आमची प्रेरणा.. सुरेश भटांची गझल देखावे बघण्याचे वय निघून गेले
आमची शिफारस.. विडंबन वाचण्यापूर्वी मूळ गझल अवश्य वाचावी.
जे खावे पचण्याचे वय निघून गेले
पैजेवर चरण्याचे वय निघून गेले
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे
तास तास बसण्याचे वय निघून गेले
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ
नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले
आम्लेटे, पाव नि बन, पीत चहा रातंदिन
इराण्यास भजण्याचे वय निघून गेले
उडप्याच्या इडल्या अन्, खरपूस ते डोसे पण
एकसाथ हाणण्याचे वय निघून गेले
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी
शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले
खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने
हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले
वाचने
11047
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुरुनी ये
छान मस्त
अजूनी बाकी आहे !!!!
वा!!! सुरेख
वा..
सही!
मी
हे ही वाचा...
In reply to मी by सृष्टीलावण्या
सुमार आणि हास्यास्पद
In reply to मी by सृष्टीलावण्या
:))
In reply to सुमार आणि हास्यास्पद by चित्तरंजन भट
कवितेचे जाऊ देऊ नका आणि ........
दादांच्या गझलेचे विडंबन तसेच
वा!
सर्वांचे आभार
विडंबन म्हणजे
In reply to सर्वांचे आभार by अविनाश ओगले
विडम्बन
In reply to सर्वांचे आभार by अविनाश ओगले
माझा प्रतिसाद.
In reply to सर्वांचे आभार by अविनाश ओगले
बर्यापैकी खमंग
माझे (हि) मत.
धन्यवाद...
एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे ...........
साहित्यिक व समीक्षक( परस्पर संबंध)
प्रा.खेडकर सर,
In reply to साहित्यिक व समीक्षक( परस्पर संबंध) by प्रा सुरेश खेडकर
धन्यवाद.