कृपया हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्या व भविष्यात इथे शक्यतोवर मराठीतच लिहा ही विनंती! अन्यथा नाईलाजाने आंग्ल भाषेतील लेख उडवावे लागतील असे खेदाने म्हणावेसे वाटते!
प्रसंगानुरुप व आवश्यकतेनुसार एखाद दुसरी ओळ किंवा एखाद दुसरा उतारा आंग्ल भाषेत असणे हे समजू शकते. परंतु मराठी संस्थळावर मुद्दामून संपूर्ण लेखच इंग्रजीत लिहिलेला पाहून एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते!
'१० टक्क्यांपेक्षा जास्त रोमन अक्षरे नकोत' हा इतर मराठी संस्थळांवर असलेला जाच मिसळपाववर नाही, याचा कृपया गैरफायदा घेऊ नये, एवढीच विनंती!
कळावे,
आपला नम्र,
तात्या.
--
बच्चा समझके कंधे पे लिया तो कानमे मुतता है! :)
(--नाना पाटेकरांच्या एका चित्रपटातील वाक्य!)
हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे परतू मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही. तात्या आपन एखादि गरिब मुलासाठी संस्था चालवी आहे का? जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते.
आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या....
व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे.
संजीव नाईक
वास्तू आणि ज्योतिष समूदेशक
मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३
जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते.
गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका!
आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या....
नक्की देईन!
व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे.
ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही.
असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा!
जाता जाता -
मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती!
आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज निधी,
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.
मराठी तून लेख लिहुन अनुदान मिळवून दाखवा
उपक्रम कितीही चांगला असला तरी अशी आव्हानात्मक शब्दरचना मराठी भाषेची अवहेलना करणारी वाटते (कदाचित तसा उद्देश नसेलही). इंग्रजी माध्यमाची शाळा चालवायची, इंग्रजी भाषेत माहिती पुरवायची, मराठी भाषेची अवहेलना करायची आणि मराठी भाषकांनाच आवाहन करायचे हे जरा गळी उतरत नाही.
लेखनाचा आशय समजला आहे. विचार करू.
श्रीमंत आर्य
आपल्या विनंतीस मान देण्याचा प्रयत्न करीन. झालेल्या त्रासा बद्द्ल दिलगिरी .
संजीव नाईक
वास्तू आणि ज्योतिष समूदेशक
मोबाईल नं. ९४२३०८६७६३/९८६९००८२६३
आपणास मराठी लिहिता येत असतांना इंग्रजीचा आधार का घ्यावा लागला ते समजले नाही.
मात्र मराठी संकेतस्थळावर मराठीतच लिहिले पाहिजे,याचे आम्ही समर्थन करतो.
आपल्या सामाजिक उपक्रमास आणि या पुढील येथील आपल्या मराठी लेखनास आमच्या शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तात्या हे दुसर्यांदा झाले...याच विषयीचे एक निवेदन असेच इंग्रजीत आले होते.....तेंव्हाही याना असाच प्रतिसाद मिळाला होता.
इतर कोणत्या साइट वर असे चालले असते का?
तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येते...
त्यानी मिपा वर
दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.
प्रेषक संजिव ( मंगळ, 03/25/2008 - 09:55) .
|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ||
दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.
हा अंधश्रद्धा पसरवणारा लेख उत्तम मराठी मधे लिहीलाय
प्रतिक्रिया
मराठी!
हे मराठी संकेतस्थळ आहे याची मला जाणीव आहे .........मराठी तून लेख
गैरसमज..
मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे
भाषा...
सदर विषया वर भाष्य टाळणे योग्य आहे
मला मराठी लिहण्याची कला अजुन अवगत झाली नाही
मराठीतच लेखन केले पाहिजे.
विनंतीस मान
हे दुसर्यांदा झाले........
तात्या हे सम्जीव खोटे बोलताहेत्...त्याना मराठी चांगली लिहीता येत