आमचे स्फूर्तीस्थान : संदीप खरे आणि आपले आवडते विडम्बनकार केशवराव.....
बसतेस वरी तू जेंव्हा
जीव बसका फुसका होतो
पळण्याचे सुटते भान
टायर ही फाटका होतो.....
ऊर फाटुन नीज उडावी
कल्लोळ तसा ओढवतो
स्टिअरिंग दिशाहीन होते
कुणीतरी* पोरका होतो..... * कुणीतरी म्हणजे एखादा निष्पाप वाटसरु
येताच "पुणे" दाराशी
हिरमुसून जाती लोक
डिक्किशी थडकुन गाडी
जीव "द्वंद्वा"वाचुन जातो.....
तव मुठीत आवळणार्या
क्लच ब्रेक अन तुटक्या तारा
"फासा"विण घुसमट व्हावी
मी तसाच अगतिक होतो.....
तू टांग सखे वर काय
समजून टाकशी आज
इंजिनास भरते धडकी
सायलेन्सर पण तणतणतो.....
ना अजून झालो "गोठा"
तू मावशील ज्याच्यात
तुज वाचुन उबगत जातो
तुज वाचुन "पंप"# ही अडतो.....
# पंप म्हणजे पेट्रोल पंप- कारण "भार्"दस्त माणसाला माईलेज कमी देते गाडी आणि म्हणूनच पेट्रोल जास्त लागते.....
वाचने
2289
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सह्ह्ह्ही...
सह्ह्ही
In reply to सह्ह्ह्ही... by प्राजु