Skip to main content

वेड हे रक्तात माझ्या...

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 20/11/2007 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
वेड हे रक्तात माझ्या वादळाशी झुंजण्याचे जे किनार्‍याचेच प्रेमी वेगळे सगळेच त्यांचे पेटले वणवे विखारी ज्यात मी झोकून देई वाचवाया कातडी ना, कौल मिळती काळजाचे होऊ दे उध्वस्त आयू, होऊ दे जखमी जटायू घ्येयपथि हे घातलेले गालिचे ही कंटकांचे जो लढे लोकार्थ त्याला भुलविती ना शब्दलेणी दार मौनाचे खुणावी आतले हृदयांतरीचे नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3361
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अशोक राव, अप्रतिम गजल... संदीप खरे यांच्या "जपत किनारा शिड सोडणे... नामंजूर" या कव्वालीचे आठवण झाली. नाव गेली दूर आता राहिले मागे क्षितीज रोखलेले शोधडोळे चमकती दीपगृहाचे या ओळी विशेष भावल्या... - प्राजु.

In reply to by प्राजु

म्हणतो.. तात्या.