#कल्पित_सत्य (१)"सव्वाशेर तडका"
सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा.
एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो.
पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो.
फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो.
कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो. झाडामागून शेतकऱ्याचा मित्र बाहेर येतो आणि रडणाऱ्या व शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या फोटोग्राफर चा फोटो काढतो व त्याच्या मित्राच्या न्यूज चैनेल ला पाठवतो.
शेतकरी म्हणतो: " काय रे तुम्ही सगळे माध्यम वीर !! लोकांच्या प्रत्येक भावनांशी खेळत राहाता आमच्या चेहेऱ्यावरची चिंता लाईव्ह कैच करून ती विकता तुम्ही? आणि छापता? तुम्हाला कुणाच्या भावनांशी घेणे देणे नाही. फक्त त्या भावना बंदिस्त करून ती विकण्यात तुम्हाला स्वारस्य असते, त्या भावनांशी तुम्ही स्वत:ला जोडत नाहीत. आणि हे सिद्ध झाले आहे जेव्हा तू मला मारायला धावलास!! हा तुझा फोटो कुठे छापुन येवू नये असे वाटत असेल तर येथून बऱ्या बोलाने चालता हो. पावसाचे काय करायचे ते मी पाहून घेईन."
#कल्पित_सत्य (२) "बुमरेंग"
सुचना: हा प्रसंग मला सुचलेला आणि पूर्णपणे काल्पनीक आहे पण तो सत्य व्हायला हवा का याचा विचार वाचकांनी करावा.
सुरेश, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा रितेश जेवण झाल्यावर उशिरा रात्री फिरायला जातांना एका फारशी ओळख नसलेल्या किराणा दुकानावर थांबले. रितेशला चॉकलेट हवे होते. खाल्ल्यावर दात घासले तरच चॉकलेट घेवून देतो असे कबूल करून दुकानात ते कुटुंब शिरले. दुकान फार मोठे नव्हते. तो बंद करण्याच्या तयारीत होता. त्याचे दुकान आणि घर जोडूनच होते.
"एक चॉकलेट द्या, काका" रितेश म्हणाला. डेस्कवर फारच थोडे चॉकलेट दिसत होते.
दुकानदाराला दुकान बंद करण्याची घाई असल्याने पैसे देऊन चॉकलेट घेऊन ते कुटुंब निघाले.
मुलगा हुशार.
थोडे पुढे गेल्यावर तो म्हणाला, "अरे मम्मी, चॉकलेट एक्स्पायर झाले आहे. एक महिना झाला एक्सपायरी डेट संपून."
ते दुकानदाराकडे परत गेले आणि तक्रार करायला लागले.
"तुम्ही एक्स्पायर झालेला माल ठेवता! योग्य नाही हे."
"चालता है ना यार इतना तो. कुछ नाही होता. खाले बेटा"
ते चॉकलेट थोडे लूज झाल्यासारखे सुद्धा वाटत होते.
"दुसरे चांगले चॉकलेट द्या नाहीतर पैसे परत द्या."
तो वाद विवाद करायला लागला.
तेवढ्यात त्या दुकानदाराचा छोटा मुलगा त्याला घरी बोलवायला आला.
"चलो पप्पा! खाना तय्यार है."
सुरेश ला एक आयडीया सुचली.
तो दुकानदाराच्या मुलाला म्हणाला,
"क्या नाम है बेटा तुम्हारा?"
"हिर्मेश"
"बडा अच्छा नाम है. चॉकलेट खाओगे बेटा? फ्री में देता हू! मेरी तरफ से!!"
तो दुकानदाराकडे बघायला लागला.
दुकानदार म्हणाला - "बेटा मत ले. खराब है वो" ... असे म्हणून त्याने लगेच जीभ चावली!
..... आणि रितेश ला नवे फ्रेश ताजे चॉकलेट मिळाले.
वाचने
3843
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुसरा किस्सा मस्त आहे.
चांगलंय !!!
काय लिहिता हो सोनार काका
+१११ स्पा सरांशी सहमत.
In reply to काय लिहिता हो सोनार काका by स्पा
+२२२ आवले काकांशी सहमत.
In reply to +१११ स्पा सरांशी सहमत. by प्यारे१
+३३३ वल्ली काकांशी सहमत.
In reply to +२२२ आवले काकांशी सहमत. by प्रचेतस
बालके निमिष, अनेकोत्तम आशिर्वाद
In reply to +३३३ वल्ली काकांशी सहमत. by धन्या
बाळ संजय, लेखणी आवर! ते
In reply to बालके निमिष, अनेकोत्तम आशिर्वाद by संजय क्षीरसागर
घसरगुंडी
In reply to बाळ संजय, लेखणी आवर! ते by भृशुंडी
सगळ्या काका लोकांशी सहमत.
In reply to +३३३ वल्ली काकांशी सहमत. by धन्या
काही प्रामाणीक शंका.
महाप्रश्ने ....
In reply to काही प्रामाणीक शंका. by ज्ञानोबाचे पैजार
>>बाकी स्पा बरोबर सहमत.
In reply to काही प्रामाणीक शंका. by ज्ञानोबाचे पैजार
भेगेत कैमेरा
या तुमच्या प्रतिसादावरुन असाच
In reply to भेगेत कैमेरा by भिंगरी
निमिषभौ, चालू द्या. तुमचं
कॅमेरा कोरड्या ठण्ण विहीरीत