वावर

डेव्ह फर्नांडिस बुलेटिन - जुन २०१८

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
23 Jun 2018 - 1:42 am

१. महाराष्ट्र शासनाने शनी शिंगणापूर ह्या हिंदू मंदिरावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. [१] हिंदू स्वराज्याच्या स्थापने साठी नवीन राजसत्ता उभी करणाऱ्या शूरांच्या भूमीत सध्या शनिदेव सुद्धा शासनाच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकत नाहीत. हिंदू भाविकांचा पैसे गिळंकृत करून शासन हा पैसा आपल्यावर आणि बाबू लोकांवर खर्च करणार आहे. (हल्लीच शिर्डी संस्थानचे ७१ कोटी रुपये सरकारी मेडिकल कॉलेजना काढून देण्यात आली)

हे ठिकाणधोरणमांडणीवावरलेख

मा.ल.क.-४

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
21 Jun 2018 - 9:19 pm

प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता.

वावरप्रकटनविचारलेख

प्रणय बाग आणि ध्येयहिन उत्क्रांतीवाद

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
15 Jun 2018 - 12:39 pm

शनिवारी निसर्गशाळा कॅम्पसाईटच्या परीसरामध्ये, मृगाचा किडा पाहिला. मागच्या वर्षी देखील याच अवधीमध्ये किडा दिसला होता. त्यावेळी याविषयी थोडे वाचले देखील होते. यावर्षी मात्र, मृगाचा किडा पाहताना, ते वाचलेले सर्व आठवले व एक वेगळाच विचार मनात येऊन गेला. आता थोडा थोडा आठवुन इथे मांडण्याचा प्रयत्न करतो.

वावरप्रकटन

आईचा मुलगा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
8 Jun 2018 - 11:46 am

साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनसद्भावनाप्रतिभा

स्वैपाकघरातून पत्रे २

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
25 May 2018 - 10:03 am

प्रिय अन्नपूर्णा,

जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

धोरणमांडणीवावरसंस्कृतीपाकक्रियावाङ्मयविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनआस्वादप्रतिभाआरोग्यविरंगुळा

मा. ल. क.-१

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
21 May 2018 - 11:03 am

एका छोट्याशा गावात एक अत्यंत गरीब ब्राम्हण मुलगा रहात होता. आई-वडील लहानपणीच वारलेले. नातेवाईकांनीही त्याला दुर लोटलेले. जवळ एकही पै नाही. वडीलांचा भिक्षूकी आणि पौरोहित्य हाच व्यवसाय असल्याने शेती-वाडी काही नाही. गावातच एका बाजुला वडीलोपार्जीत घर. तेही पडलेले. एक भिंत कशिबशी ऊभी होती. त्या भिंतीच्या आधारानेच हा मुलगा कसा तरी दिवस काढत होता. पुढे शिक्षण घ्यायची फार ईच्छा असल्याने माधुकरी मागुन आणि वार लावून शिक्षण घेत होता. गावातील अनेकांनी सांगुन पाहीले की “बाबारे, दिवस आता बदलत आहे.

वावर

स्वैपाकघरातून पत्रे १

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
19 May 2018 - 8:21 am

अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)

मांडणीवावरसंस्कृतीपाकक्रियावाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रप्रकटनप्रतिभा

परमहंसांची दाल-बाटी

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
13 May 2018 - 4:22 pm

ऐन ऊन्हाळ्याचे दिवस. माझी साईट परळी जवळ सोनपेठ रोडला सुरु होती. निर्जन प्रदेश. सावलीसाठी राखलेले एखादे झाड सोडले तर दुर दुर पर्यंत ऊंच वाढलेले वाळलेले गवत. साईटजवळ एक छोटी वाडी. पण तिही दिवसभर मोकळी. एखाद दोन चुकार कुत्री, काही म्हातारी माणसे. बाकी काही हालचाल नाही. सगळे रानात किंवा औष्णीक केंद्रावर कामाला जायचे. वाडीला वळसा घालून लहाण टेकडीआड दिसेनासा होणारा एक छोटा डांबरी रस्ता. त्यावरचे डांबरही दुपारी वितळायला लागायचे. या टेकडीच्या पायथ्याशीच तात्पुरते ऑफीस आणि डंपर्ससाठी डेपो आणि गॅरेज ऊभारलेले. साईट नऊ किमी पसरलेली. चाळीस डंपर्स आणि दहा-बारा पोकलेन.

वावर

फुलांचा फोटो

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
11 May 2018 - 9:52 am

‘ती आज येईल, तेव्हा तिला सांगेन,’ मनोहर कॅमेऱ्याची लेन्स पुसता पुसता स्वतःशीच म्हणाला. ‘तिला कळत नसेल, असं नाही, पण तिच्या लक्षात आलं नसेल. आपल्यातरी कुठं लक्षात आलेलं आधी!?’ सोनेरी फ्रेममधून त्याने बाहेर नजर टाकली. पाचगणीचा table land सकाळच्या कोवळ्या उन्हात फार लोभस दिसत होता. आज या batchला घेऊन जायचं होतं. आधी या मैदानावरून एक चक्कर, मग दऱ्याखोऱ्यात , जंगलात .....निसर्गाची प्रत्येक फ्रेम सुंदर, कशाचेही फोटो काढा! .... अठरा मुलंमुली, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या. आज तिसरा, उद्या शेवटचा दिवस. उद्या संध्याकाळी सगळे पांगतील. पुन्हा गाठ पडतील, न पडतील.... मनोहरला हे नवे नव्हते.

मांडणीवावरसंस्कृतीकलावाङ्मयकथासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरराहती जागाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रप्रकटनप्रतिभा

स्वानंदासाठी

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
10 May 2018 - 3:49 pm

नारदमुनींना आज काही करमत नव्हते. बरेच दिवस झाले होते ‘ईकडची बातमी तिकडे’ करुन. देवलोकात, मृत्यूलोकात चक्क शांतता नांदत होती. शांतता असली की मुनीजी अशांत होत. “काय करावे?” या विचारात सगळे ‘लोक’ पायाखाली घालून झाले पण काही सुचेना. तसं म्हटलं तर ‘लावालावी’ करायला कितीसा वेळ लागतो? पण नारदांची तत्वे आड येत होती. पहिले म्हणजे कळ लावायची पण फक्त सत्याचा आधार घेऊन. ज्याला भडकायचे आहे त्याने स्वतःच बातमीचा गैरअर्थ काढून भडकावे. आणि दुसरे म्हणजे कळ लावल्याने मनोरंजन होत असले तरी फक्त मनोरंजन म्हणून कळ लावायची नाही. त्यातून काही तरी भले व्हावे, कुणाला तरी शिकायला मिळावे, धडा मिळावा.

वावर