वावर

रियल रियल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
14 May 2019 - 5:16 pm

बरे झाले मीराबिरा, राधागिधा तेव्हाच होऊन गेल्या....
मिनिटाला मेसेज, तासाला कॉल, हाऊ आर यूच्या
लिक़्विड जमान्यात
प्रेमबिम, हळवेबिळवे, मनात संगत
ओहो....ते काय असते आणि?
आठवण बिठवण वेड्यांचा बाजार...
एक कॉल मारायचा
नाहीतर मेसेज धाडायचा
बात करनेका मामला खतम.

मनात आठवण, झुरणे बिरणे
अरेरे, हाताबाहेरच्या केसेस...
डिजीटल डिजीटल फिजिकल फिजिकल
एवढेच काय ते रियल रियल
बाकी जग तो मृगजल मृगजल...

अनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामांडणीवावरसंस्कृतीकविताप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकसमाज

भयकाल

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
11 May 2019 - 10:20 pm

हळू हळू एकेक करत
हरवत चालले आहे...

ज्याच्याकडे पहात पहात
आम्ही आमचे मार्ग शोधायचो
तो ताराच आकाशातून
नाहीसा झाला आहे
आणि तो एकुलता एक चंद्रही...
ज्याची स्वप्नं बघत बघत
आम्ही निश्चिंत झोपी जायचो...

नाहीशा होणाऱ्या प्रत्येकाला मी
खिडकीतून पहात राहतो
आणि मनातल्या मनात चरकतो
उद्या मी ही असाच नाहीसा झालो तर!

आज सकाळी डोळे उघडले
तर ते समोरचे हिरवेकंच झाड
कुठेच दिसत नव्हते
ना ही कुठला पक्षी

या पृथ्वीवरून
हळूहळू एकेक गोष्टी
हरवत चालल्याचे दिसत आहे

मुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमान

96 - प्रेमाचा धवलगिरी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
8 May 2019 - 12:58 am

या प्रेमाला काळ स्पर्श करू शकत नाही. वासना सतत उंबरठ्याबाहेर उभी राहते. शरीर, अबोध प्रेम वाहून नेणारे केवळ साधन बनते. फूल आणि त्याचा सुगंध अलग करता येत नाही, तशी एकरूप झालेली मने..... शाळकरी वयातले प्रेम - म्हटले तर पाण्यावरील अक्षरे, म्हटले तर काळ्या दगडावरची शुभ्र रेघ.

शरीराच्या अलीकडच्या प्रेमात जे जगतात, ते थेट शरारीच्या पार होतात. मधल्याकाळात प्रेमाच्या नावाखाली, वासना, शरीराला वापरून घेते, असं तीव्रतेने वाटायला लावणारा तामिळ चित्रपट म्हणजे ‘96’.

मांडणीवावरसंस्कृतीकलासमाजजीवनमानचित्रपटप्रकटनविचारप्रतिसादअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधलेखप्रतिभा

कोणीतरी बाजूला सरकले असेल......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
4 May 2019 - 10:39 am

घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.

मांडणीवावरमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचार

विहीर खोदण्याचा विचार

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 May 2019 - 8:24 am

विहीर खोदण्याचा विचार...

डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....

जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?

डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये

अदभूतअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगामाझी कवितामुक्त कविताधोरणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमान

माणसे कविता होऊन येतात.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 3:22 am

माणसे कविता होऊन येतात
एकएक हट्टी कडवे
लाडाकोडाने घालून ठेवतात,
दोन कडव्यांमध्ये
एक जीवघेणी कळ
विसावा म्हणून ठेवून जातात...

माणसे कविता होऊन येतात
अलंकार भिरकावून
केवळ अर्थ होऊन
रात्रभर उशाशी बसतात
उजाडताना परत
पुस्तकाच्या अंधारात
गुडूप होतात......

माणसे कविता होऊन येतात....

-शिवकन्या

कविता माझीभावकवितामाझी कवितामुक्त कविताकरुणमांडणीवावरवाङ्मयकवितामुक्तक

पुनरागमनाय च

नानबा's picture
नानबा in जनातलं, मनातलं
19 Apr 2019 - 7:35 am

समस्त नव्या आणि जुन्या मिपाकरांना नानबाचा नमस्कार. ४.५ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिपावर पुनरागमन करण्याचे योजिले आहे. लवकरच भटकंती सदरात एक लेखमाला सुरू करतोय.

सध्या सुट्टीवर भारतात असल्यामुळे भरपूर मोकळा वेळ हाताशी आहे म्हणून पुनश्च लिखाणाचा योग जुळून आला आहे.

सर्व नव्या जुन्या मंडळींचा वरदहस्त डोक्यावर असावा..

मांडणीवावरप्रकटन

तळवे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
13 Apr 2019 - 11:56 pm

हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!

शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...

ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....

नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?

-शिवकन्या

प्रेम कविताभावकवितामुक्त कविताहट्टकरुणधोरणमांडणीवावरसंस्कृतीप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकजीवनमान

(दाराआडची मुंगी)

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 2:30 pm

एक मुंगी दाराआडून बघते आहे कोर्टहॉलच्या बाहेर
किती बाहेर?
कंपाउंडच्या बाहेर, सिग्नलपार
जिथे एक हत्ती शोधतो आहे पुष्पगुच्छ मस्त....
करत असेल का तो ही तिचा विचार?
येणार असेल का तो आज कोर्टहॉलमधे
कंपाउंडच्या आत, सिग्नलच्या अलीकडे?
मुंगीही कोर्टातून बाहेर येऊ शकत नाही...
जाईल का ती ही
हत्तीचा हात धरून, कंपाउंडच्या पलीकडे?
आडोसा घेऊन असलेला चुलत खाप मुंगळा
हातातली शास्त्रे लपवत,
याची जाणीव नसलेली मुंगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
पुष्पगुच्छात भान हरवलेला हत्ती

वावर

(दाराआडचा दगड)

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in जे न देखे रवी...
4 Apr 2019 - 5:50 pm

एक दगड दाराआडून बघतो आहे मिपाबाहेर
किती बाहेर?
वास्तविकतेच्या बाहेर, भावनांच्यावर स्वार
जिथे एक कवयत्री बसली आहे स्तब्ध....
करत तरी असेल का तो क्षणभर तिचा विचार ?

जात असेल का हो तोही
विडंबनाच्या बाहेर, ट्रोलीकतेच्या पलीकडे?
का टाळ कुटातून तो बाहेरच येऊ शकत नाही...

अशा बेइमान उजेडात
मग कवयत्री तिच्या जिंदगाणीचा अनुवाद वात करून पाठवते,
अंधारात दगड शांतपणे जागा राहतो....
कारण त्याला आजकाल पाझरायलाच होत नाही,
हळूहळू आपण डोकी गहाण ठेवणारा ठोंब्या
कसा झालो,हे त्याचं त्याला कळत नाही;

वावर