मोगरा फुलला...
आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर, मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो
आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की आपलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात...
सुरेख
झकास ----------
रंगा,
सर्व प्रकट आणि अप्रकट आस्वादकांचे आभार!
अफलातून .........
:)