मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टवाळ्क्या

चेतन ·

विसोबा खेचर 25/03/2008 - 19:47
चेतन, आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या मस्त रे! आपला, (मिपावरचा टवाळ) तात्या गोरे! :) अवांतर - जमल्यास तुझं नांव तेवढं देवनागरीत करून घे बाबा!

आवतिभोवतिच्यांना असते काम, आमच्या नेहमीच्याच टवाळ्क्या गावातल्या कट्ट्यावर बसुन, आम्ही पिटत असतो चकट्या लोकांना असते रोजंचं टेन्शन, ते न घेणं हेचं असतं आमचं इन्टेन्शन त्यांना वटते आपण खूप पुढे जावे, आम्ही मात्र ठेविले अनंते तैसेचि रहावे आमच्याकडे विषयांची कमी कधीच नसते, क्रिकेटम्ध्ये हार जीत तर होतचं असते कट्ट्यावर बसुन आम्ही नेत्यांना शिव्या देतो, आम्ही मात्र फक्त टवाळ्क्या करतो ||

पुण्यातील एका स्कूटरचे आत्म(घातकी)व्रूत्त्.....(तमा पुणेकरांची "स्थूल्"मानाने क्षमा मागून)

उदय सप्रे ·

प्राजु 25/03/2008 - 23:18
हाहाहा... तू टांग सखे वर काय समजून टाकशी आज इंजिनास भरते धडकी सायलेन्सर पण तणतणतो..... हे एकदम सहीच.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

उदय सप्रे 26/03/2008 - 09:06
प्रिय प्राजु(सर्वव्यापी), आभिप्रायाबध्दल धन्यवाद ! माझ्या काही लिन्क्स ३ लेख आणि १ कविता मी दिल्या आहेत्,जमल्यास वाचून पहा आणि कळवा आपले मत. - उदय गंगाधर सप्रे-ठाणे.

आमचे स्फूर्तीस्थान : संदीप खरे आणि आपले आवडते विडम्बनकार केशवराव..... बसतेस वरी तू जेंव्हा जीव बसका फुसका होतो पळण्याचे सुटते भान टायर ही फाटका होतो..... ऊर फाटुन नीज उडावी कल्लोळ तसा ओढवतो स्टिअरिंग दिशाहीन होते कुणीतरी* पोरका होतो.....

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ३

विजुभाऊ ·

विजुभाऊ 25/03/2008 - 13:57
तात्या ईतर ठराव कुठे मांडू?नव्या चौकात का?

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 25/03/2008 - 16:45
नव्या चौकात, नव्या लेखाने मांडावेत ऐशी आम्ही आपणास विणंतीवजा आज्ञा करितो! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

विजुभाऊ जोरात सुटले आहेत्..सव्वीस अधिक एकशे ऐ॑शी महिन्या॑चा हिशेब कधीच मागे पडलाय...नव्हे॑.. आता उलटी गिनती सुरू झालीय्.. हो की नाही केशवसुमार? पण विजुभाऊ, खरेच छान लिहिताय्..तुमचे लिखाण वाचोन आम्हा॑स भाईकाका॑च्या 'पुरूषराज अळुरपा॑डेची' आठवण झाली आपला, (सरदार दंताड वैदु) प्रसाद दाढे

विसोबा खेचर 25/03/2008 - 16:46
उत्तोताम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या सोबत काही यवन पेये ही होती. यांचा लत्तप्राहार काही और असतो असे सरदार धमाल यानी वैयक्तिक अनुभवावरुन सांगितले. वा वा! मस्त भाषा! कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या हे तर लैच भारी! :) झक्कास बर्र का विजूभाऊ! तुम्हासारखी एकापेक्षा एक अनमोल रत्ने मिसळपावला मिळाली आहेत हे मिपाचे भाग्यच म्हटले पाहिजे! :) मस्त धमाल सुरू आहे, चालू द्या..! :) --श्रीमंत श्री संत तात्याबा महाराज मिसळपाववाले.

प्राजु 25/03/2008 - 23:15
आपला घोडा जोरात दौडत नसावा अशी आम्हांस शंका उत्पन्न होते आहे.. तरी आपल्या घोड्यास यथोचित चारा-पाणी करोनी आपण घोडा मैदान लवकर गाठावे ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

.....कित्येकांस तर ** भाल अथवा ललाटात गेल्यासारख्या भासले. हा:..हा:.हा: ... बखर काळापासून ही 'प्रथा' अस्तित्वात आहे तर.... उत्तमोत्तम विदेशी वाणाच्या कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार होत्या. धुवांधार पाऊस आणि कुक्कुट दांपत्याच्या लाथा खरपूस भाजोन तैयार म्हणजे विचारुच नका. तोंडाला पाणीच सुटले.

तर ** भाल नरड्यात मझा आहे बॉ बालगीत आमच्या काळी पण होते की. मग नंतर डमडम डिगा म्हटले की नाही. पण झकास बखर मजा आली. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

3

दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो.

संजीव नाईक ·

अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? *|:-)} > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

आर्य 25/03/2008 - 10:16
आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त व्हायला तरी हे म्हणायलाच हवे. ! मंगालमुर्ती मोरया ! (गणेश भक्त) आर्य पण कर्ज कुठून आणायचे - हे मात्र मान्य

विजुभाऊ 25/03/2008 - 13:53
हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? या असल्या स्तोत्रांचे आणि कर्मकांडांचे स्तोम माजले त्यामुळे भारत रसातळाला गेला. असली स्तोत्रे म्हणत आपला क्रियाशील वेळ वाया घलवणार्‍या दहा तरुणांपेक्षा मैदानावर फूट्बॉल खेळून शरीर घडवीणारा एक तरूण शंभर पटीने चांगला.... हे विचार स्वामी विवेकानंदांचे आहेत . क्रुपया असल्या भाकड अंधश्रद्धांचे प्रसार करु नका. ( हे त्या साईबाबा मिरॅकल्...अग्रप्रेषीतासारखेच .**** पणा आहे) अन त्यासाठी मिपा सदस्यांचा वापर तर मुळीच नको. मेहनत करुन कर्ज मुक्त व्हायचे की स्तोत्रे म्हणुन......हे आपणच ठरवायचे......... मला तर कष्ट करुन ( हो आय टी वाले ही बौद्धीक कष्ट करतात) आयुष्य मनसोक्त जगायला आवडेल .............विजुभाऊ

विजुभाऊ 25/03/2008 - 13:53
सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी रुपये वाचले असते... विदर्भातल्या कर्जाखाली पिचून आत्महत्या करणार्‍या शेतकरी बांधवाना सरकारने हे स्तोत्र शिकवण्यासाठी सरकरने स्तोत्र पाठशाळा काढाव्या....अशी शिफारस आपण करुया का?

In reply to by विजुभाऊ

तळेकर 26/03/2008 - 21:09
भारत सरकारचे ६०,००० कोटी रुपये . असे म्हणायचे असावे. असो. तर असे अंधश्रद्धा वाढवणारे लेखन आपल्या या संकेत स्थळावर प्रकाशित होवू नये याची काळजी घ्या ! - तळेकर

धमाल मुलगा 25/03/2008 - 10:21
वा स॑जिव गुरुजी... इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण आध्यात्मासारख्या घनग॑भीर विषयाला हाताळून एक वेगळेच वजन निर्माण केले आहे अस॑ मला वाटत॑. :-) आपल्या इतर लेखा॑च॑ थोड॑ वाचन केल॑ही (झेपेल इतपत)...कि॑तु अजुन तरी आमची 'क॑फर्ट लेव्हल' (मराठी?) तिथेपर्य॑त न पोहोचल्याने प्रतिसाद देण्याचे टाळले. असो. अंगारकी योगानिमित्त मिसळपाव च्या समुदायास सप्रेम भेट गणेश भक्त संजिव धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया !!!

आनंद 25/03/2008 - 13:50
कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!!

अनिकेत 25/03/2008 - 13:54
मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी योजना जाहीर करेल. जाता जाता...हे स्तोत्र कर्जमुक्ती कशी देणार? सावकर्‍याला सद्बुध्धी देणार की मला घबाड? आणि आता कुणाला उधारी द्यायला नको. अनिकेत

नीलकांत 25/03/2008 - 14:21
मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? नाही आता विदर्भात कोरडवाहूच्या पाच एकरावरच्या अनेक शेतकर्‍यांना हे सांगू शकतो. नीलकांत

विसोबा खेचर 25/03/2008 - 20:18
मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या.

संजीव नाईक 25/03/2008 - 22:38
असेल बुवा... प्रेषक सृष्टीलावण्या ( मंगळ, 03/25/2008 - 10:08) . अनुभूती घ्यायलाच हवी. पण कर्ज कुठून आणायचे कमी करण्यासाठी? मना बोलणे नीच........ आपण दैनदिनी जिवनात कर्ज ( पैसा नव्हे ) घेत असतो. आपले उत्तर शेवटी बघा.......... " अनुभूती घ्यायलाच हवी. " प्रेषक आर्य ( मंगळ, 03/25/2008 - 10:16) . आपण आम्हाला दिलेल्या या ॠणमोचनमहागणपतिस्तोत्राच्या ॠणातून मुक्त ! मंगालमुर्ती मोरया ! आपले उत्तर शेवटी बघा.......... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? प्रेषक धमाल मुलगा ( मंगळ, 03/25/2008 - 10:21) . इथ॑ मिपावर बाकी सगळे प्रकार स्वच्छ॑दीपणे चालू होतेच. त्यात आपण.... याचे सर्व श्रेय श्री.. १) तत्या २) प्रदिप काका ३) प्रा. डॉ. प्र. बिरुटे ४) पेशवे ह्याना जाते. प्रेषक आनंद ( मंगळ, 03/25/2008 - 13:50) . कर्ज आपण घ्यायच आणि त्रास मात्र बाप्पाला द्यायचा!!! सफ चुक.. उत्तर खाली बघा.... प्रेषक अनिकेत ( मंगळ, 03/25/2008 - 13:54) . मी तर कर्जबाजारी आहे... बघतो करून, कुणी सांगावं, सरकार एखादी कर्जमाफी परिश्रम करता वाळुतुन तेल ही निघे.......... प्रेषक नीलकांत ( मंगळ, 03/25/2008 - 14:21) . मी सहजच विचारतोय... काहीही न करता मी हे स्त्रोत्र एक वर्ष म्हटले तर सगळंच कर्ज फीटेल का? » उत्तर खाली बघा.......... प्रेषक विसोबा खेचर ( मंगळ, 03/25/2008 - 20:18) . मिपावर काहीही वर्ज्य नाही...परंतु याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही उगीचंच अंधश्रद्धा पसरवणारे लेख लिहावेत! गणेशस्तोत्र म्हटल्याने तुमचे कर्ज कमी झालेही असेल कदाचित, परंतु तो तुमचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. परंतु म्हणून सगळ्यांनाच असा अनुभव येईल अशी उगाच भाबडी समजूत पसरवू नका प्लीज! मिपावर तुम्हाला पुराणातलं, अध्यात्मातलं, काय लिहायचं ते लिहा, परंतु कृपया कोणतेही अंधश्रद्धा पसरवणारे लेख किंवा स्वामी समर्थांचे, साईबाबांचे चमत्कार सांगणारे लेख इथे लिहू नका. अन्यथा ते अप्रकशित केले जातील असं विनम्रपणे सांगू इच्छितो! स्वामींचे, साईबाबांचे चमत्कार आणि त्यांचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव असू शकतो हे मी नाकारत नाही, परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती... आपल्याला वैयक्तिकरित्या जर काही स्वामींचे अथवा साईबाबांचे अथवा गणपतीचे अनुभव आले असतील तर ते मला आलेले अनुभव असा स्पष्ट उल्लेख करून अवश्य लिहा, त्याला मिपाची कधीही ना नाही! परंतु 'अमूक स्तोत्र म्हटल्याने अमूक होतं, तमूक देवाला नमस्कार केल्याने तमूक होतं' अशी कोणतीही जनरलाईज विधाने कृपया करू नका आणि अंधश्रद्धा पसरवू नका, ही नम्र परंतु शेवटची विनंती! आपला, स्नेहांकित, (लालबागच्या राजाचा कट्टर परंतु डोळस भक्त!) तात्या. माझ्या सर्व मिपा वरिल .टिपणीकार आपन फसलात आहात ........... असो माझे सद्गरुच्या शोधात भाग १,२,३, प्रकशित झाले. पदे, स्तोत्रे, अभंग, गाणी ह्यातील छंद, स्वर, ताल, लय मनातिल चेतना जागृत करण्यास मदत करते. स्वामी विवेकानंद ह्यांनी सुध्दा विविध स्तोत्रे जगकल्याना करता म्हटली आहेत. तसेच शंकराच्यार्याणि सुद्धा क्रांती घडवण्यासाठी स्तोत्राचा उपयोग केला आहे. श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो. ह्याचाच उपयोग पुर्वीच्या संतानी केला आहे. पण आताचे संत आपले श्रेष्टत्व स्थापन करण्यास निघालेले आहेत. माझ्या लेखाचा मुळ उद्देश अंधश्रद्धा पसरण्या संता पासुन समाज्यास रोखण्याचा आहे. ह्याची नोंद घ्यावी. गुरु कसा असावा .......... तर त्यांनि स्वपरिश्रमाने मठ स्थापन करावा पण त्याचा उपभोग घेउनये. ह्या गोष्टी वर माझ्या लेखाची मुळ संल्कपना आहे. लेखातिल काही पदे, स्तोत्रे, भजने ह्यागोष्टी चा सर्दभ मी सन १९२० च्या अगोदर प्रकाशीत झालेल्या संर्दभातुन घेतला आहे. आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) असो आपण जर पुढील लेख वाचण्याची इच्छा असेल तर तसे कळवा प्रसिध्द करण्या अगोदर माननी मिपा यांची परवागी घेईन. क्षमस्व संजिव

In reply to by संजीव नाईक

अनिकेत 25/03/2008 - 23:55
श्री गणपत्ती स्तोत्र किवा पदे, अभंग, गाणी तालात सुरात लयबद्द गतिने म्हट्ल्यास शरीरातिल चेतना जागृत होऊन आपण योग्यतो निर्णय घेऊन शकतो आपणास म्हाहीत असेल की संगितात केवढी ताकत आहे. की जे मनातील दु:ख कमी करुन योग्य रागत योग स्वरलाउन भाषण, पद, कविता, स्तोत्र, गाणे म्हटल्यास शरिलाला जी चेतना मिळते ती कशातही मिळत नाही. ( काय? तात्या संगितात आपण तज्ञ आहात......) साहेब पन तुमी तर म्हनत व्हता की करज माप हुईल... ही कोन ती चेतना बया कुठनं आली मधचं? अनिकेत

In reply to by संजीव नाईक

विजुभाऊ 26/03/2008 - 10:34
प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . हे स्तोत्र क्रेडीट कार्ड धारकांसाठीही आहे का? हे विचार स्वामी विवेकानंदाचे ग्रंथ आपण वाचले आहेत का? हो वाचले आहेत्.अमलात ही आणतो आहे.....विवेकानन्द /सावरकराना हिंदुवादी मानायचे पण त्यांचे विचार वाचायचे नाहीत अमलात आणणे तर दूरच ही असली भोंदु आणि आपमतलबी विचारसरणी असणारी माणसेच लोकाना निष्क्रिय बनवतात. तर सरकारचे ६०,०००कोटी रुपये वाचले असते...... प्रेषक विजुभाऊ ( मंगळ, 03/25/2008 - 13:53) . सरकारला आपण हा उपाय अगोदर का नाही सुचवला....महाराष्ट्र सरकारचे ६०,००० कोटी आपण व आपल्या मित्रानी योग्य नेता निवडु दिला होता का? असल्यास त्याला जाब विचारा? तुमचे म्हणणे असे आहे का; की निवडुन द्यायच्या अगोदर नेत्याला लोकानी हे स्तोत्र पाठ आहे का तरच मत देइन असे विचारावयास हवे होते. पक्षाच्या जाहीर नाम्यात आमचे अर्थमन्त्री हे स्तोत्र पाठ दररोज रेडिओ/टी व्ही वरुन म्हणुन दाखवतील..असे लिहीणार्‍या पक्षालाच मत द्यायचे? स्तोत्र म्हणणे आणि सरकार चालवणे यात काही संबंध असतो असे मला तरी वाटत नाही...अन्यथा कट्टर धर्माधिष्ठीत तालिबान सरकार उध्वस्त झाले नसते...अफगाणीस्तान मध्ये हरीत क्रान्ती झाली असती.

एक 25/03/2008 - 22:58
"निष्क्रिय रहा आणि फक्त हा जप करा म्हणजे तुमचं कर्ज फिटेल" असं जर संजीव म्हणत असेल तर ते नक्कीच चूक आहे. पण ते एक बिनपैशाचा उपाय सांगत आहेत असं दिसतं. या जपाने कुणाचंही एका पैशाचही नुकसान होणार नाही आहे. मग या अंधश्रद्धाविरोध्यांचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? शेतकर्‍यांनी मंत्र्यांच्या कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवणं ही पण एक अंधश्रद्धा नाही का? वारंवार कर्जमाफी देवून शेतकरी सुद्धा निष्क्रिय नाही का होणार? म्हणून तर शरद पवारांना सांगावं लागलं की "आता कर्जफेडायची सवय पण लावून घ्या. वर शेतकर्‍यांच्या कर्जाविषयी कोणीतरी उल्लेख केला म्हणून हे लिहिलं अन्यथा याचा या स्तोत्राशी काही संबंध नाही.. "..., परंतु हे अनुभव हे त्या त्या व्यक्तिपुरते मर्यादित असतात. त्यांना असं जनरलाईज स्वरूप प्लीज देऊ नका ही विनंती..." हे वाक्य वाचल्यावर असं वाटतं की या वाक्याच्या विरोधात जाणारे अशी अनेक विधानं मिपावर वाचली.. उदा. "अमुक एक सिनेमा फार उत्तम आहे सगळ्यांनी बघा." किंवा " ही गायिका अतिशय उत्कृष्ट आहे" किंवा " हा दिग्दर्शक सर्वश्रेष्ठ आहे".. ही जनरलाईज स्टेटमेंट नाहीत का? फारफारतर ऐकणार्‍याचं/बघणार्‍याचं हे वैयक्तिक मत असु शकेल्..(अर्थात असं वैयक्तिक मत असणारे अनेक आहेत म्हणूनच ते कलाकार लोकप्रिय आहेत पण मग साईबाबा आणि गजानन महाराज यांचे अनुभव असलेले पण अनेक आहेत..) थोडक्यात "जनरलाईज स्टेटमेंट" आपण सगळेच करतो. मग केवळ याच विषयाला आक्षेप का? उत्तर नाही मिळालं तरी हरकत नाही कारण मिपावर कुठला विषय असावा किंवा नसावा हे ठरवायला मी काही मालक नाही. मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. नो हार्ड फिलिंग्ज... - एक अंधश्रद्ध..

In reply to by एक

विसोबा खेचर 25/03/2008 - 23:30
एकराव, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. आपण संजिवरावांचं वरील वाक्य नीट वाचलेलं दिसत नाही! सदर स्तोत्र म्हणणारा साधक हा अवघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो किंवा मुक्त होतो असा चक्क निर्वाळा ते देत आहेत! एवढंच नव्हे, तर या कर्जमुक्तिकरता जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या कालावधीही ते छातीठोकपणे देत आहेत! Am I right?? तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असं जर सुचवलं जात असेल तर या अंधश्रद्धाविरोध्यांची इथे लुडबूड का? हा हा हा! एकराव, संजिवरावांच्या, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. या वाक्यावरून जर तुम्ही, तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण त्याच बरोबर त्याला देवाचं अधिष्ठानही असु दे या साठी हा जप करा. जपाने कदाचित पैसा नाही मिळणार पण मानसीक ताकद तरी मिळेल. असा अर्थ काढत असाल तर आपलं बोलणंच खुंटलं! आपण तुमच्या रिडिंग बिट्वीन द लाईनस ला दाद देतो!! :) बाय द वे, देवाचं अधिष्ठान असून देऊन तुम्ही तुमचे प्रयत्नही चालू ठेवल्यास, कर्जमुक्त होण्यास/किंवा काही प्रमाणात सावरण्यास अवघ्या (!) सहा महिन्यांचा कालावधीही पुरेसा आहे हे वाचून गंमत वाटली! :) चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :) बोला, गणपती बाप्पा मोरया!! :) मालकांच्या मर्जीपुढे आपले काय चालणार? हम्म! खरं आहे तुमचं! :) पण मला हा पॉईंट रेझ करावा असं वाटलं म्हणून लिहिलं. अगदी बरं केलंत. मिपा हे संकेतस्थळ मनमोकळेपणाने लिहिणार्‍यांसाठीच आहे...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

एक 25/03/2008 - 23:45
ठिक आहे.. संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. बाकी .. "..चला बरं झालं! ज्या मंडळींनी १० वर्षांकरता, २० वर्षांकरता जागेसाठी वगैरे बँकांची कर्जे काढली आहेत त्यांची तर मज्जाच आहे बुवा! दहा दहा वर्ष, वीस वीस वर्ष बँकांचे हप्ते फेडत बसायला नको! साला, सहा महिन्यात कर्जमुक्त! द्या टाळी एकराव!:) हां, आता संजिवरावांनी 'काही प्रमाणात कर्जातून सावरतो' असंही म्हटलेलं आहे ते मात्र खरं आहे! कारण सहा महिन्यात बॅकेच्या कर्जाचे किमान सहा हप्ते तरी निश्चितच भरून होतील आणि माणूस संजिवराव म्हणतात त्याप्रमाणे काही प्रमाणात (६ हप्ते!!) कर्जातून सावरेल! :)..." नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-)

In reply to by एक

विसोबा खेचर 26/03/2008 - 00:14
एकराव, संजीवलाच खुलासा करू दे..जर तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. एकराव, पुन्हा आपला काहीतरी गोंधळ होतो आहे! निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.. असं संजिव म्हणत नाहीये! तो, दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. असं म्हणतोय!! Am I right? संजिव जे म्हणत नाहीये, ते उगाच त्याच्या तोंडी घालू नका, आणि तो जे म्हणतोय त्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका. कृपया संजीवने एक्झॅट कुठले शब्द वापरले आहेत हे वाटल्यास पुन्हा पुन्हा तपासून पाहा, ही विनंती'.. आणि शिवाय, "तो म्हणत असेल कि निष्क्रिय राहून कर्ज फिटेल तर नक्कीच भोंगळपणा आहे.." असं संजिव म्हणतोय असं मीही म्हटलेलं नाही! दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. संजिवच्या या वाक्याला माझी पूर्ण असहमती आहे! माझ्या मते हे अत्यंत चुकीचं, बेजबाबदार व अंधश्रद्धा पसरवणारं विधान आहे! एकराव, संजीवच्या वरील वाक्यावर तुमचं काय मत आहे, हे मला जाणून घ्यायला आवडेल! माझा रोख "स्तोत्र, जप" शब्द ऐकल्यावर "अंधश्रद्धा अंधश्रद्धा " म्हणून हिणवणार्‍यांवर होता. आपण संजिवरावांना दिलेला माझा पहिला प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाहीये! त्यात मी स्तोत्रं व जप या गोष्टींना कुठेही सरसकट अंधश्रद्धा असं म्हटलेलं नाही! नो कॉमेन्टस.. चेष्टाच करायची झाली तर कुठल्याही विषयाची होवू शकते.. :-) अहो चेष्टा कुठे करतोय?? संजिवरावच अवघ्या (!) सहा महिन्यांचा दाखला देत आहेत. मग मी त्यावर 'चला, जागेच्या कर्जवाल्यांकरता बरं झालं!' असं म्हटलं तर ती चेष्टा कशी काय होऊ शकते?? उलटपक्षी, जी मंडळी थोडी हिंमत करून दहा वर्षाच्या म्हणा, वीस वर्षांच्या म्हणा, मुदतीवर बँकांची रीतसर कर्जे घेऊन मोठी जागा घेत आहेत, अहोरात्र कष्ट करून त्या कर्जाचे रीतसर हप्ते वेळच्यावेळी फेडत आहेत, त्यांना अमूक अमूक स्तोत्र म्हणा, म्हणजे सहा महिन्यात कर्जमुक्त व्हाल असं छातीठोकपणे सांगणे ही चेष्टा नव्हे काय?? संजिवराव एखादे स्तोत्र म्हटल्याने कर्जमुक्त होण्याकरता अवघ्या सहा महिन्यांचा कालवधी निश्चित करत आहेत हे तर तुम्हाला मान्य आहे ना एकराव? कारण खुद्द संजिवरावांनीच तसं आपल्या लेखाच्या सुरवातीलाच लिहून ठेवलं आहे! असो.. माझ्यापुरता हा विषय संपला आहे! धन्यवाद.... तात्या.

सर्किट 27/03/2008 - 08:14
अरे वा! खूपच छान उपाय सांगितलात. आमचाही एक उपाय आहे सहा महिन्यात कर्जमुक्तीचा. मर मर मरून कष्ट करायचे, आणि पैसे कमवायचे, आणि कर्ज चुकवायचे. ते जमले नाही, तर आमचाही एक मंत्र आहे: घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद हे गाणे रोज १०८ वेळा म्हणायचे. दोन्ही प्रयत्न सध्या चालू आहेत. बघुया काय होतं ते. उगाच देवावर आमचा भार आता टाकावासा वाटत नाही. बिचारा देव तुमच्या सेवेतून उगाच आमच्याकडे लक्ष द्यायचा, आणि तुमची काशी व्हायची ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

अजुन एक मंत्र "कर्ज बुडवा म्हणजे आपण तराल" "कर्ज कसे बुडवावे?" असे गजानन बुक डेपोत अजुन कसे पुस्तक आले नाही? स्वाहाकार खात्यातील अनुभवी लोकांनी "कर्ज बुडवण्याचे दशसोपान मार्ग" असे पुस्तक काढल तर त्यांना कर्जमाफी होईल. कारण २% लोक कर्ज बुडवतात म्हणुन उरलेल्या ९८% लोकांना कर्ज द्यायचे नाही का? या तत्वाला बाधा येईल. ऋणं कृत्वा घृतं पिबेत| असा चार्वाकाचा तेवढाच सोयिस्कर अर्थ काढून कर्ज काढणार्‍यांना दिलासा मिळेल. निर्लज्जं सदा सुखी या मंत्राबद्दल कुणी कस बोलल नाहि अजुन? प्रकाश घाटपांडे

|| ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् || दररोज सकाळी शुचिर्भुत होऊन म्हणणारा साधक अव्यघ्या सहा महिन्यात कर्जातून काही प्रमाणात सावरतो / मुक्त होतो. श्रीगणेशायनमः|| ॐ अस्य श्रीॠणमोचन महागणपतिस्त्रोत्र मंत्रस्य भगवान् शुक्राचार्याॠषि: ॠणमोचनगणपतिर्देवता ॠणमोचनार्थे जपे विनियोगः ॐ स्मरामि देवदेवेशं वक्रतुण्डं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणमुक्तये ||१|| महागणपतिं देवं महासत्यं महाबलं || महाविध्नहरं सौम्यं नमामि ॠणामुक्तये ||२|| एकाक्षरं एकदंतं एकब्रह्मसनातनं || एकमेवारव्दितीयं च नममि ॠणामुक्तये ||३|| रक्तांबरं रक्तवर्णं रक्तंगधानुलेपनं |

बुद्धिमत्ता

सृष्टीलावण्या ·

विसोबा खेचर 25/03/2008 - 08:50
थोडक्यात परंतु चांगला लेख.. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. सहमत आहे.... पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे. मला व्यक्तिश: हे पटत नाही परंतु आता आधुनिक शिक्षणशास्त्र तसं म्हणते आहे तर असेलही तसं! हॉवेल गार्डनरने केलेले वर्गीकरण व त्या प्रत्येकाचे थोडक्यात विवेचन पटले/पटण्याजोगे आहे.. आपला, (बुद्धीमान) तात्या.

१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात. हे वाक्य "१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, शब्दकोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात." असे वाचावे. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सकेत विचारे 25/03/2008 - 14:03
खुप छान........मला एक सुचले यावर................. "Who wants to know price of everything and value of nothing ! " मुलान चे पुर्न विकास साथि कोन विचार कर् तो आज काल .....

नीलकांत 25/03/2008 - 14:21
हे आमच्या मास्तरांना सांगायला हवे... खरं तर त्यांना किंवा मला हे आधीच ठाऊक असतं तर माझ्यात टवाळक्या करणे, शाळा बुडवणे, वर्गात मारठोक, दंगा आदी करण्याची बुध्दीमत्ता (!) आहे असं निदान काढलं असतं , किमान वर्गाबाहेर उभं राहणे, भरलेल्या वर्गासमोर आम्ही कसे कांदे बटाटे खाऊन नावालाच मोठे झालो चे गजर रोज ऐकायला आले नसते. ; ) हे असे शोध उशीरा लागतात या बद्दल वाईट वाटून घेणारा... नीलकांत

विसुनाना 25/03/2008 - 17:28
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? अवांतर : गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला? की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :)

In reply to by विसुनाना

गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला?की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :) उलट तार्किक-गणिती ह्या प्रकारची बुद्धिमत्ता तुमच्यात ठासून भरलेली दिसते कारण आजपर्यंत हा लेख २-३ मंचावर छापल्यापासून गेले २ वर्षात हा प्रश्न विचारणारे तुम्ही दुसरे. इथेच पहा ना अनेकांनी हा लेख वाचला असेल पण हा प्रश्न तुम्हालाच पडला. आठवा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे निसर्गविज्ञ बुद्धिमत्ता. ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले वनस्पती, खनिजे, पशु, पक्षी, दगड, गवत व इतर निसर्ग घटक फार लवकर ओळखतात आणि त्यांचे वर्गीकरण करू शकतात. उपजतच त्यांना निसर्गाची ओढ असते, जाण असते. उदा. चार्ल्स डार्वीन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर इ.इ. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by विसुनाना

आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? जे एकाहून अधिक विषयात प्रावीण्य मिळवतात ते ज्ञानी होय. बुद्धिमत्ता ही उपजत असते आणि ज्ञान हे कष्टार्जित असते. प्रत्येकाकडे समान बुद्धिमत्ता असते पण त्याचे संमिश्रण वेगवेगळे असते. उदा. माझ्या घरात सर्व भौतिकशास्त्र पदवीधर, माझेपण गणित बरे होते म्हणून मी पण १० वी नंतर पहिली २ वर्षे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पण भाषेची आवड स्वस्थ बसू देईना. मग माझा कल लक्षात घेऊन मला आई म्हणाली तू कला शाखेतच जा (असे समजूया की माझ्याकडे ४०% भाषिक बुद्धिमत्ता आहे, १०% तार्किक, १५% सांगीतिक, ५% शारीरिक हालचाल आणि इतर बुद्धिमत्ताचे मिश्रण ३०% आहे). सानिया कडे ८०% शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता असेल पण सांगीतिक, भाषिक व इतर बुद्धिमत्ता २०% असतील. कदाचित् तिच्या आई वडिलांनी तिची खेळातील आवड जोखली असेल आणि त्या विषयाला प्रोत्साहन दिले असेल. पण उद्या मनांत आणले तर सानिया संगीतातसुद्धा ठसा उमटवून ज्ञानी होऊ शकते. कारण ज्ञानाला वयाचे बंधन नसते. ह्या उलट जे गतिमंद असतात ते सुद्धा तेव्हढेच बुद्धिमान असतात दुर्दैवाने त्याची अभिव्यक्ती क्षमता ability to express कमी पडते पण एखादा आईनस्टाईन अभिव्यक्ती क्षमता शालेय अभ्यासात दाखवू शकत नाही पण संशोधनात दाखवू शकतो. चतुरंगकाका म्हणतात त्याप्रमाणे हा विषय गहन आहे मात्र आपल्यासारख्यांकडून (तार्किक बुद्धिमत्ता जास्त असणार्‍यांकडून) दिलेल्या दुव्याला भेट देऊन आणि तिथल्या इतर दुव्यांना भेट देऊन अधिक अभ्यासपूर्ण प्रश्न अपेक्षित आहेत. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसुनाना 26/03/2008 - 11:12
माझ्या दोन्ही शंकांचे निरसन केल्याबद्दल आभारी आहे. माझे मत - हे खरेच की मुलांची बुद्धीमत्ता आणि त्यांचा नैसर्गिक कल यांच्याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला खतपाणी घातले पाहिजे. आणि डोळस पालकांना गार्डनर यांनी प्रतिपादित केलेल्या आठ प्रकारांमध्ये ढोबळ मानाने मुलांच्या बुद्धीमत्तेचे वर्गीकरण करता येईल. परंतु आपणच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे (निदान भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या अविकसित देशामध्ये) केवळ जगण्यासाठी किमान मिळकत करणे हे अत्यंतिक महत्वाचे आहे. त्यामुळे येथे सर्वच क्षेत्रात गळेकापू (कट-थ्रोट) स्पर्धा आहे. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या आणि विकसित देशांमध्ये उत्तम रहाणीमानात जगणे हे त्यामानाने सोपे काम आहे. "आता आमचा मुलगाच पहा... गणितात त्याला कमी मार्क मिळतात. पण तो पियानो ठीक वाजवतो. कदाचित त्याला वादक म्हणून प्रसिद्धी मिळणार नाही. त्याला फारसे पैसे मिळाले नाहीत तरी चालेल. पण त्याला आम्ही पियानो वादक करू."असे म्हणण्याचे धाडस भारतातले किती पालक करू धजतील?(शिवाय पियानो वादक मुलाचे लग्न करणे ही डोकेदुखी होईल ती वेगळीच.;)) त्याऐवजी "त्याला गणित येत नाही ना? मग शिकवणी लावू. पण निदान पोटापुरता पैसा कमावला पाहिजे त्याने. बी.ई. झाला तर बरंय. निदान डिप्लोमा तरी करावा.पियानो काय नंतरही वाजवता येईल!" ही वास्तववादी भूमिका घेणे त्यांना श्रेयस्कर वाटेल. गार्डनरचे विचार आदर्शवत समाजसंस्थेत (मॉडेल सोशल सिस्टिम) लागू करण्यासाठी योग्यच आहेत. पण भारतासारख्या देशात आदर्शवत समाजसंस्था अस्तित्वात आहे का? आणि नसेल तर ती कधी निर्माण होणार? हा मूळ प्रश्न आहे. अवांतर - शिवाय आजकाल भारतातील शास्त्रीय शिक्षण घेणार्‍यांची आणि अभियांत्रिकी पदवीधरांची अफाट संख्या पाहून अमेरिकेसारख्या 'सर्वगुणग्राहक' देशातही भारतासारखी शिक्षणप्रणाली (म्हणजे आय.आय.टी. , जे.ई.ई. , कोचिंग क्लासेस,???) आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

झकासराव 25/03/2008 - 17:33
माझी सांगितीक बुद्धिमत्ता आणि चित्रकलेतली बुद्धिमता अत्यल्प आहे. (ना के बराबर) हे कुठेतरी शिक्षण पद्धतीत सामावुन गेले पाहिजे. आधीच झाले असते तर मी खाल्लेला ड्रॉइंगच्या मास्तराचा मार चुकला असता की. :)

अनिकेत 25/03/2008 - 17:58
ह्यातून काय ध्वनित होते ते पहा.... प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची तुलना चूक आहे- एक शास्त्रज्ञ आणि कवी या दोघांत अधिक कोण बुद्धिमान कसे ठरवणार? परंतु, पुढे जाऊन आपण म्हणता की सर्वजण सारखेच बुद्धिमान आहेत. तर, ज्या सार्‍यांनी योग्य क्षेत्र निवडले, तर ते सारे सारखेच बुद्धिमान असतील? सानिया मिर्झा बापजन्मात शारापोवाला हरवेल का? प्रत्येकाची विविध क्षेत्रांतील बुद्धिमत्ता वेगळी असेल, पण तरीही प्रत्येक क्षेत्रातही डावे-उजवे असणारच. बुद्धिमत्तेत अनुभवाचा वाटा किती आणि अनुभवाचा किती यावर वाद असू शकेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण असते म्हणता तेव्हा तुम्ही अनुवांशिक फरक मान्य करताच आहात. प्रत्येकाची लायकी सारखी नसते, हे मान्य करायला एवढे जड का जावे? अनिकेत

चतुरंग 25/03/2008 - 21:13
वर उल्लेख केलेले ७ प्रकार आणि नंतरचा आठवा प्रकार हे बुध्दिमत्तेचे रंजक प्रकार समजले. पण ही खूपच ढोबळ वर्गवारी आहे असे वाटते. कोणतीही व्यक्ती ह्यातल्या बर्‍याच प्रकारांची सरमिसळ असलेली असते/असावी असे वाटते. आणि त्यातही एक, दोन किंवा क्वचित अधिक प्रकारात त्या व्यक्तीचे प्राविण्य असू शकते. बुध्दिमान मुले ही डॉ. किंवा इंजीनियरच होतात/झाली पाहिजेत असा हट्टाग्रह चुकीचाच आहे. >>थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. ह्याच्याशी मी सहमत आहे. (माझ्या मागील भारत फेरीत एका नातेवाइकांशी बोलणे झाले आणि समजले की इ. ८ वी पासूनच त्यांच्या मुलाची आय्.आय्.टी.ची तयारी करून घेण्यात येत आहे!?) (त्या मुलाबद्दल मला फार वाईट वाटले पण मी काही बोललो नाही. ४ - ५ वर्षांनंतर त्याने जी परीक्षा द्यावी असे पालकांना वाटते आहे त्याची अशी तयारी - आणि जर काही कारणाने तो इच्छित ठिकाणी प्रवेश मिळवू शकला नाही तर? त्याला येणार्‍या नैराश्याची कल्पना करू शकता? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही!) उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक प्रकारची बुध्दिमत्ताच आहे - शेफ संजीव कपूर, संजय टुम्मा इतरही अनेक जण हे व्यावसायिक यशाच्या शिखरावर आहेत. उत्तम गाणे, उत्तम अभिनय, उत्तम वादन, उत्तम खेळ, उत्तम लेखन, उत्तम कविता (आणि उत्तम विडंबनसुध्दा;), उत्तम प्रकारे खोड्या काढणे;० ही सगळी बुध्दिमत्ता असल्याचीच लक्षणे आहेत! बुध्दीमत्ता कशी विकसित होईल, कुठे आणि कशी प्रकट होईल हे सांगणे अवघड आहे. बोर्डात आलेली सगळीच मुले ही हुषार असतात का? का विषयाची मूलभूत तत्वे न समजताही ती पाठांतराने, परीक्षेचे तंत्र समजल्याने मार्क्स मिळवतात/मिळवू शकतात? बोर्डात न येणार्‍यांचे काय? किंबहुना हुषारी सिध्द व्हायला शाळेत जायलाच पाहिजे का? (इथे मला बर्नार्ड शॉचे एक वाक्य आठवते. तो म्हणाला होता "मी आणि माझे शिक्षण ह्यात माझी शाळा आली!") माझ्या बरोबरचा एक विद्यार्थी मला आठवतोय की जो नववी-दहावीत असताना बीजगणित आणि भूमिती मधील प्रश्न सोडविताना स्वतःच्या पध्द्ती शोधून काढून सोडवीत असे. अत्यंत थोडक्यात, कमी पायर्‍यांमधे तो ते गणित सोडवी पण त्याला मार्क्स दिले जायचे नाहीत कारण त्याने सोडविलेले बहुतेकदा शिक्षकांनाच समजायचे नाही;)! तो बोर्डात आला नाही! त्यामुळे तो हुषार नाही असे होते का? अभियांत्रिकीला असताना माझा एक मित्र हा पेपर थोडाच सोडवून वर्गाबाहेर पडत असे. पेपरची वेळ संपल्यावर बाहेर गेल्यावर त्याच्याशी बोलताना विचारले की पेपर अवघड होता का? तर म्हणे "प्रश्न बिंडोक आहेत, आवडले नाहीत! पासिंग पुरता सोडवला आहे!!" तो जेवढे मार्क्स अपेक्षित करीत असे बरोबर तेवढेच मिळत. इतर मुलांना अडलेले सर्व प्रश्न तो सोडवून देई! ती मुले वर्गात पहिली दुसरी असत पण हा जेमतेम फर्स्टक्लास (आता हुषार कोण?)! एकूणच तुलना ही दरवेळी योग्य निर्णय देऊ शकेलच असे वाटत नाही. सर्व विषयांची सक्ती ही सुध्दा नक्कीच नसावी. नवीन पर्याय असतात/असू शकतात हा सिध्दांत जोपर्यंत शिक्षणपध्दतीला मान्य होत नाही आणि आपल्या मुलांच्या/मुलींच्या क्षमतेवर जोपर्यंत पालकांचाच विश्वास असत नाही तोपर्यंत मुलांची ससेहोलपट होत राहणार आणि कित्येक बुध्दिमान मुले/मुली ही 'ढ' ठरणार! हा फार खोल आणि गहन विषय आहे. चतुरंग

आपल्या मुलाने अनेक क्षेत्रात पारंगत व्हावे म्हणुन त्यांना छळणार्‍या- पालकांना माझी विनंति आहे कि हा विषय कृपया समजुन घ्यावा. संस्कारां व्यतिरिक्त, आपल्या मुलांसमोर विविध विषय मांडणे व त्यांना केवळ दिशादर्शन करणे हे पालकां कडुन अपेक्षीत आहे. आपले अभ्यास व कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र पाल्यास असावे. पिताजी डॉ. अथवा वकील आहेत म्हणुन पाल्यासही त्या क्षेत्राकडे ढकलणारे धन्य ते पालक! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग 26/03/2008 - 00:11
'भावनिक बुध्दिमत्ता' (इमोशनल इंटेलिजन्स) असाही एक प्रकार आहे. त्या साठी इथे बघा. "स्वतःच्या आणि इतरांच्या जाणिवा आणि भावना ह्यांना योग्य प्रकारे जोखून, त्यात योग्य तो फरक करुन, त्या माहितीद्वारे स्वतःच्या विचारांना अणि कृतींना योग्य वळण देणे" अशी काहीशी ह्याची व्याख्या आहे. चतुरंग

प्राजु 26/03/2008 - 02:40
माझ्याही बघण्यात अशी कित्येक मुले आहेत जी शाळेत जेमतेम पास होत पण त्यांना कोणत्याही प्रश्नाची उत्तरे माहीती असत. मुलांवर त्यांच्या वयाच्या मानाने किती ओझे टाकावे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. माझ्या मुलाच्या(वय वर्ष ४) वर्गात माझ्याच मैत्रिणिची मुलगी आहे. मैत्रिणीने तिच्या मुलीला, स्वतःचा पत्ता इंग्रजी मध्ये लिहायला शिकवला. आणि तो पेपर घेऊन ती तिच्या शिक्षिकेला दाखवायला गेली. शिक्षिकेने बरेच झापले. ज्या वयात कॅट, मॅट - रॅट अशी स्पेलिंग्ज अपेक्षित आहेत तिथे हिने पूर्ण पत्ता लिहिणे अपेक्षित नाही असे खडसावले. घोकमपट्टी करून घेऊन काहिही उपयोग नाही, तिने आपणहून स्पेलिंग्ज बनवून पत्ता लिहायला हवा असेही सांगितले. सुरूवातीला तिने लिहिलेला पत्ता पाहून मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. हे मी इथे प्रामाणिकपणे मान्य करते. पण नंतर माझा हा समज दूर झाला... सृ.ला. ताई, छान माहिती आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. मूळात हा प्रश्न मनात येतो याचाच अर्थ तुम्ही मुलांच्या बाबतीत जागरूक आहात आणि बरे झाले त्या शिक्षिकेने पालकांना झापले. माझा स्वत:चा अनुभव सांगते. मराठी माध्यमात शिकूनसुद्धा मला स्वत:लाच अजून नीट मराठी लिहिता येत नाही. झ, छ, ट, ठ, ड, ढ अजून ही बंभेरी उडवतात (आठवा : पत्त्याचा खेळ छब्बु लिहिले होते ते, नंतर कोणीतरी त्याचे झब्बु केले). अर्थात हा डिस्ग्राफिया नावाचा शैक्षणिक आजार आहे हे मला माहितच नव्हते. शाळेत तर मी मराठीत जेमतेम पास होत असे. पण त्या काळात पास होणे हेच महत्वाचे मानले जाई (आजच्या सारखी गुणांसाठी गळाकापू स्पर्धा नव्हती). > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

संजीव नाईक 26/03/2008 - 07:01
सृ.ला शुभ सकाळ लेख ऊत्तम आहे. पण आपणास ठाऊक आहे काय? मुले जन्मता ध्वनी च्या शोधात असतात. ती जर मातेच्या कुशित गेली तर आनंदि होतात कारण मातेच्या ह्रदयातुन निघनारा ध्वनी त्याची चेतना संस्था जागवतो. असो. लेख उत्त्तम आहे. संर्दभ चांगला. ज्ञान प्रप्त करण्याचे सामर्थ वाचकात येवो. उकृष्ट माहिती आहे.. धन्यवाद. संजिव

बुद्धीमत्तेचे जे आठ भागात वर्गीकरण केले आहे ते योग्यच असावेसे वाटते. ह्यालाच आपण 'कल' कुठल्या क्षेत्राकडे आहे हे तपासणे म्हणतो. गणितात मागे राहणारी माणसे चित्रकलेत हुषार असतात असे ऐकले आहे. माझे स्वतःचे कौशल्य (शालेयजीवनात...) दोन्ही विषयात ५०-५० टक्के होते. तसेच विज्ञान विषयांची आवड असून भाषेवर प्रेम आहे. व्यावसायिक गरज म्हणून कॉमर्स केले पण त्यात मन कधीच रमले नाही. सृजनशीलतेच्या ओढ स्वस्थ बसू देईना आणि पाकशास्त्रात नैपुण्य मिळविण्यात मग्न झालो. आपल्याकडे बुद्धीमत्तेचे प्रमाण म्हणून डॉक्टर, वकिल, इंजिनिअर इत्यादी प्रभॄतींकडे आदराने बघितले जाते. ते योग्यच असते. पण म्हणून इतर 'कौशल्ये' संपादन करणार्‍यांकडे बुद्धीमत्ता नसते किंवा कमी असते असे समजणे अन्यायकारक आहे. कुठलेही कौशल्य आत्मसात करण्यासही बुद्धीमत्ता लागतेच लागते. ते कौशल्य कुठले आणि त्यात किती प्रगती केली हे त्या त्या व्यक्तिंच्या बुद्धीमत्तेच्या प्रखरतेवर अवलंबून असावे असे दिसते.

कल किंवा ऍप्टिट्यूड असेहि म्हणतात. आमच्या कॉलेजात एक मुलगा होता. याचा भाऊ डॉक्टर. म्हणून याच्या बाबांनी याला शास्त्र शाखेत घातला. दोन वर्षे फुकट गेली. पण ढ नक्कीच नव्हता. मग हा कॉमर्सला गेला. डिस्टिंक्शन सोडले नाही. पहिल्या प्रयत्नात सी. ए. आता उत्तम व्यवसाय आहे. असे असते. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत.

डोळे हे जुल्मी गडे.....रेखाटन

वर्षा ·

प्राजु 25/03/2008 - 06:08
रेखाटन सुंदर.. राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम? बहुतेक असेच वाटते.. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 25/03/2008 - 07:56
वर्षा, अतिशय सुरेख आणि बोलकं रेखाटन! क्लासच आहे! पहिलं - मलाही राजेन्द्रकुमार वाटतो आहे दुसरं - वैजू नाही वाटत. आमच्या वैजूचे डोळे थोडे अधिक बोलके आणि मोठे आहेत. पण रेखाटन सुरेखच असल्यामुळे ती बाईही सुरेखच असणार! :) असो, वर्षा, अजूनही अशीच उत्तमोत्तम रेखाटने मिपावर येऊ देत... तात्या.

इनोबा म्हणे 25/03/2008 - 14:05
सुरेख रेखाटन... आमचीही चित्रे इथे चढवण्याचा मोह आवरत नाही... आपण सामग्री (पेन्सील/पेपर/शेडींग पावडर वगैरे)कोणती वापरता कळेल काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर 25/03/2008 - 19:41
नटी नंदा असावीसे वाटते .... थोडासा सहमत आहे! थोडी थोडी नंदा वाटते खरी. बाकी मुक्तराव, तुमचे डोळे चांगले तयार आहेत म्हणायचे! :) असो, अहो वर्षाताई, अहो ती नटी नक्की कोण आहे त्याच एकदा काय तो खुलासा करून टाका की प्लीज. नट तरी तो गधडा राजेंद्रकुमारच आहे ना? तेही सपष्ट करा प्लीज... :) अवांतर- बाकी, तरूणपणची भरलेली, रसरसलेली नंदा लै भारी चीज होती तिच्यायला! :) च्यामारी, ती सुलक्षणा पंडित आणि मुणमुण शेण या दोघीदेखील अस्वस्थ करून टाकायच्या! :) आपला, (रसरसलेल्या, मुसमुसलेल्या सौंदर्याचा पागल!) तात्या. :)

वर्षा 25/03/2008 - 21:06
सर्वांना धन्यवाद. बहुतेकांनी राजेंद्रकुमारला बरोबर ओळखलंय. हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... इनोबा: रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील -वर्षा

In reply to by वर्षा

विसोबा खेचर 25/03/2008 - 21:24
हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... हां आत्ता आठवलं आणि पटलं देखील! आमची वैजूच आहे ती! आधी ओळखू आलं नाही परंतु 'संगम....दोस्त दोस्त ना रहा....' हा संदर्भ दिल्यावर पटलं खरं! धन्यवाद वर्षा... नंदाचा पत्ता कट तिच्यायला! :) आपला, (डोळ्यांसकट संपूर्ण वैजूचा प्रेमी!) तात्या. ;)

In reply to by वर्षा

इनोबा म्हणे 26/03/2008 - 21:38
रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील ग्रॅफाईट पेन्सिलमुळे डार्कनेस छान येतो,पण मी कधी तितकेसे वापरले नाही.मी शक्यतो एचबी (१ ते ६)च्या पेन्सिल आणि पावडरचाच वापर करतो. माझी चित्रेही लवकरच चढवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

उदय सप्रे 26/03/2008 - 09:11
प्रिय वर्षा, सुरेख आहे रेखाटन ! पण चित्रासकट मिपा वर कसे अपपलोड करायचे जरा सांगाल का प्लीज्?कारण मी पण स्केचिंग करतो आणि मी मधुबालाचा फॅन (नव्हे ए.सी.च....) आहे , त्यावर कविता पण आहे. उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

चतुरंग 26/03/2008 - 09:16
मुख्यपानावर सगळ्यात वरती सगळ्यात उजवीकडे 'वाविप्र' आहे त्यावर टिचकी मार कळेल. चतुरंग

In reply to by उदय सप्रे

वर्षा 26/03/2008 - 10:40
नमस्कार उदय, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'वाविप्र' मध्ये फोटो कसा चढवावा याबद्दल माहिती आहे. तुमची स्केचेस जरुर इथे चढवा. बाकी मीसुद्धा त्या मूर्तिमंत सौंदर्याची चाहती आहे... तिचं स्केच चढवते आहे लवकरच. :) -वर्षा

सध्या नवीन रेखाटन एव्हढ्यात केलं नाही. तोपर्यंत पूर्वी केलेली रेखाटनं इथे चढवीन..त्यापैकी हे एक. एका प्रसिद्ध जुन्या हिंदी सिनेमातील हिरो-हिरॉईनच्या डोळ्यांचे क्लोज्-अप्स रेखाटायचा प्रयत्न केला होता.....:))) -वर्षा

होत॑ हे अस॑ कधी कधी...

सोम ·

सहज 25/03/2008 - 02:23
कोसळत जा इथे अधुनमधुन. बरे वाटेल. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. मिसळपाव वर स्वागत.

प्राजु 25/03/2008 - 06:07
मि.पा.वर स्वागत.. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. वा...! सहजराव, हे बाकी खरं.. स्वगत कम् लेख चांगला झाला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

होत॑ हे अस॑ कधी कधी... असत॑ मनाच॑ ह सगळच॑ विचित्र अन् कुतूहल जागवण्यासारख॑... कधी कधी समजत नाही की नक्की काय हव॑ मनाला... कधी हेच मन समर्थन करत॑, घरटे सोडून जगाचा वेध घेण्याच्या वेडाच॑... तर कधी हेच मन घरट्याच्या सुरक्षिततेचि आस धरत॑... आजही असच॑ झाल॑... मन॑ थोड॑ उदास होत॑. परवाच॑ होळी झाल्याच॑ समजल॑...फोनवर. सलग दोन दिवाळी आणि दोन होळी चुकवलो आपण॑... तस' चेन्नई फार ला॑ब नाही आपल्या गावापासून्...पण Occupational Hazard म्हणतात ना...तेच मी अनुभवत होतो. मनाचा थोडा गो॑धळ उडालाय खरा... नेहमीचीच द्विधावस्था... पैश्यासाठी एवढ सगळ॑ miss करण॑ खरच॑ जरुरीच॑ आहे का? मनाच॑ हे एक बर॑ आहे...

(एका माळेचे मणी)

केशवसुमार ·

In reply to by चतुरंग

केशवसुमार 25/03/2008 - 07:13
रंगाशेठ, स्पष्ट प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. पण मला ह्या रचनेतून जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्याना तो पोचला आहे.. असो.. पुढच्या वेळेस ह्याहून सरस लिहिण्याचा प्रयत्न करेन. केशवसुमार

प्राजु 25/03/2008 - 08:12
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !! शपथ्थ!!!... एकदम सह्ही - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव 25/03/2008 - 08:25
केसुशेठ विडंबन मस्तच जमलंय! पण एक विनंती आहे. करू का? आता विडंबनात येणारे तेच तेच संदर्भ बदललेत तर जास्त आवडेल. मेलेल्याला मारण्यात काय हंशील? बघा विचार करा . पटले नाही तर दूर्लक्ष करा.

In reply to by प्रमोद देव

केशवसुमार 25/03/2008 - 08:52
आपला मुद्दा पटणारा आहे. पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? असो.. आपल्या सुचनां आमलात आण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 25/03/2008 - 10:36
पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? प्रिय केशवसुमार, --- १. इतरत्र चालू असलेल्या एका चर्चेत स्पष्ट केल्याप्रमाणे, विडंबनाबद्दल आकस नाही (वरील प्रतिसादातील, कस ही टंकलेखनातील चूक समजतो, भाषिक दिवाळखोरी नाही :) ). त्यांच्यातील रूपकांच्या वारंवारतेबद्दल, विषयांच्या वारंवारतेबद्दलही आकस नाही; तर विचार करण्याजोगा आक्षेप आहे. २. मराठी गझलेस वाहून घेतलेल्या एका संकेतस्थळावरील गझल कार्यशाळेत आलेल्या अनेकोत्तम गझलांमधील रूपके, हाताळले गेलेले विषय यांची सांख्यिकी येथे पहा. हातोहात संगीता जोशींचे 'वेदना-संवेदना' हे पुस्तक लागले, नि त्यातल्या काही गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. यापुढची पायरी म्हणून 'एल्गार' मधील माझ्या आवडत्या निवडक १० गझला, अहमद फराज यांच्या येथील रॅन्डम १० गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. या सगळ्या केसेसमध्ये वापरलेल्या रूपकांची टक्केवारी लक्षात घेता, ती इतरत्र उपलब्ध निकालांशी फारशी फारकत घेते, असे दिसत नाही. अहमद फराज यांच्या 'खानबदोष चाहतें' आणि शहरयार यांच्या 'मेरे हिस्से की जमीन' या पुस्तकातील माझ्या आवडत्या निवडक १० गझलांमधील रूपकांची अशीच तपासणी करायचा आता विचार चालू आहे. निष्कर्ष फारसे वेगळे असतील, अशी अपेक्षा केलेली नाही; अनपेक्षित निकालांचा आश्चर्यमिश्रित आनंदच वाटेल. सांगण्याचा मुद्दा हा की गझलेतील विकासाच्या विविध टप्प्यांवर रूपकयोजनांमधील वारंवारता बदलत गेलेली असली, तरी जी रूपके गझलेला तिच्या जन्मापासून अत्यंत प्रिय आहेत किंव जी कालौघात गझलेमध्ये रुळत गेली, त्यांना नव्या रूपकांच्या समावेशानंतरही कोणीही कधीही सोडलेले नाही. मराठी संस्कृतीत इतकी रूपके आहेत की कशाची वानवा नाही. पण निसर्ग, फुलेपाने, प्रियकर-प्रेयसी - त्यांचे प्रेम, विरह, चंद्रतारे, समुद्रकिनारे, सोयर्‍यांनी केलेले घाव, मित्रांनी दिलेला दगा यांना कधी कोणी सोडले नाही. याच धर्तीवर तुमच्याही विडंबनांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी करण्याचा अनिवार मोह झाला होता. पण उद्या झोपेतून उठवूनही कोणी विचारले, तर तुमच्या विडंबनात काय आहे, हे मी नक्की सांगू शकेन, अशी खात्री असल्याने तो मोह आवरला. यावरूनच तपासणीचे निष्कर्ष काय असतील, याची कल्पना यावी. ३. याच विषयावर मागे एकदा जयंतराव कुलकर्णींच्या एका प्रतिसादनिमित्ताने नि मतमतांतरांमुळे तुमच्याशी संवाद साधला होता. तुम्ही स्वतः किती उत्तम नि प्रतिभावंत कवी आहात, याची जाणीव तेव्हाही होती; आताही आहे. मिसळपाववर व्य नि जाहीर करण्यामागची नैतिकता-अनैतिकता मागेच निकाली काढल्याचा स्वानुभव असल्याने तुमच्या नि माझ्या मनोगतावरील खाजगी संवादातील सारांश तुमच्याच शब्दांत येथे देत आहे - तू जे लिहिले होते ते पोट तिडकीने लिहिले होतेस.. तू तुझ्या मताशी ठाम मी माझ्या मताशी ठाम. वाद घालण्यात काही अर्थ नाही ( वाटला तर व्यनितून घालू उगाच लोकांना फुकटची करमणूक कशाला ).. आणि सगळ्यांना सगळ्यांची मते पटावीत असे कुठे आहे. माझ्या गझलांवर पण कल्पनेत नावीन्य नसल्याचा आरोप होतोच.. चालायचं.. आपलं दुसऱ्याशी काय पटत नाही ह्या पेक्षा काय पटत हे शोधावं ह्या मताचा मी आहे... मतभेद हे सकारात्मक असावे.. त्यामुळे दोघांचा वौचारीक फायदा व्हावा.. असो.. गौरसमज नसावा.. असेच वरचे वर प्रांजळ / परखड प्रतिसाद देत राहा.. नुसतं वाव्वा.. क्या बात है..च्या साखरेनं मधुमेह होण्या पेक्षा.. असल्या प्रतिसादाच अंजन कधी ही उत्तम.. केशवसुमार ४. ज्यांना जे संदेश पोचवायचे ते आपण पोचवत आलेलोच आहोत. एकीकडे अंजन घालण्याचे, परखड प्रतिसादांचे वावडे नसल्याचे सांगून तशा टोलेबाजीस प्रतिटोल्याने प्रत्युत्तर देण्याच्या दुटप्पीपणास जर सकारात्मक मतभेद म्हणत असतील, तर मग असे मतभेद आपल्यात बरेच आधीपासून आहेत, असे मला वाटते. माझी एकच मोठी चूक झाली, की तुमच्या सांगण्याप्रमाणे तुमच्याशी व्य नि तून वाद न घालता मुक्त मंचावर मांडले. त्या चुकीबद्दल आज तुमची या मुक्त मंचावर जाहीर माफी मागतो आहे. क्षमस्व माम्. मात्र माझ्या परखडपणास किंवा तिरकस टोलेबाजीस जर कंपूबाजीचे नि वैचारीक दिवाळखोरीचे लेबल चिकटवायचे असेल किंवा कुणाचे कशामुळे स्वतःबद्दल काही फाजील गैरसमज वगैरे झाले आहेत अशी तुमची समजूत झाली असेल, तर मग आपला असा (गैर)समज माझ्या लेखनाचा किंवा/आणि लेखनशैलीचा दोष समजावा व माझे आपल्या विडंबनांना येथे किंवा/आणि इतरत्रही दिलेले प्रतिसाद दुर्लक्षित करून माझ्यासह सर्व वाचकांना आपल्या विडंबनांचा आस्वाद देत रहावे. येथून पुढे तुमची सर्व विडंबने वाचताना येथे मी मांडलेले मुद्दे - शब्दयोजना, रूपके, विषय/मुद्दे, मूळ रचनेची व विडंबनाची ताकदीच्या दृष्टीने तुलना, विडंबन कधी कशाचे करावे वगैरे वगैरे - सोडून नक्की कोणत्या निकषांवर त्यांचा आस्वाद घ्यावा, याचा विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आपला आभारी आहे. परखड, प्रामाणिक प्रतिसाद देत होतो, आहे, राहीन. प्रामाणिक मत, राग नसावा. (सस्नेह)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

बेसनलाडू 25/03/2008 - 10:40
कृपया वरील प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून पहा. उगीच कुठे कुणाला टोलेबाजी वगैरे दिसायला नको नि कुणाचे स्वतःबद्दल फाजील (गैर)समजही व्हायला नकोत :) (टोलेबाज)बेसनलाडू

विसोबा खेचर 25/03/2008 - 08:40
लाभता संधी किती करतात बडबड रोग त्याचे सर्व साथीचे निघाले लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले वा वा! झकास रे केशवा! :) तात्या.

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे 25/03/2008 - 11:47
गुळमट पदार्थही मिसळपाववर आल्यानंतर झणझणीत झाले वाटते. असो.आम्हाला त्याने आनंदच झाला. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by बेसनलाडू

धमाल मुलगा 25/03/2008 - 11:57
जे सभा भुंकून गेले आकसाने... ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? विड॑बनाच्या पडद्यामागची उकल झाली तर आस्वाद घेणे सोपे जाईल असे वाटते. -(अजाण) धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 25/03/2008 - 13:41
ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? अगदी बरुबर बोल्लात पाटिल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
 
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले

प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २

विजुभाऊ ·

झकासराव 24/03/2008 - 21:29
ऐसेची एक बखरकार होउनी गेले त्यांचे नाव भाउ आणि मिसळपावचे बखरकार आहेत विजु भाउ :) बखर कारांचे कसब दिसुन येत आहे. वाचुन संतोष जाहला. आमच्या मनास तिथे जातीने हजर राहुन अजुन संतोष जाहला असता पण आमच्या मोहिमेने आमचा घात केला. त्या दिवशी आम्ही आमच्या कार्य क्षेत्री सायंकाळी ७ पर्यंत लढत होतो. तिथुन घरी गमन करता करताच ध्यानात आले की जलधारानी सगळ्या पुणे सुभ्याला न्हाउ घातल्य. अजुन देखील वर्षावाची आशंका होतीच. शिवाय आमच्या वास्तु पासुन कट्टा स्थळ अमंळ लांबच होते. (निगडी ते कात्रज) त्यात आमची घोडी जास्त न पळणारी (१०० सीसी ची दुचाकी) म्हणून अत्यंत नाइलाजाने न येण्याचा निर्णय घ्यावा लागला. :( चला आता जाणे शक्य नाही तर भ्रमणध्वणी वर बोलुन घ्यावे म्हणून प्रयत्न केला तर इथेहि नशीब आड... आम्ही धमाल मुलगा (कट्ट्याचे कार्यप्रवर्तक सरदार) यांचा क्रमांकच साठवुन ठेवला नव्हता. :( एक संधी तर गेली. :(

विसोबा खेचर 25/03/2008 - 09:25
विजूभाऊ, हा चौक स्वतंत्र लिहिल्याबद्दल धन्यवाद... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... तात्या.

धमाल मुलगा 25/03/2008 - 11:08
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. वाहवा विजयरावभाऊ, आपल्याजैसे बखरनविसा॑चे हातोन खुद्द मिपाकट्ट्याची धुमश्चक्री अति साद्य॑त वर्णने समस्त स्वराज्ये समस्त सरदार, प॑डित आणि प्रजाजना॑चे मनि जैसीचे तैसी उतरोन पावते आहे. मेहेरनजर स॑त तात्याबा या॑चे बोल मनि धरोन सत्वर पुढील चौक सादर करणे ऐसी विन॑ति विशेष. सरदार झकासराव या॑ची अनुपस्थिती नक्किच जाणविली. पर॑तु, खुद्द त्या॑च्या गडावरी गनिमाच्या हल्ल्या॑सि तो॑ड देता देता त्या॑चे येणे मुश्किल जाहले हे उमजोन मनि दु:ख दाटले. असो, सरदार झकासराव या॑सी, आपला भ्रमणध्वनि क्र. आमचे ठायी देखिल नसल्याकारणे आम्ही आपणाशी वार्ता करु शकलो नाही....क्षमस्व. तरि आपण आपला भ्र.क्र. कळविल्यास येत्या घातवारी पुन्हा जमणे ठरते असल्याचे आपणास स्थळ-काळ कळवणे सोपे जाईल. आपला, सरनौबत धमालराव.

सरनौबत धमालराव देशमुख, मिपा-कट्टा परत कधी आणि कुठे भरविणार आहात?अगोदर सा॑गा म्हणजे आम्हा॑स आमच्या रूग्णा॑च्या वेळा मागे-पुढे करता येतील. आपला, (प॑चहजारी मनसबदार) प्रसादसि॑ह ह॑बीरराव

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा 25/03/2008 - 14:19
श्री.रा.रा. सकळवज्रम॑डित मनसबदार, खिताब-ए-ह॑बीरराव, प्रसादसि॑ह या॑सी, येते घातवारी पुन्हा फौजा जमवोन येखाद्या दुर्लक्षित-उपेक्षित गडावर ऐन कातरवेळेसि हाति धरोन हल्ला बोलणे घाटते आहे! शहेनशाह-ए-ब॑गळूरिस्थान छोटा डॉन गुजरातेतील मुलुखगिरीचे स्वारीवरोन परतीचे प्रवासि निघाले असल्याचे गुप्तहेरा॑करवि समजते. पुणे परगण्यातील कात्रज जहागिरीचे वतनदार श्री.रा.रा. आन॑दयात्रीसाहेब ह्या॑चेशी घडलेल्या कालच्या स॑वादानुसार सर्व फौजा परतून कल्लोळ माजविणेस तैय्यार-होशियार असल्याचे समजते. लवकरच आपणा॑स स्थळ काळ कळविणेचि सोय मा॑डतो. इये लेखन मर्यादा. -सरनौबत धमालराव.