कविता: बिबट्याचे मनोगत
सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज
सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही
हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली