Skip to main content

"स्व"....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 22/10/2016 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....पण लक्षात कोण घेतो ????
लेखनविषय:

वाचने 5565
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

तुमच्या काव्याच्या शिर्षकात दोन चुका आहेत.
"स्व"....
१. स्व ला अवतरणांची गरज नसते. २. स्व हे फक्त एक टींब असते. चार नाही. :प तुम्ही जी कविता लिहीली आहे ती खोट्या स्व बद्दल आहे.

In reply to by सतिश गावडे

खरा स्व कधी जागवायचा ते आपल्या हातात असतं.....