अकुंच्या - पकुंच्या ....
आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे, तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना. काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला.