेली मुले पुढे कॉलेज मध्ये चमकतात - ती म्हणाली
छे ग नर्व्हस वगैरे काही नाही -आपलं डोकं शिक्षणात चालत नाही हे समजलं -कॉलेज मध्ये येईल हि पण दन्गा करायला चित्रे हसत म्हणाला
दिलप्या तू पण ना लै भारी आहेस जानव्ही म्हणाली
तुला माहीत आहे मला दिलप्या म्हटलेल आवडत नाही -पण तुला माफी तू आपली खास मैत्रीण आहे
३}जानव्ही चौबळ व अतुल कारखानीस
*
चित्रे नी कसेबसे कॉलेज चे वर्ष पूर केलं व कॉलेज ला रान राम ठोकला
जानव्ही मात्र कॉलेज मध्ये चमकत राहिली
बारावीला टॉपर्स लिस्ट मध्ये येऊन तिने कॉम्पुटर सायन्स ला ऍडमिशन घेतली व अव्व्ल नम्बर चे गुण पटकावून तिने डिग्री हशील केली
व पुढे जालनापूरकर सरांच्या हाताखाली काम करत डॉक्टरेट पण मिळवली
तिने लिहिलेले पेपर्स प्रकाशित झाले व ती चर्चेत आली
एके दिवशी बाबानी तिला लखोटा दिला
त्यात तिला नासा न निमंत्रण दिलेले होते पेपर वाचन व चर्चे साठी
जानव्ही चार आठवड्या साठी अमेरिकेस रवाना झाली
जानव्ही अमेरिकेतहून आली अन तिच्यात आमूलाग्र बदल घडलेला दिसला
ती सूंदर तर होतीच पण आता बुद्धिमत्तेची चमक तिचा चे-यावर आलेली होती
नजरेत आत्मविश्वासाची झळाळी होती
त्याच सुमारास तिची अन अतुल ची भेट झाली
अतुल कॉम्पुटर ग्रॅज्युएट होता
भारत सरकारच्या फॉरेन्सिक सायबर क्राईम सेल मध्ये उच्चं पदावर कामाला होता -क्रेडीट डेबिट कार्ड फ्रॉड -एटीएम लुटालूट -व लाईन फ्रॉड
आदी कारणा-यांना शोधून काढणे त्याच्या हातचा मळ होता
डिपार्टमेंट मध्ये त्याच्या नावाचा दबदबा होता
गाठी भेटी वाढत राहिला हृदयाच्या तारा जळाल्या अन प्रेम झनकारले
दोघांनी विवाह बंधनात स्वताला आडकावत नेवे आयुष्य जगण्याचे ठरवले
चित्रे ला तिने आधी ती गोडं बातमी दिली
चित्रेला मनापासून आनंद झाला त्याने तिचे अभिनंदन केले
दिलप्या एक विचारू ? नाराज तर होणार नाहीस ना ?
तू नाराज तर झाला नाहीस ना ? मला उगाच अपराध्या सारखं वाटत आहे
जानव्ही म्हणाली
छे ग -कॉलेज मध्ये असतानाच मी तुझी अभिलाषा सोडली होती
सौंदर्य बुद्धिमत्ता या बाबतीत मला तुझ्या नखाची पण सर नाही
तुझ्या लायक बनणे मला कदापिही शक्य होणार नाही
हे माहीत आहे तर मग अप्राप्य गोष्टीचा लालसा का धारावी ?
तू अजिबात अपराध्या सारखे वाटून घेऊ नकोस - चित्रे म्हणाला
थ्यांक्स चित्रे -माझ्या मनात एक अपराधी पणा ची भावना होती ओझे होते
ते आता हलके झाले -त्याचे हात हातात घेत ती म्हणाली
अतुल व ती विवाह बंधनात अडकले व त्यांचे सहजीवन सुरु झाले
*
४}इस्माईल दामोदर शेठ व अपघात षडयंत्र
अतुलच्या लग्नाला ६ महिने होत होते
जानव्ही अन तो आकंठ संसार सुखात बुडाले होते
जानव्हीच्या चेहे-या वर एक तृप्तीचा भाव होता
चेहेरा समाधानी व उजळला होता
दोघेही आपापल्या कामाला लागले होते
संसारात रुटीन सुरु झालं होते
शेट दामोदर इस्माईल व त्याचा एक साथीदार शेट च्या ऑफ्स मध्ये ज्मा झाले होते
गुप्त खलबते चालू होती अन एक भयानक बेत शिजत होता
हे बघ इस्माईल तू काय बोलते ते आपल्या ध्यानामंदी येत नाय -आपल्याला समजेल अश्या भाषेत वार्ता कर -दामोदर म्हणाला
हे भघा आपल्या देशात कोट्यावधी अशी ब्यांक अकाउंट्स आहेत जी डेड आहेत -म्हणजे एक तर ग्राहक ती वापरत नाही वा तो ढगात गेलेला असतो
वर्षानु वर्षे हि इन ऍक्टिव्ह अकाउंट्स ब्यांकेत पडून आहेत
तसेच अनेक बेनामी फिक्स डिपॉसिट्स पण ब्यांकेत असतात
आपण ती अकाऊंट्स हॅक करायची व एका वेळी सारे पैसे व लाईन आपल्या खात्यात वळवायचे
हा प्लॅन ऐकताच दामोदर चे धाबे दणाणले व म्हणाला भाय हे तर लै डेंजर काम हाय -एक तर आपल्याला तुझ्या कॉम्पुटर मधाळ काय समजत नाय
तुम्ही शेट शेट इस्माईल ने मधेच त्याचे बोलणे तोडले तुम्हाला ते काय पण समजायचे कारण नाही -त्याची गरज पण नाही -ते सर्व काम आम्ही करणार आहे -तुम्ही फक्त पैसे पुरवायचे आहेत आम्हाला लागतील तसे
काम जोखमीचे आहे मधेच जर पैसे पुरवठा थांबला तर मोठा लोच्या होणार
कारण आपल्याला हेकाम थायलंड सिंगापूर कोलंबिया अश्या निरनिराळ्या देशातून करावे लागणार आहे
ओके इस्माईल तू काय काळजी करू मको -तुला पैसे कमी नाय पडणार
आमचे शेठ लोकांचं एक सिंडिकेट हाय -पैका कमी नाय पडू देणार
शेठ सर्व प्ल्यान फुल प्रूफ आहे पण एक लोच्या आहे
यात बी लोच्या हाय का ?काय आहे
मी एकदा व लाईन मोठा झोल केला होता -त्या अतुल कारखानीस न मला चौकशी साठी ऑफिस मध्ये बोलावला होता
त्याच्या हाती काय लागलं नाय -पण म्हणाला या माग तूच आहे असा संशय आहे मला -तुझ्यावर माझी नजर आहे -आत्ता सुटल्यास पण एक ना एक दिवस तुला मी गांजा आड घडणार हे नक्की -इस्माईल म्हणाला
तू त्याची काळजी सोड -त्याला ढगात आपण सोडू -असा गेम वाजवू की कुणाला शन्का पण येणार नाय -शेठ म्हणाला
मग हरकत नाय
५}अतुल जानव्ही सहजीवन
*
अतुल जानव्ही चा संसार छान चालला हता -दोघेही वर्कोहोलिक -आपापल्या कामात व्यस्त असायचे
त्या दिवशी अतुल म्हणाला आपण एकमेकांशी मोकळे पणाने बोललोच नाही
हो ना अरे कामातून ना तुला फुरसत ना मला
ठीक आहे आज बाहेर जाऊ *क्यानडाल लाईट डिनर -शॅम्पेन -अतुल
मस्त कसली रोम्यांटीक आयडिया आहे -जानव्ही म्हणाली
मुंबई अहमदाबाद हायवे वर एक पॉश हॉटेल आहे
अतुल चे ते लाडके हॉटेल होते
मूड आला कि दोस्ता समवेत तो हॉटेल ला भेट देत असे
कार अतुल ड्राइव्ह करत होता
आज खूप छान दिसते आहेस
जानव्ही ने त्याच्या हातास स्पर्श करत सहमती दर्शवली
हळू अरे किती जोरात चालवतोस कार -हाय वे आहे
अतुल काहीच बोलला नाही
तेव्हढ्यात त्याला फोन आला - जानव्ही तो फोन वर बोलत असताना ती त्याच्या कडे पाहात होती
कुणाचा फोन तिने मान हलवत विचारले
तो बोलणार इतक्यात समोरून एक अजस्त्र ट्रक भरधाव वेगाने येताना त्याला दिसला
नेमके काय करावे हे त्याला कळेना
कार बाजूला घ्यायचा प्रयत्न त्याने केला
ट्रक ने कारला जबरदस्त ठोकला
धक्का इतका जोरात होता कि कारचा चक्काचूर झाला जबरदस्त ठोकला
अतुल रक्त बम्बाळ झाला होता
कार मध्ये रक्ताचे थारोळे साचले होते
अतुल जागेवरच गतप्राण झाला
जानव्ही बसली तो भाग पूर्ण पाने चेपला होता
दरवाज्याचा कानोला होत दार आत गेले होते
जानव्हीचे कॉलर बोन पायाचा भाग क्षतिग्रस्त झाला होता
जानव्हीची शुद्ध हरपत चालली होती
जमावडा जमा झाला होता
ट्रक निधुन गेला होता वेगाने
जमावाने दार बाजूला करत जानव्हीला बाहेर काढले
रक्त गळत होते
तिने क्षीणपणे डोळे उघडले अन विचारले अतुल?
एव्हढे बोलून तिची शुद्ध हरपली
कुणीतरी तिला हॉस्पिटल मध्ये पोहोचवले
दूरवर अंतरावर ट्रक उभा होता
ड्र्यायव्हर ने फोन केला
शेठ गेम झाला -असे म्हणत फोन बंद करून ट्रक चालू पडला
*
६)जानव्ही अन चित्रे -जानव्ही चे भावविश्व् उन्मळले
*
चित्रेंच्या चेह-यावर काळजी व डोळ्यात पाणी होते
जानव्ही कधी डोळे उघडते याची तो वाट बघत होता
तिच्या बेडच्या बाजूलाच तो उभा होता
चित्रेला अपघाताची बातमी कळाली अन त्वरेने तो हॉस्पटिल मध्ये आला
जानव्ही ने डोळे उघडले
तिला खांदा न पायाच्या खुब्यात वेदना जाणवत होत्या
समोर चित्रे उभा होता
तिने कष्टाने अतुल अशा शब्द उच्चारला
चित्रे ने तातडीने डॉकटर ला हाक मारली
नर्स व डॉकटर आत आले
त्यांच्या कडे पाहात तिने अतुल असा शब्द उच्चारला
अतुल आता आपल्यात नाही -अपघातात त्यांचा जागीच मृत्त्यू झाला -डॉकटर म्हणाले
हे ऐकताच जानव्ही ची शुद्ध हरपली
बेडवर जानव्ही पहुडली होती
डोळ्यातून अश्रूंची धार थांबत नव्हती
बेड च्या बाजूला चित्रे बसला होता
जानव्हीचा हात हातात होता - हातावरून हात हळुवार पणे फिरवत तो तिला स्पर्शाने आधार देत होता
७)दिलीप जानव्ही विवाह बंधन
*
२-३ दिवसात जानव्हीला शुद्ध आली
समोरच्या खुर्चीत चित्रे बसलेला तिला दिसला
त्याला पहाताच तिचे हुंदके अनावर झाले -अश्रूंची धार लागली होती
दिलीप ताडकन उठला तिच्या बेड च्या बाजूस बसला त्याला हि रडू अनावर झाले
भावनांचा कल्लोळ ओसरल्यावर जानव्ही ने डोळे पुसले
मीच का? माझ्याच नशिबी असे का यावे ?
तिच्या प्रष्णांना कुणाकडेच उत्तर नव्हते
मला अशी अपंग म्हणून जीवन्त ठेवत त्याला काय मिळाले असेल ?
जानव्ही बराच वेळ बोलत होती
मनाचा क्षोभ झाला होता ती स्वईर भैर झाली होती
चित्रे शांत पणे सार ऐकत होता
त्याला फार दुख्ख झाल होत
आठवडया नंतर जानव्ही ला डिस्चार्ज मिळाला
व्हील चेअर वर बसून ती ला चित्र घरी घेऊन आला

मध्यन्तर - क्रमशः:

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

अनिरुद्ध.वैद्य's picture

22 Nov 2019 - 12:44 pm | अनिरुद्ध.वैद्य

मस्त लेखन! एखदा चित्र्पट होउ शकतो अशि स्टोरि आहे!

शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला

कसं असतं ना कुलकर्णी , चिकन टिक्का तंदुर भट्टीतून टेबलवर येतो.. अर्धा टिक्का उचलून बीअरचा घोट घेत कसा बरं टाकला तोंडात?

असो.. पण प्रेरणा मिळाली..काहीही लिहिता येत नाही म्हणून वाचक होतो इतके दिवस....

पण आता मात्र लिहिणार " ऊर्ध्वगती मेल्यावर कशी मिळवावी"

अशी हास्यवर्धक वाक्ये आजून पेरावी ,, कथा फुलवावी अलवार ..

किती वाट बघू म्या देवा आता ,, काढा बाहेर लेखणीची तलवार ::::::::

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

भाय कितना दिन मातंग मनायेगा तू ?

शेअर्स व मार्केट मध्ये

तसा तो होताच स्मार्ट पाच फु सात इंच उंची गौर वर्ण मस्त भाग पाडलेला

दिलीप थर्ड क्लास मध्ये पास झाला

शेट दामोदर इस्माईल व त्याचा एक साथीदार शेट च्या ऑफ्स मध्ये ज्मा झाले होते

ठीक आहे आज बाहेर जाऊ *क्यानडाल लाईट डिनर -शॅम्पेन -अतुल

मनाचा क्षोभ झाला होता ती स्वईर भैर झाली होती

दुर्गविहारी's picture

22 Nov 2019 - 6:40 pm | दुर्गविहारी

कथाबीज छान आहे, लिहिताय हि छान. फक्त शुध्द्लेखनाकडे थोडं लक्ष द्या, घासाला खडे लागावे असे झाले आहे. पु. भा. प्र.

ऋतुराज चित्रे's picture

22 Nov 2019 - 7:23 pm | ऋतुराज चित्रे

विरामचिन्हे नाहीत का तुमच्या की बोर्डवर?

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 7:40 pm | मुक्त विहारि

अकु कथा फॅन. ..

जॉनविक्क's picture

23 Nov 2019 - 9:31 pm | जॉनविक्क

कितना दिन मातंग मनायेगा तू ?

अकुजी तुम्हाला कदाचित "मातम" म्हणायचे असा, बेनेफिट ऑफ डाउट, दिला तरी...
बाकी

शून्यात बघत दिलीप ने अर्धा चिकन टिक्का चा पीस उचलला व बिअर चा घोट घेत तोंडात टाकला

"चिकन टिक्का खादडताना, आणि बिअर ढोसताना",
कसला आलाय बोडक्याचा मातम...

काहीही ??

उद्या समजा कोणी लिहिलं, की " मिशनरी पोसिशनमधे दिलीप चित्रें च्या मातमच्या आवेगावर येणाऱ्या आवेगाच्या धक्क्यांचा लाटा , चमेलीने स्वतःचा खालचा ओठ चावून कश्याबश्या सहन केल्या"...

वाचकांची काय अवस्था होईल , असं वाचून??

याला "मातम" म्हणता येईल का ??

आता मी पुढची उरलेली कथा वाचतो ....

जॉनविक्क's picture

24 Nov 2019 - 10:52 am | जॉनविक्क

खिलजि's picture

25 Nov 2019 - 5:02 pm | खिलजि

गृदेव आता थांबायचं नाव घ्यायचं न्हाई .. आता क्रमश वर क्रमश पाहिजेत .. लै कंटाळा आलाय राव ..

diggi12's picture

26 Jan 2020 - 1:24 am | diggi12

पुढचा भाग केव्हा