बालकथा

< < < < मजबूरी हय > > > >

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
16 May 2016 - 11:44 am

मिकादा, पैजारबुवा, अभ्यादादा आऊर रातराणीतै के पिच्चे पिच्चे मै भी कस्काय चल पड्या कायच म्हैती नाही. पन मेरा भी जळके करपा मस्सालाभात हुवा इस्लीये मयनेभी हिन्दिक्की चिंदी करनेका ठाणच डाल्या. मंग काय...एक आय अपने पोरट्याको कयसे धोपातटी हय वैच्च चित्र कविता मे उतारके इद्दर डालरा हू! तेवढेमे भाशेका ट्याण्डर्ड भी लै खालीच आया उस्के लिए मापी, लेकीन ये भाशा आपुनका बच्चपनका दोस्त मुलाणी मेरेको शिकायेला हय, जो उस्के आऊर मेरे वास्ते जान से प्यारी हय.

ठयरे हुए पानी मे
किसी येडेने डालेले फत्तरकी माफिक
होता है रे बाबा तेरा मारना!!

संस्कृतीकलाधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताबालगीतमुक्तकविडंबनभाषाव्युत्पत्तीशब्दक्रीडाशुद्धलेखनविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानऔषधोपचारप्रवासभूगोलक्रीडाकृष्णमुर्तीराशीशिक्षणमौजमजाछायाचित्रणरेखाटनeggsअदभूतअनर्थशास्त्रअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीइशाराकखगकाणकोणकाहीच्या काही कविताकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.लावणीवाङ्मयशेतीविठोबासांत्वनाभयानकहास्यकरुणअद्भुतरस

शिव दुग्धाभिषेक -सत्य घटने वर आधारित

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 9:23 pm

सन १९७०-७२चा काळ. जुन्या दिल्लीत नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे मंदिर होते. मंदिराच्या प्रांगणात शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक/ जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे. मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी मंदिर सकाळी १० पर्यंत उघडे राहात होते. मंदिराच्या बाहेर एका पायाने अधू असलेली भिकारीण भिक मागण्यासाठी बसत होती. तिची कहाणी हि अत्यंत दारूण होती. जवळपास दोन एक वर्षांपूर्वी आपल्या नवर्यासोबत ती मजदूरी करायला जुन्या दिल्लीत आली होती.

आस्वादकथाबालकथा

मरण!

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
25 Apr 2016 - 6:45 pm

"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!"
म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.
"ओ बाबा तो साऱ्या जगावरच तापलाय!"
"त्याच्याकडे न्याय असतो बाबा, चटके देणाऱ्यालाही तो चटका लावतो."
"अहो दुष्काळ पडलाय."
दुष्काळ?
म्हातारा चिडला आणि त्याने एक काडी उचलली!
"बाबा तुमचा आशीर्वाद असू द्या."तो पुटपुटला
आणि काहीतरी म्हणून त्याने काडी वर फेकली.
क्षणार्धात आकाश भरून आलं
एक क्षणात दुष्काळ संपला!
लोक आनंदाने नाचू लागले.
म्हाताराही त्यांच्याकडे पाहू लागला!

प्रकटनविचारप्रतिभाहे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविता

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 6:49 pm

वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी!

हे ठिकाणधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीविज्ञानक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र

परीकथेची दोन वर्षे - भाग ७

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
5 Apr 2016 - 9:43 pm

१४ मार्च २०१६

आज परीला घेऊन गार्डनमध्ये गेलो. गेल्यावेळी तिची मम्मा असल्याने थोडा तरी रिलीफ होता, पण आज मी एकटाच असल्याने समोर काय संकट वाढून ठेवलेय याची कल्पना होती.

लेखबालकथा

दहशत - एका नव्या रूपात!

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
21 Mar 2016 - 8:12 pm

त्याने असं काय विचारल तिला की आतापावेतो गप्पांमध्ये सहभागी असणारी ऑफिसातली मंडळी अचानकपणे सुन्न झाली. आमावस्येच्या रात्री गावाबाहेरच्या जुन्या पडक्या देवळामागच्या काळोखात बुडून गेलेल्या झुडूपांमध्ये असते तशी भेदक कळा त्या झगमगत्या फॉल्स सिलींगमधल्या रोषणाईला आली होती. शांततेचा पारा तर उणे शेकड्यात जाऊन गुरफटून बसला. काहींच्या चेह-यावर अस्वस्थता इतकी दाटली की त्या ऑफिसातल प्रत्येक क्युबिकल आयसीयू वार्ड प्रमाणे भासू लागल.

लेखअनुभवप्रतिभाविरंगुळाकलाकथाबालकथाभाषाविनोदसाहित्यिकkathaaमौजमजा

परीकथा भाग ६ - (फेसबूक स्टेटस पावणेदोन ते दोन वर्षे)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 9:45 pm

२१ डिसेंबर २०१५

खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे..
पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे..
हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे..
पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे..
आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको :)

.
.

२३ डिसेंबर २०१५

प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे.

लेखबालकथा

बोध कथा - उंदीर आणि बिल्ली मौसी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Feb 2016 - 11:52 pm

स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे.

विचारकथाबालकथा

मिपा आणा अभिव्यक्तीस्वातंत्र्य

जेपी's picture
जेपी in जनातलं, मनातलं
11 Feb 2016 - 9:08 pm

नमस्कार,
मिपावर लेखनाला आणी प्रतिसादाला काही बंधन नाही.
पण"अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेऊ नये"
प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण दुसर्याला हिणवण्याचा नाही.

प्रकटनपाकक्रियावाङ्मयबालकथाचारोळ्यामुक्तकविडंबनप्रतिशब्दशुद्धलेखन

चाफा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Feb 2016 - 10:58 am

वाटेवरी कुणाच्या
आहे अजून चाफा!
मंद परी जीवघेणा,
आहे तसा पसारा!

ऊन उठून येते रात्री,
घर गोळा होते नेत्री!
कुणी दिसते, कुणी विरते!
परी चाफ्यापाशी सारे,
हताश होऊन बसते!

मंद परी जीवघेणा
आहे तसा पसारा
वाटेवरी कुणाच्याही
असू नये गं चाफा!

-शिवकन्या

बालकथाकविताप्रेमकाव्यसाहित्यिकदेशांतरकविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुण