Skip to main content

'सेने'तिल काटे...

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 22/03/2008 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा कवी 'अनिल'यांचे 'वाटेवर काटे..'हे अप्रतिम गीत. (स्वरबद्ध केलंय आपल्या अजरामर आवाजात पं.वसंतराव देशपांडे यांनी!) 'सेने'तिल काटे बोचून धावलो वाटले फुला परि कुजून चाललो जमवुनि 'मन'चेहि कधी, तोच 'हात' फेरूनि कधी आपुलीच मुंबापुरि म्हणत चाललो 'उत्तरे' प्रमाद होत! 'शिशिराची' घेत साथ 'असीम','अमर', भैय्ये ठोकून चाललो चुकता ही एक चाल, लागला 'विलासि' बोल 'शरदा'चे चांदणे शोधीत चाललो खांद्यावर 'बाळ'गिले, ओझे ते 'उद्धरुन' 'नवनिर्माणा'स अता परत चाललो चतुरंग

वाचने 3551
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

राजगीत सुरेख जमलय! घटनाक्रम मोजक्या शब्दात पण नेमका मांडणे हे वैशिष्ठ्य पुन्हा जाणवले

कमाल केलीस बुवा! झक्कास विडंबन. कुठल्याही दर्जेदार मराठी वृत्तपत्रात अगदी मुख्य पानावर छापून यावे असे! अजून काय दाद देऊ? तात्या.

या विषयावर्हि विडंबनात्मक का होईना कविता होऊ शकते? आपल्या प्रतिभेस सलाम. (सौ. प्रतिभाताईंस नव्हे.) अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

झकास... मनसे आवडले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे