Skip to main content

(काळी असे कुणाची)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 19/11/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

वाचने 16994
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

=)) वाङ्मयशेती लै भारी ओ तुमची!

=)) =))

कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

मस्त ! रविवारची धमाल सुरुवात. धन्स...! -दिलीप बिरुटे

शीर्षक जाम आवडलं!! ;)

अगदी लायनीत आहे आणि एस भाउंचा प्रतिसाद ही खंगरी.