मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ५: मुन्सियारीतून केलेलं आकाश दर्शन

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ अंध गायकासोबत विशेष भेट ✪ सप्तर्षी, स्वाती आणि पंचा-चुली! ✪ रात्रीच्या आकाशातली रंगांची उधळण आणि स्टार ट्रेल्स! ✪ अखेर चंद्रोदयाचा क्षण फोटोत घेता आला ✪ आकाशगंगेच्या पिठुर चांदण्याचा आनंद ✪ भयाण थंडीमध्ये चहाची ऊब! ७ डिसेंबरच्या पहाटे ४ वाजता उठलो. मुन्सियारीची भयाण थंडी! पण आकाशात काय काय दिसेल ही उत्सुकताही तेवढीच! हिंमत करून दार उघडून बाहेर आलो. अहा हा! काय विलक्षण दृश्य आहे! सप्तर्षी पूर्ण वर आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातून दिसतात त्याहून ते जास्त उंचीवर दिसत आहेत! कारण अर्थातच मुन्सियारीचं उत्तरेकडचं स्थान. काल संध्याकाळी शर्मिष्ठा तारकासमूहसुद्धा बराच वर दिसत होता.

‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी(ऐसी अक्ष्ररे-४०)

Bhakti ·
लेखनविषय:
‘नेक्सस’ युवाल नोव्हा हरारी 1 युवाल नोव्हा हरारी हा असा इतिहासकार आहे की, जो केवळ इतिहासात रमायला शिकवत नाही, तर इतिहासाने माणसाचे जीवन कसे बदलत गेले हे पाहायला शिकवतो.

खाडीवरचे दिवस!!

राजेंद्र मेहेंदळे ·

कांदा लिंबू Sat, 02/21/2026 - 16:22
व्वा! काय मस्त लिहिलंय! अगदी चित्रदर्शी! त्या नदीच्या प्रवाहासारखेच सतत वाहते निवेदन! अजून अश्याच आठवणी येऊ द्या. - (पोहता न येणारा) कांदा लिंबू

गामा पैलवान Sun, 02/22/2026 - 01:00
राजेंद्र मेहेंदळे, मस्तं आठवणी आहेत. मुंबईच्या आसपास केवळ कल्याण, डोंबिवली व मुंबरा इथेच उघड्यावर पोहलं जातं. इतरत्र ऐकलं नाही. उघड्यावर नैसर्गिक वातावरणांत पोहोण्यात जी मजा आहे ती बंदिस्त तरणतलावांत नाही. केवळ पायाने पोहणाऱ्या विवेकास दंडवत. मला उंचावरून पाण्यांत उडी वा सूर मारणाऱ्यांबद्दल अतीव आदर आहे. मला व्यवस्थित पोहता येतं, पण मी कधीच सूरबिर मारू शकलो नाही. चष्म्याचा नंबर प्रचंड असल्याने चष्मा काढल्यावर सगळं धूसर दिसतं. मग ओळखीची जागाही अनोळखी होते. आणि चष्मा लावून पोहणे अशक्य. डोळ्यांवरनं पडला तर गेलाच. जी जागा नीट दिसंत नाही तिथे उडी आजीबात मारायची नाही हा स्वत:वर घालून घेतलेला नियम. त्यामुळे मी नेहमी पाण्यात सावकाश उतरणे अनिवार्य. यावरून माझी काही लोकांनी टिंगलही केली आहे. पण सुरक्षा प्रथम हे ब्रीद असल्याने उड्याबिड्या रद्द. अवांतर : या लेखाची आठवण झाली : https://www.maayboli.com/node/42452 आ.न., -गा.पै.

रामचंद्र Sun, 02/22/2026 - 01:42
जबरदस्त! मस्तच, आणि एका अर्थाने हे म्हणजे तिथल्या स्थानिक इतिहासाचं काही प्रमाणात दस्तऐवजीकरण.

सोत्रि Sun, 02/22/2026 - 07:46
एक नंबर!! माझ्या लहानपणी गावाकडे, घाटावर, विहीरीत पोहायला शिकावं लागायचं. मुलगा ४-५ वर्षांचा झाला की वडीलच मुलाला विहीरीत ढकलून द्यायचे आणि मुलाला पोहायला शिकण्यावाचून पर्यायच नसायचा. माझ्या अनुभवांची आठवण झाली हा लेख वाचताना. - (पट्टीचा पोहणारा ) सोकाजी

प्रचेतस Mon, 02/23/2026 - 10:59
एकदम जबरदस्त लेखन. आता कल्याणची खाडी सुद्धा पोहण्यासारखी राहिली नाही. काळे पाणी आहे नुसते. तुमचे वर्णन वाचून माझ्या पोहण्याच्या दिवसांची आठवण झाली. इकडे पवनेत कधी बुडी मारली नाही पण नाशिकला रामकुंडात, गांधी तलावात आणि कर्‍हाडला संगमावर नदीत पोहोण्याचा आनंद लुटला आहे. अर्थात तुमच्यासारखा पट्टीचा पोहणारा मी नव्हे. अवांतरः कल्याणात सुभाष मैदानाच्या कडेला रिक्रिएशन व्यायामशाळेच्या वर आत्याचे घर होते. आत्याचे यजमान महाराष्ट्र वेटलिफ्टिंङ असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि रिक्रिएशनचे सर्वेसर्वा. त्यामुळॅ कल्याणातल्या बर्‍याच आठवणी आहेत.

@गा पै-- या मुलीला(बाईला म्हणायला पाहिजे खरेतर--) आणि त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो. आमच्या घरापासुन हाकेच्या अंतरावर राहत. तिच्या वडीलांनी बर्‍याच लोकांना पोहायला शिकविले. त्यांच्याच एका विद्यार्थ्याबरोबर/कडुन मी शिकलो. मी पोहायला लागलो तोवर ते पोहण्यातुन निवृत्त झाले होते. (आठवले काकांच्या प्रसंगामुळे असेल) @प्रचेतस- जोशी सरांबद्दल आपण बोललो होतो मागे एका कट्ट्याला. पुढचा लेख "रिक्रिएशनचे दिवस" असणारे

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान Mon, 02/23/2026 - 14:20
राजेंद्र मेहेंदळे,
त्या पूर्ण कुटुंबाला मी ओळखतो
वाटलंच मला. तुमच्या लेखातली काही नावं त्या लेखातही सापडली. त्या काळी त्या भागातलं कल्याण अगदीच चिमुकली वस्ती होती. माझं आजोळ शंकरराव चौकापाशी आणि मी राहायला ठाण्यात. त्यामुळे फक्त रेलवे स्थानक, शिवाजी चौक, थोडाफार आगरा रोड वगैरे भाग परिचित आहेत. खाडीवर कधी जाणं झालंच नाही. आ.न., -गा.पै.

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत) त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल. पोहण्यासारखा आनंद नाही. हा lekh

याला पाण्यापासून धोका आहे असे सांगितल्या मुळे पट्टीचे मासेमार असेल्याला आमच्या आज्याने आम्हाला लहानपणी पोहायला शिकवले नाही. नंतर मग स्वतः होऊनच प्रयत्न केल्याने पोहता येते. मात्र त्याचा राग अजूनही मी कधी कधी आज्यावर काढतो (खेळीत) त्यामुळे माझ्या चिरंजीवना मी वयाच्या पहिल्या वर्षीच पाण्यात उतरवलं. आता या खेपेस त्याला नीट पोहायला येईल. पोहण्यासारखा आनंद नाही. हा लेख आवडला हे वे सां न ल.

कर्नलतपस्वी Mon, 02/23/2026 - 16:31
आमचे गाव भिमानदीच्या काठी. दोन अडीच किलोमीटर लांबीचा किनारा आणी बर्‍यापैकी रूंद आणी खोल नदीपात्र.पावसाळी नदी तरीही फेब्रुवारीपर्यंत पाणी असायचे. मित्राची लिंबाची बाग,बागेत विहीर.मित्राचे वडील साहेबांच्या सैन्यात सुभेदार, सेवानिवृत्त व हायस्कूल मधे गणिताचे शिक्षक नंतर हेडमास्तर ही झाले.धिप्पाड,गोळीबंद कमावलेली शरीरयष्टी करडी शिस्त आणी बेदरकार स्वभाव. जिवंत साप हातात घेउन जमीनीवर आपटायचे. वयाच्या सहा,सातव्या वर्षापासून त्यांच्या बागेत पडीक असायचो. नवव्या वर्षी मित्राच्या वडिलांनीच विहिरीत ढकलून दिले. नाक तोंडात भरपूर पाणी गेले. तळ गाठायच्या आगोदरच बखुटीला धरून वर काढले. दुसर्‍याच दिवसापासून कमरेला पांगरीच्या वाळलेल्या लाकडाचा पेटा बांधून विहिरीत स्वताच उतरलो. एका आठवड्यात कमरेचा पेटा सुटला व पोहायला शिकलो. गावात शंकराच्या मंदिरात मोठे चौकोनी कुंड. चारी बाजूला पडवीवजा खोल्या. जुने दगडी बांधकाम ,पडवीच्या छतावरून कुडांत उड्या मारणे,सूर मारणे,पाठीवर हातपायाचे मुटकुळे करून उडी मारणे अशा अनेक कला बरोबरच्या वरिष्ठ पोहोचलेल्या मित्रांनी शिकवले.(फुकट शिकवणी) आता,अस्मादिकांची पावले नदीकडे वाळाली. पोहायला येत होते.आळीतल्या लहान मुलांना शिकवण्याची जबाबदारी आमच्या पिढीवर आली होती. पेटा नव्हता मग डालडाचा डबा सिलबंद केला आणी तो पोरांच्या कमरेला बांधून पोहायला शिकवले. मोठ्या भावाचा किवां वडिलांचा पायजमा फ्लोटर म्हणून वापरण्याची क्लुप्ती कुणीतरी शिकवली. पायजम्याची तिन्ही ओपनिंग सुतळीने घट्ट बांधून ओल्या पायजम्यात तोंडाने हवा भरून फुगवाची आणी दोन्ही पाय व्यवस्थित फुगले की मग ते पोटाखाली घ्यायचे. पोहणारा फुलपाखरू बनायचा. असे त्या वेळचे (१९६२-६३) अनेक इम्प्रोवाईज्ड स्वीमिंग फ्लोटर्स. पावसाळ्यात नदीला खुप पुर यायचा. नदीकाठी मोठा वड ( आजही आहे पण माझ्या सारखाच शिनियर झालाय) आणी सात चिंचाची मोठी झाडे ( झाडे गेली तीथे सिमेंटचे जंगल बनले आहे). पुराच्या पाण्याने त्यांना वेढा घातला म्हणजे मोठी मुले खुप लांबून पोहत यायची. थेट दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलावर निघायची. पुढे ही कला आमच्या पिढीला हस्तांतरीत झाली. लहानपण थरारक होते. ना मोबाईल, ना टि व्ही.... आजही तरणतलावात पाठीवर हातपाय न हलवता आर्धा आर्धा तास पडून राहू शकतो. (नातवंड आणी सोसायटीतील लहान मुलांना आता शिकवतो.) आमच्या गावात एका पेक्षा एक पोहणारे महाग्रू आहेत. जेन झी व अल्फा मात्र या कले पासून वंचित आहे आणी राहणार.चास कमानच्या धरणाने पाणी आडवले असल्याने पूर येत नाही.नदीपात्रात जेमतेमच पाणी असते. लेख आवडला हे वेगळे सांगणे नकोच.

खटपट्या Mon, 02/23/2026 - 21:57
यावरून एक खूप जुनी गोष्ट आठवली, ठाण्यात कोलशेत रोड ला त्याकाळी सण्डोज नावाची कंपनी होती (आता तीचे नाव नोवार्टीस झाले आहे) त्या कंपनितले काही परदेशी अधिकारी कारखान्यात आले होते. कंपनिच्या मागच्या बाजूने पुढे गेल्यावर खाडी लागते. तिला वसई खाडी म्हणतात पण ती ठाण्यातच होती /आहे. तर हे परदेशी अधिकारी तिथे पोचले तेव्हा तिथे काही स्थानिक कोळी तरुण खाडीत पोहत असताना दिसले. ते तरुण पलीकडच्या तिरावर होते. अधिकार्‍यानी त्याना सहज हात करुन बोलावले. त्यातील सात ते आठ तरुण सरळ उडी मारुन खाडी पार करुन ऐलतिरावर आले. परदेशी अधिकारी इतके इम्प्रेस झाले की त्या सर्व तरुणांना त्यानी सण्डोज कंपनि मधे कामगार म्हणून भरती करुन घेतले. अशा रीती ने स्थानिक जनतेचा परदेशी कंपनिवर काही कारणास्तव राग होता तो ही नाहीसा झाला. त्यातील बरेच लोक आता निव्रुत्त झाले आहेत.

गामा पैलवान Mon, 02/23/2026 - 22:23
राजेंद्र मेहेंदळे,
माझे आजोळ तलावपाळीला ठाण्यात आणि मी रहायला कल्याणात--एकदम उलट---आहे की नाही गंमत?
होय तर. गंमत आहेच. तलावपाळीवर कुठेशी आलं तुमचं आजोळ? तरणतलावापाशी असेल तर आपण दोघे एकमेकांच्या आजोळी पोहायला शिकलो. आ.न., -गा.पै.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान Tue, 02/24/2026 - 19:22
मी पोहायला शिकलो तो तरणतलाव लालबागेतंच आहे. आपण परस्परमातुलग्रामतरणशिक्षासंबंधी जाहलो. म्हणजे एकमेकांच्या आजोळी पोहावयास शिकलो. -गा.पै.

सौंदाळा Tue, 02/24/2026 - 17:43
खाडीत पोहायला शिकणे म्हणजे डेंजर काम आहे. मी ६-७ वर्षाचा असताना टीव्ही बघून पलंगावरुन कार्पेटवर उड्या मारुन पोहण्याची अ‍ॅक्शन करायचो त्यामुळे मोठ्या अपेक्षेने वडीलांनी मला आणि पाण्याला घाबरत असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीला महापालीकेच्या जलतरण तलावावर नेले. (बहीण एक-दोनदा बीचवर गेलो होतो तेव्हा पाण्याला पाय लावायला पण घाबरत होती.) पण खरोखर पोहायची वेळ आली तेव्हा माझी तंतरली. रडून धिंगाणा आणि नंतर ताप त्यामुळे कसाबसा दोन-तीनदाच गेलो. उलट बहिण मात्र आठवड्यातच छान पोहायला शिकली. त्यानंतर एकदम २५ व्या वर्षी कामचलावू पोहायला शिकलो. ते अजून पण पोहतो कसेबसे ५० मीटर!! पण अगदीच काही न येण्यापेक्शा बरे. तेवढेच कुठे रिसोर्टवर वगैरे गेलो की बायकोसमोर (स्वतःच्या) शायनिंग मारता येते आणि तिला चिडवता येते की कोकणात राहून पण पोहायला शिकली नाहीस म्हणून. त्यामानाने खाडीत पोहणारे म्हणजे भारीच नुकतीच बेरीज / वजाबाकी शिकलेल्यासमोर इंटेग्रेशन करणारा विद्यार्थी :)

कालच एक जुना मित्र बरेच दिवसांनी भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात गप्पा खाडीवर पोहण्याकडे वळल्या. आणि झरकन सगळ्या आठवणी एक एक करून डोळ्यापुढे नाचू लागल्या. मी गोष्ट सांगतोय साधारण ९० ते २००० या काळातील. कल्याणात जरी इमारती बांधायचे पेव फुटले होते तरी अजूनही कुठेकुठे कौलारू घरे होती. रस्त्यावर रिक्षांबरोबर टांगेही चालत होते. पारनाका ,दूधनाका, बाजारपेठ टिळक चौक, अहिल्याबाई चौक इतक्या भागात चालत फिरता येत होते आणि दैनंदिन गरजा भागत होत्या. पण कल्याणात फिरायला जाण्यासारखी ठिकाणे दोनच. खाडी किंवा रेतीबंदर आणि सुभाष मैदान. आता खाडी म्हणजे कल्याणची उल्हास नदी.

गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक

कंजूस ·
गोकर्ण भेट, उत्तर कर्नाटक

In reply to by प्रचेतस

कंजूस Sat, 02/21/2026 - 19:05
नाही, कोणत्याच पुजेच्या मंदिरात फोटो काढता येत नाहीत. हंपी बदामीवगैरे ठिकाणी असलेली मंदिरे पुजेची नाहीत त्यामुळे आपण फोटो काढतो. ( विरुपाक्ष मंदिरात पुजा होते तो अपवाद.) महाबलेश्वर ( हाच उच्चार) मंदिर चुना विटांचे साधेसुधे आहे. गुहागरचे व्याडेश्वर आहे तसं. महागणपती मंदिरात मात्र लाकडाचे खांब,तुळया आहेत आणि अधिक आकर्षक आहेत.

Bhakti Sat, 02/21/2026 - 16:36
भारीच कंकाका ,या धाग्याचा खूप फायदा होणार.बीच क्लास आहेत.'बिंबले'-आताच चेपुवर एक पोस्ट पाहिली .आधी तोंडलेच वाटले .पण हे वेगळे हे समजले.

In reply to by Bhakti

कंजूस Sat, 02/21/2026 - 19:13
बरोबर. मी स्थानिक बसचा प्रवास दिला आहे पण स्वतः घ्या वाहनाने अधिक सोयीचे होईल. सर्व किनारे सहज पाहून होतील. देवळांच्या दर्शनाच्या वेळा लक्षात ठेवणे जरुरीचे आहे. तसेच किनाऱ्यावर भारतीय लोक उन्हाची वेळ टाळत असले तरी परदेशी लोक भर उन्हात समुद्रस्नान आणि वाळूत पडून राहण्यासाठीच येतात. इथे एक जाणवते की तरुण समुद्र किनाऱ्यावरच्या परदेशींचे फोटो काढत फिरताना दिसत नाहीत. कुडले बीचवर परदेशी फार आनंदात फिरताना दिसले. गर्दी नाही.

दोसतारः शाळेत लग्न लागते (१)

विजुभाऊ ·

दोसतार इज ब्याक!! वाचतोय आणि लवकर पुढचे भाग येउंद्या. खरेच आता झुंबर पंखा शारदा संगीत पुन्हा वाचायला पाहीजे निवांतपणे लगे रहो विजुभाउ

In reply to by कपिलमुनी

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:29
बर्‍याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे, एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:30
त्यामुळे परत सुरू करतोय. पाहुया या वेळेस ते तिघे काय काय खोड्या करतात. तुमचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.

सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्‍या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही. कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्‍याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्‍याची चटणी तरी हवीच. पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा.

आणि माऊंट किनाबालू सर झाला...

सोत्रि ·

गामा पैलवान Fri, 02/20/2026 - 23:28
सोत्रि, भन्नाट अनुभव आहे. चांगलीच दमछाक करवणारा चढ आहे. बहुतेक तुम्ही दीर्घ पल्ल्याचे धावपटू असल्याचा काही फायदा झाला असावा. आ.न., -गा.पै.

Bhakti Sat, 02/21/2026 - 11:17
लईच तुफानी!!!
तासाला एक किलोमीटर हा वेग ठरवून ठेवला होता.
यावरून ही मोहीम अवघड आहे हे कळतंय. तू-नळी शॉर्ट पहिले.. शेवटी शेवटी तरी रॅम्पलिंगसारखी चढाई वाटत आहे. सकाळी लेख वाचला होता त्यामुळे प्रेरणेने आज २ किमी अधिक चालले (मॉर्निंग वॉल्क ). हो द्या या चिरतरुण जोडीच्या अजून साहसी मोहिम!

माउंट किनाबालू, ईस्ट मलेशिया ह्या बेटावरील (बोर्निओ आयलंड) साबा ह्या राज्यातला, मलेशियातील आणि साऊथ ईस्ट आशियातील सर्वात उंच पर्वत आहे. आणि, जगातील बेटांवर असलेल्या पर्वतांमध्ये जगात तिसऱ्या नंबरचा उंच पर्वत; ज्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 4095 मीटर आहे. गिर्यारोहकांमध्ये चढाई करण्यासाठीचं एक मानाचं नाव आहे माउंट किनाबालू (स्थानिक भाषेत गुनुंग किनाबालू) .

भिवंडी ची दवंडी

बाजीगर ·
लेखनविषय:
भिवंडी ची दवंडी भाजपा ने धरला काँग्रेस चा हाथ !! राष्ट्रवादी(शप) ची घेतली साथ || भाजपात फूट, 9 जणांची लूट || नारायण चौधरी भाजपा बंडखोर, होणार आता, भिवंडी महापौर !! सत्तेसाठी ताताथैया विरोधक आता एकशैय्या || -------------------------- भिवंडी बलाबल एकूण ९० बहुमत पाहिजे ४६ combo-1 : भाजप 22 शिवसेना 12 राष्ट्रवादी (SP) 12 = 46 combo-2: भाजप 22 शिवसेना 12 समाजवादी 6 , कोणार्क विकास आघाडी 4 भिवंडी विकास आघाडी 3 = 47 पण झाले combo -3 कांग्रेस 30 भाजप 9 राष्ट्रवादी (SP) 12 = 51

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ उत्तराखंडमधल्या दुर्गम वाटेवरचा जीप प्रवास ✪ गोरी गंगेच्या तीरावर! ✪ जौलजिबी परिसरातल्या मदतकार्याच्या आठ्वणी ✪ मुन्सियारी- एक विलक्षण गाव ✪ नंदा देवी मंदिराचा ट्रेक ✪ पंचाचुली शिखरांच्या मागे होणारा चंद्रोदय! ६ डिसेंबरच्या पहाटे सत्गडवरून निघालो. जेमतेम उजाडायला लागलं आहे आणि जीप यायची वेळ झाली. आदित्यने मला खाली रोडवर सोडलं. सगळ्यांत मागच्या सीटवर बसून निघालो. सोबत टेलिस्कोप आणि बायनॅक्युलर असल्यामुळे ते सामान माझ्यासोबतच ठेवलं. सत्गडवरून मुन्सियारी अंतराने कमी म्हणजे फक्त १०८ किमी आहे. पण वाटेत सगळा पहाड़ी प्रदेश आणि बिकट रस्ता! त्यामुळे जायला निदान ४-५ तास तरी लागणारच.

अंडा घोटाला-बालकथा

बिपीन सुरेश सांगळे ·

वगळता चांगली कथा. मुलांच्या कथा अशा रँडम सिली आणि वाह्यात असल्या की मजा येते. ते संदेश वगैरे फार बोर प्रकार.

अंडा घोटाला-बालकथा --------------------------------------------------------- रविवार सकाळची वेळ. अनया आणि अनिलला जाम भूक लागली होती. ते आईच्या मागे लागलेच होते ,तोच आईला एक फोन आला. वरच्या आजींना बरं वाटेनासं झालं होतं. आई गडबडीने त्यांच्या घरी गेली. आता काय करायचं ? बाबाही मित्राकडे गेलेले. अनिल मोठा होता. तो म्हणाला , ' अने, घाबरू नकोस. मी आहे ना. मी अंड्याचं ऑम्लेट करतो.एकदम खुसखुशीत !’ ‘ऑम्लेट अन खुसखुशीत ? ओके ! ते खुसखुशीत ऑम्लेट तूच खा हं. मला आपलं साधंच दे,’ तीही बोलायला भारीच होती. अन्याने मोठया ऐटीत आईचा ऍप्रन पोटावर बांधला. काळ्या - पांढऱ्या चौकडीचा.

उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.

कंजूस ·
उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 12:21
मस्त लेख. याना रॉक्स पाहायला कधीचे जायचे आहे. लवकरच योग येईल. अद्भूत नैसर्गिक रचना आहे. भोवती अत्यंत दाट जंगल आहे. काजूंची माहिती उत्तम. आता गर्दी कितपत होती? सध्या दिवाळीनंतर कोस्टल कर्णाटकात बरेच जण जातात त्यामुळे हल्ली येथे गर्दी व्ह्यायला लागली आहे. गोकर्ण आणि मुर्डेश्वरवर पण लिहा.

कंजूस गुरुवार, 02/19/2026 - 13:52
पुढच्या भागांत गोकर्ण आणि मुर्डेश्वरावर लिहितो. गर्दी अजिबात नव्हती. कोस्टल कर्णाटक नावाची अनुभव ट्रावल्सची सहल बरेच वर्षे प्रचलित आहे. आता त्यांनी सुधारणा करून उडुपी श्रीकृष्ण मंदिर वाढवले आहे. कोस्टल कर्णाटक ह्या खरं म्हणजे तीन सहली म्हणता येतील. कारण किनाऱ्याकडून फिरतानाच थोड्या जागा घाटात वर चढून बघणे संयुक्तिक ठरते. जर घाटातल्या वरच्या जागा फिरायच्या झाल्या तर फार प्रवास करावा लागेल. धार्मिक स्थाने स्त्रीमध्ये अंतर्भूत केली की सहली लवकर बुक होतात हे सहल आयोजकांना ठावूक असते. देवळे बारा ते पाच बंद ठेवली जातात त्यामुळे खूप धडपड करावी लागते. दुपारचा मधला वेळ वाया जातो. १) हुबळीकडून अन्शी किंवा दांडेली मार्गे कारवारला येणे - पुढे गोकर्ण पाहाणे - कुमटाहून याना करून शिरसी मार्गे येल्लापूर रस्त्याने हुबळीला परत जाणे. यात बनवासी, सोंधा आणि सहस्रलिंग वाटेतच होऊन जाते. कुमटाहून पुढे होन्नावरा मुर्डेश्वर करून परत कुमटा येणे. होन्नावराच्या वरती असलेला जोग धबधबा फक्त पावसाळ्यातच शक्य आहे कारण एरवी त्यात पाणी नसते. वरती एक मोठे लिंगण्णामक्की धरण शरावतीवर बांधल्याने पाणी आटले. # बैंदूर - मुकाबिंका - कुदुरेमुखा पर्वत - कळसा - चिक्कमगळुरु ही सहल बंदच म्हणता येईल कारण कुदुरेमुखा बंद केले आहे. २) उडुपी - वरती श्रींगेरी- चिक्कमगळुरु परत खाली धर्मस्थळा (मंजुनाथा) मंगळुरू. ३) मंगळुरू - मडिकेरी ( कूर्ग)- मैसुरू एका आठ दिवसांच्या सहलीत सर्व शक्य नाही.

चौथा कोनाडा गुरुवार, 02/19/2026 - 17:27
व्वा .. सुंदर माहितीपुर्ण धागा.... प्रचि देखिल अगदी समर्पक. याना केव्हज लैच भन्नाट दिसतंय ! आजकाल याची खुपच चर्चा होतेय ! ही सहल बादलीयादीत आहेच ... बघु कसा योग येतो ते धन्यवाद कंजुससर !

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 02/19/2026 - 19:40
मस्त भटकंती!! वाचतोय. कोस्टल कर्नाटक राहुनच गेलेय आणि बकेट लिस्टात आहेच. पण अनुभव बरोबर जावे की स्वतःच्या गाडीने की कोकण रेल्वेने असा गोंधळ आहे मनात. कसेही गेलो तरी ७-८ दिवस लागतीलच त्यामुळे सुट्टीचेही प्लॅनिंग करावे लागेल. बजेटही बघावे लागेल. एक शंका- पुण्याहुन करायचे असल्यास कुठला घाट घ्यावा? म्हणजे ७-८ तासात किनारपट्टीवर पोचता येईल? आंबा/गगबावडा/उत्तूर की अजुन पुढचा एखादा?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कंजूस गुरुवार, 02/19/2026 - 21:21
वरच्या एका प्रतिसादात दिलेला मार्ग क्रमांक (१) घ्या. आपल्या वाहनाने एका घाटाने म्हणजे हुबळी - कारवार असे खाली या. पुण्याहून हुबळी पर्यंत एखादा सोयीचा स्टे कुठेतरी घ्यावा. वाटेत अन्शी किंवा दांडेली लागेल. तर हा भाग खरं म्हणजे काळ्या बिबट्यासाठी नावाजलेला असला तरी रस्त्याने जाताना हॉर्नबिल पक्षी दिसण्याची शक्यता अधिक आहे. इकडे हे पक्षी खूप आहेत आणि त्यासाठी अभयारण्यात जाण्याची गरज नाही. मग किनाऱ्याकडचे कारवार - गोकर्ण - कुमटा आणि मुर्डेश्वर करत करत कुमठा - शिरसी रस्त्याने हुबळी परत जाता येईल. त्यात इडगुंजी हे ठिकाणही होईल. पावसाळा असेल तेव्हा होन्नावराजवळचा अप्सराकोंडा हा छोटासा रम्य धबधबाही पाहून होईल. होन्नावरामध्ये १) खारफुटी जंगलात फेरफटका, २) शरावती नदीत बोटिंग करता येईल. अनुभव ट्रावल्स देते ती सर्व ठिकाणे आपल्या सोयीनुसार पाहता येतील.

In reply to by कंजूस

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 21:25
हा रस्ता गैरसोयीचा आहे. सातारा ते बेळगाव प्रचंड डायव्हर्जन्स आहेत. सगळीकडेच रस्त्याचे काम चालू आहे. सध्या तरी मनस्ताप होतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस गुरुवार, 02/19/2026 - 21:23
पुण्याहून जायचे असल्यास एकतर ताम्हिणी किंवा कराडला लवकर पोचून मलकापूर मार्गे अणुस्कूरा. दोन्ही घाट आणि त्यापुढील रस्ते अगदी उत्तम आहेत. मुंबई गोवा महामार्गावर काही ठिकाणी अजूनही काम सुरू आहे पण माणगाव सोडल्यावर बऱ्यापैकी जलद जाता येते. अणुस्कुरा मात्र मलकापूर सोडल्यावर निर्जन आहे, वाटेत खायची प्यायची सोय फारशी नाही मात्र रस्ता अगदी उत्तम आहे. घाट उतरल्यावर थोडासा खराब पॅच आहे फक्त पण सहज साध्य आहे.

कंजूस गुरुवार, 02/19/2026 - 22:57
हे दोन मार्ग असे आहेत? कोल्हापूर पणजी मार्ग https://youtu.be/TuhCZGfiRWU?si=C_J2j4JdoW3_vynN पुणे ते कारवार https://youtu.be/ivqp8NKLQPE?si=rPdCXpDMvvVlACAM एकदा का महाराष्ट्र सोडला की पुढचा कर्नाटकातला प्रवास चांगला होईल.