सेक्स चॅट विथ पप्पु & पापा!

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 9:32 pm

शीर्षक वाचुन तुम्हाला जेवढा बसला तेवढाच धक्का मलाही बसला.नुकतीच ही वेब सिरिज पहाण्यात आली. एका ७-८ वर्षाच्या मुलाने आपल्या वडीलांना विचारु नयेत असे प्रश्न विचारल्यावर वडिल उत्तरं टाळण्या ऐवजी किंवा "देवबाप्पाने आकाशातुन आणुन दिलं" टाईप उत्तरं देण्या ऐवजी, जे खरं असेल ते सांगायचं ठरवतात. ह्याच विषयावर ही मालिका आहे.

आमच्या लहानपणी हे असलं काही वडिलांशी तर सोडाच, आईशी सुद्धा बोलण्याची सोय नव्हती. आईने कधीतरी "पाळी" ह्या विषयावर थोडं सांगितलं होतं. जास्त चर्चा न करता जेव्हा पाळी येईल तेव्हा बघु असाच तिचा प्लान असावा. बाकी सर्व विषयांवर मिळणार्‍या माहितीचा मुख्य स्त्रोत मोठ्या बहिणी हा होता. तिथुन मुख्यतः अर्धवट, चुकीची नाहीतर वाढीव माहिती मिळाली हे आत्ता कळतंय!

मुलींसाठी मुख्य नियम "आगाऊपणा नको" हा होता. त्यामुळे अशा कोणत्याही विषयावर बोलणे... खरं तर कोणत्याही विषयावर मोठ्यांसमोर मत मांडणे.. हाच फार मोठा आगाऊपणा होता. आजही बायका हे विषय फार उघडपणे बोलत नाहीत. ज्या बोलतात त्या बाय डिफॉल्ट आगाऊ आहेत. अर्थात आता फाट्यावर मारायला जमायला लागल्याने हवं ते बोलुन टाकता येतं. (आमचे प्रेरणास्थान :- म्हात्रे काका! आणि त्यांचा मोलाचा सल्ला!) पण तरी नजरा बदलल्याचं जाणवतंच. चर्चांमध्ये हे विषय बोलणं किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये सूचक चिडवणं हे ठिक आहे. लहान मुलांसमोर मात्र हेच विषय फार अवघडलेपणा आणतात. नक्की कितपत माहिती सांगावी हे ही नेमके कळत नाही. मुलांचा निरागसपणा जपुन ही माहिती देणं सोपं काम नाही. पण उत्तर टाळणं हा ही त्यावर उपाय नाही. मुलं जर कशीही उत्तरं शोधणार आहेत तर ती आपणच देणं सर्वात उत्तम नाही का?!

माझाही मुलगा आता चार वर्षाचा आहे आणि थोडे फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारतो. नुकतंच एका परिचितांना बाळ झाल्याने सध्याचा भेडसावणारा प्रश्न आहे "बाळं कसं होतं?". शक्यतो खोटं बोलायचं नाही असं आधी ठरवल्याने "आईच्या पोटातुन डॉक्टर ऑपरेशन करुन बाळ काढतात" असं उत्तर दिलं आहे. पण ते बाळ तिथं गेलंच कसं? ह्याचं उत्तर मात्र "बाबांना एक बाळ सापडलं आणि त्यांनी ते आईच्या पोटात ठेवलं" असं दिलंय. ;)
"बाळ परत पोटात कशाला ठेवलं?" हा प्रश्न "तुला गम्मत पाहिजे का एक?" असं सांगुन टोलवण्यात आला =))

ह्या सिरिज मध्ये मात्र वडील आपल्या मुलाच्या प्रश्नांना अगदी शिस्तीत उत्तरं देताना दाखवले आहेत. सुरवातच "मास्टरबेशन" पासुन झालीये. मला खरं तर इतक्या लहान मुलांना हा प्रश्न पडु शकतोच का? असा प्रश्न पडला. जो मुलगा ह्यात काम करत आहे तो मला तरी अजुन खुप लहान वाटला. एपिसोडच्या शेवटी तो काही "फॅक्ट्स" वाचुन दाखवतो. ते पाहुन मात्र असं वाटलं की एकवेळ थोडी फार माहिती देणे ठिक आहे, पण मुलांना इतकं डिट्टेल मध्ये सांगायची गरज आहे का? (उदा: कॉन्डोम फ्लेवर; ह्याबद्दल उघडपणे चर्चा दाखवली नसली तरी मालिकेत काम करता करता अशा अनेक अनावश्यक गोष्टी त्या लहान मुलाच्या कानावर पडल्या असतीलच ना? अशीच काळजी मला टु & हाफ मेन मध्ये काम करणार्‍या लहान मुलाचीही वाटली होती.)

पण एकंदरीत मालिकेची हाताळणी उत्तम आहे. मुलांना समजेल, रिलेट करता येईल अशा उदाहरणांमधुन गोष्टी समजावल्या आहेत. हलक्या फुलक्या विनोदी अंगाने स्क्रिप्ट लिहील्याने की काय, पण विषय एवढा अंगावर येत नाही. आपले प्रिय महाग्रु सचिनजी ह्यांनी सुद्धा चक्क चांगले काम केले आहे.

तुम्हाला ह्या मुद्यांवर मुलांशी बोलायचे असेल पण बोलता येत नसेल तर ही मालिका मुलांना दाखवता येईल.

बालकथाविचार

प्रतिक्रिया

रेवती's picture

10 Aug 2016 - 9:50 pm | रेवती

अशी मालिका आहे हे माहित नव्हते. वर दिलेली चित्रफित पाहिली नाही, ती पाहिल्यावर मत व्यक्त करता येते का पाहते.

उडन खटोला's picture

10 Aug 2016 - 9:58 pm | उडन खटोला

आयला, सचिन? (हे आपले म्हाग्रु)
बाकी 'ग्यान' उचित समय पर प्राप्त होता ही है! हमें सिर्फ देखणा है के वो उचित है या नही...
तब तक चिंता करणे की कोई आवश्यकता णही है.
(ते तिऱ्हाइतानं मुलाला मिठी मारणं, स्पर्श करणे वगैरे बाबत योग्य ते शिक्षण दिलं गेलं च पाहिजे यात शंका नाही)

अर्धवटराव's picture

10 Aug 2016 - 9:58 pm | अर्धवटराव

धन्यवाद पिरा.
माध्यमांनी नीट संयमाने असे सेन्सेटीव्ह विषय हाताळले, मुख्य म्हणजे समजुतदार निर्माते-लेख-दिग्दर्शकांनी हे विषय स्वतःहुन बोर्डावर आणले तर थिल्लरपणा न होता सगळं व्यवस्थीत मॅनेज होईल.

भोळा भाबडा's picture

10 Aug 2016 - 10:05 pm | भोळा भाबडा

ओक्केच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Aug 2016 - 10:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेक्स , असं शीर्षक वाचल्याबरोबर धाग्यावर इतकं अर्जन्ट धावत आलो की विचारु नका. पण मुख्य विषय वाचून ज़रा मुड़च गेला.

बाकी, पाहतो मुलगा माझ्याशी कधी सेक्स या विषयावर बोलतो ते...

-दिलीप बिरुटे

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

10 Aug 2016 - 10:56 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

|| श्री ओशो प्रसन्न ||

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2016 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"कोणत्याही विषयावर बोला. विषयाचं दमन करू नका. आपण बोलला नाहीत तर त्रास वाढेल. जितक्या सजगतेने तुम्ही सेक्स मधे उत्तराल तेवढयाच तीव्रतेने तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. आणि तो दिवस अतिशय भाग्याचा असेल ज्या दिवशी तुम्ही सेक्स पासून मुक्त झालेला असाल."(ओशो विचारातून साभार)

-दिलीप बिरुटे

पगला गजोधर's picture

11 Aug 2016 - 1:06 pm | पगला गजोधर

"कोणत्याही विषयावर बोला. विषयाचं दमन करू नका. आपण बोलला नाहीत तर त्रास वाढेल. जितक्या सजगतेने तुम्ही सेक्स मधे उत्तराल तेवढयाच तीव्रतेने तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. आणि तो दिवस अतिशय भाग्याचा असेल ज्या दिवशी तुम्ही सेक्स पासून मुक्त झालेला असाल."(ओशो विचारातून साभार)

लाख मोलाची गोश्ट !

उडन खटोला's picture

11 Aug 2016 - 1:27 pm | उडन खटोला

वासना कधीही तृप्त होऊ शकत नाहीत. बाकी चालू द्या!

संदीप डांगे's picture

11 Aug 2016 - 6:33 pm | संदीप डांगे

नक्की??

उडन खटोला's picture

11 Aug 2016 - 7:46 pm | उडन खटोला

गुलाबजाम खाऊन गुलाबजाम खाण्याची इच्छा मरत नाही. ती सातत्यानं(काही काळानं का होईना) आणखी गुलाबजाम हवेत म्हणते. मनानं समजूत घालूनच ती शमवावी लागते. विचार हेच त्यासाठी उत्तर होय.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

12 Aug 2016 - 12:27 am | खालीमुंडी पाताळधुंडी

अश्लील

वपाडाव's picture

12 Aug 2016 - 2:57 pm | वपाडाव

तो फेमस "सकिंग गुलाबजाम ईन प्लास्टिक पिशवी" हा जोक आठवला..!!

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 3:06 pm | संदीप डांगे

गुलाबजाम बद्दल हलवाईकडे चौकशी कराया पायजेल!

उडन खटोला's picture

12 Aug 2016 - 5:35 pm | उडन खटोला

करा की मग!
काका हलवाई फेमस हायती.

ज्याला दररोज २०-२५ गुलाबजाम मिळत असतील त्याला त्याचं काहीही मोल नसेल. यालाच घटत्या उपयोगितेचा नियम उर्फ Law of Diminishing Marginal Utility म्हणतात. सम्यक हा जो शब्द महात्मा बुद्धांनी वापरलेला आहे, त्यात या right proportion of everything चा विचार केलेला आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2016 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

महत्वाच्या विषयावरील सुयोग्य मलिकेचे सुयोग्य शब्दात केलेले रसग्रहण !

फार आचरटपणा न करता व "इनोदी" पण न करता, एक महत्वाचा प्रश्न उत्तम रितीने हाताळलेला आहे. हे, निदान काही भारतिय मालिका तरी, वयात आल्याचे लक्षण आहे !

"इंटेलेक्चुअल मास्टरबेशन क्या है ये जाननेके लिये देखिये न्युज अवर अ‍ॅट नाईन" हा सॉलिड टोला खास आवडला ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2016 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

चारही इपिसोड पाहिले. आवडले.

बघून मत नोंदवणेत येईल.

सस्नेह's picture

11 Aug 2016 - 10:56 am | सस्नेह

असेच म्हणते.
लेख आवडला.

मी-सौरभ's picture

11 Aug 2016 - 1:17 pm | मी-सौरभ

सूड प्रमाणेच

मी-सौरभ's picture

16 Aug 2016 - 6:00 pm | मी-सौरभ

चार ही भाग पहिले, आवडले.

जयन्त बा शिम्पि's picture

10 Aug 2016 - 11:35 pm | जयन्त बा शिम्पि

भन्नाट आहे ही मालिका,खरंच मनापासून आवडली. विषेशतः प्रत्येक अडचणीत येणार्‍या पप्पुच्या प्रश्नाला , बगल न देता , समोर येणार्‍या वस्तूपासून , उदाहरण घेवून, शंका समाधान करण्याची , युक्ती आवडली. मालिकेचे आतापावेतो किती एपिसोड झालेत व कोणत्या च्यानेलवर पहावयास मिळेल , याचाही खुलासा करावा.

वाह ! अजुन पाहिली नाही पण या विषयावर मेन स्ट्रीम कलाकारांना घेऊन मालिका काढण्याईतका प्रगल्भ विचार आता आपल्याकडचे निर्माते-लेखक - दिग्दर्शक करायला लागले आहेत हे पाहुन छान वाटलं, कुठे तरी दिलासा ही वाटला.

किसन शिंदे's picture

11 Aug 2016 - 10:20 am | किसन शिंदे

कालच 'पिरीयड' या विषयावरचा चवथा एपिसोड पाह्यला. पोरगं लय हुशारं दिसतंय. खाजगीतला विषय अतिशय संयतपणे हाताळलेला आहे.

चाणक्य's picture

11 Aug 2016 - 11:57 am | चाणक्य

हा एकच भाग बघितलाय अजून. आवडला. पण तुम्ही म्हणता तसं असे प्रश्न विचारणारा मुलगा मलाही लहान वाटला. पण असो. बाकी चांगलं आहे.

जाबाली's picture

11 Aug 2016 - 12:20 pm | जाबाली
पैसा's picture

11 Aug 2016 - 1:21 pm | पैसा

ही फक्त यूट्यूबवर आहे का?

पिलीयन रायडर's picture

11 Aug 2016 - 7:59 pm | पिलीयन रायडर

हो, ही वेब सिरिज आहे. यु ट्युब वर ४ एपिसोड आहेत. नुकताच चौथा आलाय. बहुदा अजुन एक येईल. कारण त्यांनी माहिती मध्ये ५ पार्टची मालिका असेल असं सांगितलं आहे.

ब़जरबट्टू's picture

11 Aug 2016 - 1:38 pm | ब़जरबट्टू

आवडले.. उत्तरामध्ये थिल्लरपणा नाही, आणि उत्तरे मुलांना समजतील अशी दिल्याने आवडलाच..

शलभ's picture

11 Aug 2016 - 1:42 pm | शलभ

छान आहे मालिका..

vcdatrange's picture

11 Aug 2016 - 7:27 pm | vcdatrange

लैंगिकता शिक्षण, या नावापासुनच १७-१८ वर्षापासुन अडकलेलं गाडं, तद्दन आडमुठ्या राजकारण्यांच्या दिखाऊ लोकानुनयाच्या नावाखाली झाकलेलं कोंबडं झालयं, इतक्या दिवसात तब्बल एक पिढी या विषयात सजग झाली असती,, नाही घडत आहे असं तर आता पर्यायी व्यवस्थांचा विचार केला जायला हवा

या विषयावर भारतीय मालिका आहे याचे आश्चर्य वाटले.
माझा लेक लहान असतानाचा साधारण आठेक वर्षाचा असेल,तेव्हा काँडोमची एक जाहिरात यायची. ती ऐकुन चिरंजीवांनी जेवणासाठी घरातले सगळे एकत्र बसले असताना जोरजोरात काँडोम काँडोम गायला सुरुवात केली.आजोबा इकडेतिकडे बघायला लागले.आजी ओरडायला आणि बाबा हसायला लागला.तिघांच्या रिअॅक्शनने चेव येऊन यात काहीतरी गंमत आहे वाटून चिरंजीव अजून चेकाळून गायला लागले. आजीने गप केले तर मग काय झालं म्हंटलं तर प्रश्न आला.मुलाच्या असल्या प्रश्नांना काहीतरी उत्तरं देऊ नका असा रुल घरात मीच लावल्याने आजी आईला विचार म्हणून पसार!
तेव्हा त्याला सोशल सायन्स मध्ये पाॅप्युलेशन आॅफ इंडिया वगैरे शब्द गेले होते.जिकेमध्ये भारत आणि चिन सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारे देश वगैरे. पण लोकसंख्या कशी वाढते हे काही माहित नव्हतं ! मग त्याला ते दाखले देऊन लोकसंख्या कमी राहायला हवी म्हणून गव्हर्मेंटने अशा गोष्टींची जाहिरात केली आहे.हे वापरून कमी करता येते म्हणून असं सांगीतल्यावर तेवढं शंकासमाधान झालं होतं.
नंतर मात्र त्याच्या वाढत्या वयाप्रमाणे त्याच्याशी वाढत्या वयाबरोबरचे मानसिक शारीरिक बदल यावर वेळोवेळी बोलत गेलो. मला कदाचित वैद्यकीय पार्श्वभूमी असल्याने असेल कधीही त्याच्याशी बोलायला संकोच वाटला नाही.लपवून जास्त कुतूहल निर्माण होते.मग नेटवरून वगैरे चुकीची माहिती किंवा चुकीच्या प्रकाराने जाऊ शकते.त्यापेक्षा आपणच मुलाशी मोकळा संवाद ठेवणं केव्हाही बेस्टच!

अर्धवटराव's picture

11 Aug 2016 - 10:18 pm | अर्धवटराव

असा समजुतदारपणा प्रत्येक पालकाने दाखवला पाहिजे.. मुख्य म्हणजे प्रथमतः तसा सजुतदारपणा असायला पाहिजे.

सपे-पुणे-३०'s picture

12 Aug 2016 - 12:27 pm | सपे-पुणे-३०

अवांतर असल्यास क्षमस्व पण १३-१४ वर्ष वयोगटातील मुलांना(मुलगे) काही गोष्टी कशा समजावून सांगाव्यात?
उदा. मुलींशी मस्ती करणे, गुदगुल्या करणे वगैरे. कारण ह्या वयात मुलांची आणि मुलींची मानसिक आणि शारीरिक परिपक्वता सारखी नसते. मुलं मुलींच्या मानाने कमी परिपक्व (मॅच्युअर) असतात.

काही आंतरराष्ट्रीय संस्थाचे ०-१८ वयोगटासाठी लैंगिकता शिक्षण अभ्यासक्रम आहेत, व्य, नि. मध्ये इमेल द्या. पाठवतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2016 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशी माहिती इथेच टाकली तर इतर मिपाकरांनाही तिचा उपयोग होईल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Aug 2016 - 10:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

एखाद डायसी वाक्य सोडता एकंदरीत विषय, लेख अन मांडणी खूप आवडली.

संदीप डांगे's picture

12 Aug 2016 - 12:51 pm | संदीप डांगे

वेब सिरीज म्हणून ठीक आहे पण प्रत्यक्षात ह्यातलं काहीच उपयोगात येणार नाही,

"कसं" होतं ह्याचं उत्तर देणं सोपं, पण "का"चे उत्तर कठीण,

मुलांची कल्पनाशक्ती अफाट असते व त्याला प्रौढ पुरे पडू शकत नाही, त्यामुळेच गप्प बसा संस्कृती जन्मते,

आणखी लिहायचं आहे नंतर लिहितो...

ह्या विषयावर मुलांशी कसं बोलावं, त्यांच्या प्रश्नांना बगल न देता त्यांना कसं समजवावं, ह्या बद्दल Dr. प्रसन्न गद्रे ह्यांचा एक वर्कशॉप आहे. त्यांनी "हॅलो सेक्सशुआलिटी" असं एक मराठीतून छान पुस्तक लिहिलंय, ज्यात मुलांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना द्यायचा उत्तर हे खूप छान समजावून सांगितलंय.

गद्रे, हे एका मित्राचे मेहुणे, त्यांनी आम्हा ४ ते ५ कपल्स साठी त्यांच्या घरी हा वोर्कशॉप ठेवलेला. अतिशय मोकळ्या वातावरणात, कुठेही awkward वाटू ना देता, ते हा प्रोग्रॅम घेतात. बायको आणि मी हा वर्कशॉप करून आलो, आणि नंतर आमच्या घरी दोनदा हे वर्कशॉप इतर मित्र मैत्रीणीनीसाठी ठेवला, ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.

ह्या असल्या शिक्षणाची मुलांपेक्षा सध्या पालकांना नितांत गरज आहे. कारण मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर पालक देऊ नाही शकले (किंवा देण्याचे टाळले) तर मुलांना चुकीची माहिती इतरांकडून मिळण्याचा धोका जास्ती आहे.

व्हिडिओ पाहिलेला नाही, पण उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. नक्की बघेन.

पिलीयन रायडर's picture

12 Aug 2016 - 7:59 pm | पिलीयन रायडर

पुण्यात होतं का हे वर्कशॉप? माझा भाचा आता ८ वर्षाचा आहे. त्याच्यासाठी कदाचित उपयुक्त असेल हे वर्कशॉप.

केडी's picture

12 Aug 2016 - 10:00 pm | केडी

पुण्यातच आहेत गद्रे. त्यांचा नंबर देतो बायको कडून घेऊन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Aug 2016 - 10:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांचा पत्ता व फोन नंबर इथेच टाकला तर सर्व मिपाकरांना उपयोगी होईल.

पालकांनाच गरज आहे हे नक्की. आमचा मुलगा आमच्याशी या विषयावर मोकळेपणाने बोलू शकतो (वडिलांशी जास्तच) यावर आजूबाजूच्या लोकांनी तोंडाचा चंबू केला होता, भुवया आकाशाला भिडल्या होत्या व "ऑस्सं, कॉस्सं बोलता ना तुम्ही पण!" असं ऐकायला मिळालं.

एनिग्मा's picture

12 Aug 2016 - 8:43 pm | एनिग्मा

मला चांगलं आठवतंय कि मी माझा वडिलांना "पाळी" विषयी ८-९ मध्ये असताना विचारला होत. तेव्हा त्यांती अतिशय संयमितपणे मला उत्तर दिल होतं. पण तरीसुद्धा ते आपल्या बोलण्यातला संकोच लपवूशकले नव्हते. म्हणून मी परत घरचांशी ह्या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलं. पुढे पुढे मग पुस्तकातून आणि नंतर अंतर्जालातून बरेच वाचन करून आणि पाहून माहिती मिळाली.

आज माहिती पुरता प्रश्न जरी अंतर्जालाने सोपा केला असला तरी शिकवणूक मात्र मोठ्यांनीच करायला हवी आणि मोठे घरातले असतील तर अतिउत्तम.

फक्त नको त्या वयात....त्या लिहिलेल्या जाहिराती मोठ्याने म्हणायला लागलो की आजूबाजूला स्मशानशांतता पसरायची....
तांबी हे प्रकरण खूप उशिरा कळलं नंतर !

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 8:03 am | कैलासवासी सोन्याबापु

ठ्ठो!!!! यष्टीवर जाहिराती सुद्धा अगदी मोक्याच्या जागी असत, म्हणजे बघा दाराच्या हँडलपाशीच "कंडोम कब कब यौन संबंध जब जब" लिहिलेले असे त्या खास फॉन्ट मध्ये

तुषार काळभोर's picture

13 Aug 2016 - 11:26 am | तुषार काळभोर

सरकारी फॉण्ट असा तुटक अक्षरांचा का असतो?
(यष्टी, पीयम्टी, पोलीस, सैनिक असा विविध ठिकाणी दिसतो)

जुन्या एक्सरेच्या फिल्म्स अथवा पातळ पत्र्याचे स्टेन्सिल करून त्यावर रंग फासायची पद्धत होती. त्या स्टेन्सिल कट करताना सलग राउंड किंव्हा करव्हज कट करता येत नसे म्हणून तुटक अक्षरे. स्टेन्सिल नावाचा असा तुटक फॉन्ट असतो सध्या. आजकाल पीव्हीहीसी स्टिकर्स वा विनाईल स्टिकर असतात.

पहिले चारही एपिसोड बघितले. जास्ती न ताणता नेहेमीच्या सोप्या सोप्या गोष्टींमधून विषय हाताळला आहे (नो पन इंटेंडेड! ;) )
संवादही खुसखुशीत आहेत. म्हाग्रूंनी चक्क मस्त केलंय काम. बाकीच्या सगळ्यांची कामंही छान जमली आहेत.
असा मोकळेपणा कुटुंबात असायलाच हवा त्याने मुलं आश्वस्त असतातच आणि आईबापही बर्‍यापैकी काळजीमुक्त राहू शकतात की मुलांच्या मनात काही शंका आल्या तर ऐकीव माहीतीवरुन भलतेसलते प्रयोग न करता आधी ती आपल्याला येऊन विचारतील.

सात-आठ वर्षांचा मुलगा म्हंटलं तर लहान आहे पण पुन्हा विचार केला की हल्लीच्या जमान्यात मुलांना बर्‍याच गोष्टी बर्‍याच आधीच्या वयात दिसतात, कानावर पडतात त्यामुळे त्याला अनुसरुन बरोबर आहे.

रंगापापा

संन्यस्त खड्ग's picture

13 Aug 2016 - 12:41 pm | संन्यस्त खड्ग

अजून इथे संस्कृतीरक्षक अन सौंस्क्रूतीभक्षक यांची लढाई सुरु झालेली नसल्याचे पाहून महदाश्चर्य वाटले ...

उडन खटोला's picture

13 Aug 2016 - 12:59 pm | उडन खटोला

तुम्ही म्यान केलं आहे ना तुमचं खड्ग?
कशाला काढताय बाहेर? ;)

Nitin Palkar's picture

13 Aug 2016 - 9:42 pm | Nitin Palkar

सॉलीड प्रश्न.....

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Aug 2016 - 1:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

त्याला कंपू माहात्म्य म्हणतात!

झपाटलेला फिलॉसॉफर's picture

13 Aug 2016 - 1:07 pm | झपाटलेला फिलॉसॉफर

आता आम्ही आलौय की इथं

आता मज्जा बघाच नुस्ती

हौन जावद्या धुमशान सुरु

vcdatrange's picture

13 Aug 2016 - 7:30 pm | vcdatrange

https://play.google.com/store/apps/details?id=com.chaitracreations.isafe
हे एक चांगलं अँप आहे, चार ते नऊ वर्षे वयोगटासाठी ' सेफ टच, अनसेफ टच शिकविण्यासाठी

Nitin Palkar's picture

13 Aug 2016 - 9:24 pm | Nitin Palkar

पिलीयन रायडर धन्यवाद! या मालिकेची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.

अमितदादा's picture

13 Aug 2016 - 11:09 pm | अमितदादा

छान माहिती..वाखु साठवला आहे.

बोका-ए-आझम's picture

15 Aug 2016 - 12:09 am | बोका-ए-आझम

कारण आपल्या देशात, जिथे mannequins ना झाकून ठेवा कारण त्यामुळे पुरुषांच्या भावना उद्दीपित होऊन बलात्कार होतात - असले दिव्य शोध लावणारे लोक आहेत, तिथे एखाद्या चॅनेलने असला कार्यक्रम दाखवणे आणि मग फॅमिलीवाल्या लोकांनी त्यावर मोर्चा काढणे असले प्रकार झाले असते. शिवाय नेटवर असल्यामुळे ३-४ वर्षांनीपण ही मालिका मुलाला दाखवता येईल. धन्यवाद पिरातै!

आनन्दा's picture

15 Aug 2016 - 10:46 am | आनन्दा

माझ्यामते ११+ हा ऑडियन्स बरोबर आहे यासाठी. अयोग्य वेळी अशी संवेदनशील माहिती त्याच्या हातात येऊ नये.

आनंदयात्री's picture

15 Aug 2016 - 3:59 am | आनंदयात्री

उत्तम माहिती. धन्यवाद.

जयन्त बा शिम्पि's picture

16 Aug 2016 - 7:33 am | जयन्त बा शिम्पि

अधिक माहितीसाठी खालील साईट्वर पहावे . १९६६ मध्येच हा व्हिडीयो प्रकाशित झाला आह. कदाचित यातुन प्रेरणा मिळाल्यामुळे ही मालिका तयार कण्यात आली असावी.
https://archive.org/details/parent_to_child_about_sex

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2016 - 7:56 am | पिलीयन रायडर

हे बघुन अजुन एक आठवलं..

Disney ची पिरियड्सवरची फिल्म.. ही सुद्धा खुप जुनी आहे.