✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

न आवडलेली पुस्तके- (कादंबरी)

प
पुस्तकमित्र यांनी
Fri, 07/04/2014 - 23:32  ·  लेख
लेख
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
37927 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

हिन्दु - भाल्चन्द्र नेमाडे

लव उ
Sat, 07/05/2014 - 14:04 नवीन
प्रत्येक क्रियापदाला लावलेला 'च' अगदि डोक्यात जातो. त्यात भरिस भर म्हणुन विषय लांबवल्यासारखा वाटतो.
  • Log in or register to post comments

'हिंदू'

चित्रगुप्त
Sat, 07/05/2014 - 15:43 नवीन
नेमाड्यांचे 'हिंदू' अतिशय आवडले आणि अलिकडे दुसर्‍यांदा पुन्हा वाचले. (सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लव उ

सहमत!

सोत्रि
Sat, 07/05/2014 - 21:21 नवीन
सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो
+१ - (अडगळ आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

उत्खनन

पैसा
Sat, 07/05/2014 - 14:38 नवीन
गौरी देशपांडेचं विंचुर्णीचे धडे वाचलं. ते प्रचंड आवडलं. नंतर एकेक पान गळावया वाचलं. तेही आवडलं. म्हणून गौरी देशपांडेची इन्फिबीमवर जेवढी पुस्तकं होती ती सगळी घेतली. त्यातलं पहिलंच वाचलं ते उत्खनन. अरारारारा! हिंदी सिनेमात शोभून दिसतील असे योगायोग, सगळी माणसं अजीर्ण व्हावं इतकी गोड. मुलीची जबाबदारी टाकून पळालेला प्रियकरही चांगला असणे, त्याने मरण्यापूर्वी ऑपरेशनसाठी नायिकेकडेच परत येणे, नायिकेची मुलगी आणि नवरा यांनी त्याचे ऑपरेशन आणि नंतर शुश्रूषा करणे इ. इ. वाचून डॉकं ऑऊट झालं. शिकलेला धडा, निव्वळ लेखकाच्या नावावरून पुस्तके विकत घेऊ नका. लायब्ररीतून आणलं असेल तर निदान २ दिवसांत परत करता येतं. पण न आवडलेली आणि विकत घेतलेली पुस्तके घरात बरीच जागा अडवून बसतात आणि त्यावरची धूळ पण साफ करत रहावी लागते.
  • Log in or register to post comments

हिंदू डोंगर पोखरून उंदीर ...

निनाद मुक्काम …
Sat, 07/05/2014 - 14:52 नवीन
हिंदू डोंगर पोखरून उंदीर ...
  • Log in or register to post comments

गल्ल्यावर हात ठेवून बोलणारे

कंजूस
Sat, 07/05/2014 - 15:09 नवीन
गल्ल्यावर हात ठेवून बोलणारे प्रकाशक लेखकांना वड्यात जास्ती मिरचा घालायला सांगतात काय ?
  • Log in or register to post comments

अगदी!

पैसा
Sat, 07/05/2014 - 15:12 नवीन
१००% पटलं. एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक लोकांना आवडतं. बरे पैसे मिळतात. मग दुसरं पुस्तक आणखी सफाईदार येतं. तेही खपतं. त्यानंतर लेखकाच्या प्रतिभेपेक्षा बहुधा प्रकाशकाची धंद्याची गणितं लेखकाला लिहिण्यासाठी ढकलायला लागतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी अगदी!!

अजया
Sat, 07/05/2014 - 15:12 नवीन
अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments

युगंधर आणि छावा. बाकी विश्वास

प्यारे१
Sat, 07/05/2014 - 15:18 नवीन
युगंधर आणि छावा. बाकी विश्वास पाटलांच्या जनरलच ऐतिहासिक कादंबर्‍या आत्यंतिक शब्दबंबाळ वाटतात. तर झाडाझडती सारखी कादंबरी बेक्कार डिप्रेस करते. :( चेत्याचं 'टु स्टेट्स' आणि अमिशची 'शिवा-ट्रायोलॉजी' मधली पहिलं दुसरं नि तिसरं चढत्या क्रमानं नावडतात! आता वपु काळे काका नावडते झाल्यानं त्यांची बरीचशी पुस्तकं.
  • Log in or register to post comments

झाडाझडती अत्युच्च दर्जाची आहे

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 16:16 नवीन
झाडाझडती अत्युच्च दर्जाची आहे. पानिपत पण पूर्णपणे रणांगणावरच अवतरते. संभाजी मात्र भयंकर शब्दबंबाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चांगलं लिहीतात नि त्यामुळंच

प्यारे१
Sat, 07/05/2014 - 16:29 नवीन
चांगलं लिहीतात नि त्यामुळंच भिडतं रे! उगाच्च डिप्रेस नाही वाटत कुणाच्याही लेखनामुळं. पानिपत पूर्ण केली होती एवढंच आठवतंय. फार डिटेल्स आहेत. प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं मात्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तरीही पानिपत समजावून घ्यायचं

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 16:46 नवीन
तरीही पानिपत समजावून घ्यायचं असेल तर शेजवलकरांच्या ''पानिपत १७६१' या पुस्तकापेक्षा इतर चांगले पुस्तक पाहण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सहमत, मात्र अशा कादंबर्‍यांचे

बॅटमॅन
Mon, 07/07/2014 - 14:25 नवीन
सहमत, मात्र अशा कादंबर्‍यांचे एक महत्त्व असते हे नाकारून चालणार नाही. लहानपणी इतिहास इ. ची गोडी लावण्यात राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, पानिपत, छावा, स्वामी, पावनखिंड, कादंबरीमय शिवकाल, इ. कादंबर्‍यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकदा गोडी लागली अन त्या विषयाचं वाचन जरा औरसचौरस झालं, की मग माणूस तिकडे तटस्थपणे बघू शकतो. पण सुरुवातीलाच शेजवलकर, राजवाडे, इ.इ. वाचले तर इंट्रेस पैदा होणेच शक्य नाही. त्यामुळे नंतर या कादंबर्‍या कितीही हास्यास्पद वाटल्या तरी इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात त्यांचा फाआआआर मोठा वाटा असतो. कारण भूतकाळ सर्वतोपरी जिवंत करायचा प्रयत्न त्या कादंबर्‍याच करतात. त्यामुळे पोरवयाइतके नंतर भारावून जायला होत नसले तरी त्या प्रतिमा, ती शब्दसृष्टी कायम मनात राहते. मला आठवतंय, दीडेक वर्षापूर्वी पानपतास गेलो होतो तेव्हा जागोजागी मनात पानिपत कादंबरीतलेच तपशील येत होतो. सुवाखेडी, उगराखेडी, पटपरगंज, इ. नावे ऐकून जो ज्याम नॉस्टॅल्जिक झालो त्याला तोड नाही. दिल्लीच्या जवळच रस्त्यावरून बुराडी गावचा बोर्ड दिसला तेव्हाही तीच अवस्था झाली होती. प्रत्यक्ष पानिपत शहरापासून ५ किमी दूरवर ते लढाईचं मोठं स्मारक उभारलंय तिथे काला आमच्या स्मरणार्थ आंब्याचे दुसरे झाडही लावलेय. ते सर्व बघत असताना जे काही वाटतं त्या भावना जागवण्याचे महत्कार्य या कादंबर्‍यांनी केले असे मी मानतो. शेवटी कारणमीमांसा एकीकडं आणि फ्यांटसी दुसरीकडं हे आवश्यक आहेच, पण हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

>>> हरितात्यांचं काम करणार्

प्यारे१
गुरुवार, 07/10/2014 - 17:27 नवीन
>>> हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही. खरंच! ह्या प्रतिसादासाठी बॅट्याला पार्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

वपु आणि पुलंचा वाचकवर्ग एक

कंजूस
Sat, 07/05/2014 - 15:53 नवीन
वपु आणि पुलंचा वाचकवर्ग एक ठरावीक उत्पन्नगटातला आणि ठरावीक सामाजिक पार्श्र्वभूमीचाही आहे .इतरांना त्यांचे लेखन डोक्यावरून जाते अथवा निरर्थक वाटते .ग्रामीण बाजाचे कथानकही शहरी लोकांना वाचवत नाही .गाजलेले लेखक सतत झुलवत ठेवतीलच असे नाही ,गाजलेले खेळाडू वल्ड कपात गोल करतीलच असे नाही .निराशही करतात .
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 16:14 नवीन
सहमत. पुलं अगदी बाळबोध तर वपु अत्यंत रटाळ वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वपु, दवणे रटाळशी सहमत, पण

यशोधरा
Sat, 07/05/2014 - 16:23 नवीन
वपु, दवणे रटाळशी सहमत, पण पुलंचे लिखाण मात्र बाळबोध नक्कीच नाही. कधीही कोणतेही पुस्तक घ्यावे आणि कोणत्याही पानावरुन पुढे वाचावे. सहजगत्या जमून आलेला असा पुलंचा विनोद आहे. पुलंनी फक्त विनोदी लिखाण केलेले नाही तर त्यांचे ललित लिखाणही तितकेच समृद्ध आहे. त्यातल्यात्यात कान्होजी आंग्रे हा अनुवाद तितकासा जमलेला नाही, असं वाटलं होतं पुस्तक वाचून, पण मूळ पुस्तक मी वाचलेलं नाही, तेव्हा त्याबाबत मतप्रदर्शन करणे बरोबर नाही. त्यांची नंदा, अंतू बर्वा, हरीतात्या, बटाट्याच्या चाळीतल्या एकेक वल्ली, रावसाहेब इत्यादि व्यक्तीचित्रणे कोण विसरेल? वंगचित्रे हे असेच एक सुरेखसे पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ते माझं व्यक्तिगत मत आहे असा

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 16:25 नवीन
:) ते माझं व्यक्तिगत मत आहे असा डिस्क्लेमर टाकायचा राहिला वर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो की. ते मला पटलेलं नाहीये,

यशोधरा
Sat, 07/05/2014 - 16:26 नवीन
हो की. :) ते मला पटलेलं नाहीये, इतकंच कारणांसकट सांगतेय :) पण पुलंची इतर पुस्तकंही वाचली असशीलच ना तू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बरीचशी वाचलीयत. पण आवडली कधीच

प्रचेतस
Sat, 07/05/2014 - 16:41 नवीन
बरीचशी वाचलीयत. पण आवडली कधीच नाहीत. विनोदी लेखन दमा, शंकर पाटील यांचे जास्त चांगले नव्हे उत्कृष्ट वाटते. कान्होजी आंग्रे चा अनुवाद आवडला होता. बाकी व्यक्तीचित्रणं वाचण्यातच मला फारसा रस नाही. त्यामुळे ते लेखन भिडतही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

ओके.

यशोधरा
Sat, 07/05/2014 - 16:42 नवीन
ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वल्लीकाका

विजुभाऊ
Sun, 07/06/2014 - 17:32 नवीन
वल्लीकाका कान्होजी आम्ग्रे चा अनुवाद पुलंनी उत्तमच केलेला आहे. उत्तम अनुवाद म्हणून पुलंच्या " एका कोळीयाने" या पुस्तकाचा उल्लेख होतो. पण त्या पेक्षाही सर्वोत्तम अनुवाद म्हणून" काय वट्टेल ते होईल" या पुस्तकाला नावाजायला हवे. पुलंची खोगीरभरती , गोळाबेरीज ही पुस्तके वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१ सहमत आहे

सागर
Mon, 07/07/2014 - 00:31 नवीन
विजुभाऊ सहमत आहे. एका कोळीयाने आधी खूप छान वाटले होते म्हणून द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड सी मुळात वाचून पाहिले. मग कळाले की अनुवाद चांगला असला तरी तितका ताकदीने मराठीत नाही उतरला. पण माळगांवकरांच्या कान्होजी आंग्रे चा मराठी अनुवाद खरोखर सुंदर केलेला आहे पुलंनी. दुसरे पुस्तक 'काय वाट्टेल ते होईल' हे मात्र मी वाचलेले नाहिये ते आता जरुर वाचेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

"एका कोळीयाने" हा अनुवाद

प्रसाद१९७१
Mon, 07/07/2014 - 13:51 नवीन
"एका कोळीयाने" हा अनुवाद अजिबात आवडला नाही. पु.लं. चे लिखाण अगदीच बाळबोध होते ह्याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

मला तरी पुलंचं कोणतही लिखाण

पिलीयन रायडर
गुरुवार, 07/10/2014 - 16:51 नवीन
मला तरी पुलंचं कोणतही लिखाण आवडलं नाही असं झालेलं नाही.. पण दमा मिराजदार / व.पु / शंकर पाटील ह्यांचे लेखन मात्र फार क्वचित आवडलय... (वपुंच लिखाण समजा ठिक आहे.. पण कथाकथन एकसुरी वाटलं फार... एकाच टोन मध्ये.. पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र..) हे माझं वैयक्तिक मत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

पुणेरी आणि समजुतदार

चित्रगुप्त
गुरुवार, 07/10/2014 - 19:28 नवीन
पुणेरी आणि समजुतदार
?????????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

म्हणजे अगदी सुस्पष्ट.

पिलीयन रायडर
Fri, 07/11/2014 - 12:54 नवीन
म्हणजे अगदी सुस्पष्ट..व्यवस्थित मराठी..ठाशीव बोलणं..सगळ्यांचा एकच टोन.. ह्या पेक्षा जास्त मी नाही सांगु शकत की नक्की मला काय म्हणायचय.. फक्त मला ते विषेश आवडत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

सहित्यिक वपु.

प्रभाकर पेठकर
Fri, 07/11/2014 - 13:00 नवीन
>>>>पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र. असं नाही. वपुंनी भाषेत आणि कथेत कितीही सहजता आणायचा प्रयत्न केला तरी त्यांची भाषा अनेकदा, सहजता सोडून, 'साहित्यिक' होते. विशेषतः जेंव्हा त्यांची दोन पात्रे संवाद, वाद, चर्चा करतात तेंव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हं बरोब्बर.. असंच काही तरी

पिलीयन रायडर
Fri, 07/11/2014 - 13:08 नवीन
हं बरोब्बर.. असंच काही तरी म्हणायचय मला.. धन्स काका!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

थोडक्यात कुठल्याही चित्रपटात

प्यारे१
Mon, 07/14/2014 - 14:48 नवीन
थोडक्यात कुठल्याही चित्रपटात 'शारुक खान' शारुक खानच असतो तसं वपुंचं कॅरॅक्टर कुठलंही असलं तरी वपुच बोलतात असं वाटतं. सखी , पार्टनर , अचपुकबाश्रीबुंजिकमोघी (ही कथा आहे), रंगपंचमी, काही खरं काही खोटं , वन फॉर द रोड, मी माणूस शोधतोय, कर्मचारी.... लई लई लई आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रतिस्पर्धी

स्वप्नांची राणी
Sat, 07/05/2014 - 16:07 नवीन
नातिचरामी - मेघना पेठे...चक्क आवडलं, दुसर्‍यांदा-तिसर्‍यांदा तर आणखिनच पटत गेलं. पण मला प्रचंड आवडलेलं आणखीन एक पुस्तक म्हणजे किरण नगरकर यांच अनुवादीत 'प्रतिस्पर्धी', हे ही खूप जणांना आवडलेलं नहिये.
  • Log in or register to post comments

असहमत व सहमत

सागर
Sat, 07/05/2014 - 18:02 नवीन
नातिचरामीबद्दल असहमत. मी सहा प्रयत्न करुन थकलो. माझी सहनशक्ती भरपूर असूनही या पुस्तकाने माझी केलेली अवस्था खरोखर विसरणार नाही. पण किरण नगरकरांच्या प्रतिस्पर्धी बद्दल पूर्ण सहमत. अफलातून पुस्तक आहे. मराठी अनुवादांच्या गर्दीत अतिशय दुर्लक्षित असे हे पुस्तक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

आपल्या मनात "बाईच्या जातीने"

धन्या
Sat, 07/05/2014 - 23:56 नवीन
आपल्या मनात "बाईच्या जातीने" कसं वागावं याची एक प्रतिमा तयार असते. या कादंबरीची नायिका आपल्या मनातील प्रतिमेला तडा जाईल असं पावलोपावली वागते. कादंबरी न आव्डण्याचं हे एक कारण असावं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

मला कोणत्याच भूमिकेतून ही कादंबरी पटली नाही

सागर
Mon, 07/07/2014 - 00:48 नवीन
मला नातिचरामि न आवडण्याचं कारण स्त्रीची पारंपारिक प्रतिमा आणि तिचे प्रतिमेला तडा जाणारे वागणेही नाहिये. उलट या मांडणीने कादंबरी फसली आहे. नातिचरामि चा विषय चांगला होता पण मांडणी चुकली आहे असे माझे मत आहे. मला सुदैवाने कोणतेही धक्के पचवता येतात. पण मी वाचन वेगवेगळ्या बाजूंनी व भूमिकांतून करतो. तरीही ही कादंबरी कोणत्याच बाजूने मनांत उतरली नाही. म्हणून माझे नातिचरामि बद्दल अतिशय टोकाचे मत झाले आहे. शक्यता कमीच आहे. पण पुढेमागे कदाचित वाचेनही. कादंबरी म्हणून मला ती पटली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नातिचरामी माझंही आवडतं ! अगदी

अजया
Sat, 07/05/2014 - 16:46 नवीन
नातिचरामी माझंही आवडतं ! अगदी असच पटत गेलेलं हळूहळू !!
  • Log in or register to post comments

पुलंनी लेखनात प्रतारणा नाहीच

कंजूस
Sat, 07/05/2014 - 17:13 नवीन
पुलंनी लेखनात प्रतारणा नाहीच केली .वाचकवर्ग कायम तोच राहिला .
  • Log in or register to post comments

पुलंचं पुष्कळ्सं लेखन आवडलय.

कवितानागेश
Sat, 07/05/2014 - 21:43 नवीन
पुलंचं पुष्कळ्सं लेखन आवडलय. व्यक्तिचित्रात्मक आणि प्रवासवर्ननं सुद्धा. पण पुन्हा पुन्हा वाचेन असं नाही. त्यांची राजकारणावरची काही विडंबनात्मक पुस्तकं मात्र न वाचताच अर्धीच ठेवली. अजिबात मजा आली नाही. एखाद्या लेखाकचं एक आवडलं म्हणून पुढचं आवडेलच अस्म नाही हे मात्र अगदी हल्लीच पुन्हा अनुभवलं. जेम्स रेड्फिल्ड्चं 'सेलेस्टाइइन प्रोफेसी' वाचलं. सुरुवातीला कशाचेच रेफरन्स लागत नव्हते पण हळूहळू पुस्तक पकड घेत गेलं. शेवट तर फार आवडला. म्हटलं तर सायन्स फिक्शन, म्हटलं तर फिलॉसॉफिकल, थोडा 'मेटाफिजिक्स' चा भाग, पण अगदी खरी वाटणारी माणसं आणि माणसांच्या वागणूकीचा व्यवस्थित आढावा, त्यातल्या त्रुटी, हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनी मांडलं आहे. म्हणून उत्साहानी त्याचा सिक्वेल 'टेन्थ इन्साईट' वाचायला घेतला. फार बोजड लिहिलय या पुस्तकात. उगीचच फिलॉसॉफी भरलीये आणि 'एनर्जी' या कन्सेप्टबद्दल त्याला खरोखरच जितकं चांगलं लिहिता आलं असतं तितकी महनत घेतली नाही असं वाटलं. कुठल्यातरी वेगळ्याच एनर्जी सोर्सचा वापर करुन तयार करत असलेला जनरेटर आणि त्याचे धोके अशी थीम असताना त्याला पुस्तक सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनी रंगवता आलं असतं असं वाटतय. निदान त्यानी आधी निकोला टेसलाच्या संशोधनाबद्दल वाचलं असतं तरी पुस्तक जास्त चांगल्या उन्चीवर गेलं असतं. मी कसेबसे सम्पवले. ४-४ दिवसनी ५-५ पाने वाचत सम्पवले.
  • Log in or register to post comments

अरविंद अडिगा.

आदूबाळ
Sun, 07/06/2014 - 09:23 नवीन
अरविंद अडिगा. बुकर मिळालं म्हणून सोसासोसाने "द व्हाईट टायगर" वाचायला घेतलं. निव्वळ थुकराट पुस्तक आहे. एक तर भारताविषयीच्या पाश्चात्य गैरसमजांना पद्धतशीर खतपाणी घालायचं सत्कृत्य हे पुस्तक करतं. उदा. अपघात करवून एखाद्या गरीबाला बळीचा बकरा बनवून सुटून जाता येतं, भारतात व्यवसाय करायचा असेल तर गैरमार्ग वापरल्याशिवाय गत्यंतर नाही वगैरे. दुसरं म्हणजे अडिगाचा टोन. प्रचंड डोक्यात जातो. "थांबा, माझ्या गोर्‍या मित्रांनो, आता तुम्हाला उकिरडा दाखवतोच. किळस वाटून घेऊ नका बर्का, आमच्या भारतात हे असंच असतं" असा काहीसा. तिसरं म्हणजे अडिगाची शब्दकळा. डोक्यात कळा येण्याइतपत भिकार आहे. "द व्हाईट टायगर" वाचून पाचेक वर्षं झाली. अडिगावरचा संताप जरा बोथट झाला होता म्हणून "बिटवीन द असॅसिनेशन्स" उचललं, आणि जुन्या आठवणी करपट ढेकरेसारख्या वर आल्या आणि दहा पानांतच पुस्तक भिरकावून दिलं.
  • Log in or register to post comments

:-)

आतिवास
Mon, 07/07/2014 - 14:57 नवीन
माझं आवडतं पुस्तक :-) कधीतरी लिहीन त्याच्यावर - जमेल तेव्हा. आणि पुन्हा वाचताना तुमच्या टीकात्मक मुद्द्यांना ध्यानात ठेवेन - बघू जमतंय का ते! "बिटवीन द असॅसिनेशन्स" हे अद्याप वाचलं नाहीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ऐला!!!!

आदूबाळ
Mon, 07/07/2014 - 17:13 नवीन
ऐला!!!! नक्की लिहा. कोणती सौंदर्यस्थळं आहेत हे जाणून घ्यायची जब्बरदस्त उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

व्हाईट टायगर निव्वळ थुकराट

बॅटमॅन
Mon, 07/07/2014 - 15:02 नवीन
व्हाईट टायगर निव्वळ थुकराट पुस्तक आहे. अतिशय बकवास. व्हीआयपी लोक बिअर पिऊन कारमध्ये बसून कसे पादतात आणि ड्रायव्हरच्या नाकातले केस कसे जळतात इ.इ. वाचून किळस आली होती साली. ब्ळ्यॉक्क्क थूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऽऽऽ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

आभार

आतिवास
Wed, 07/09/2014 - 13:36 नवीन
माझी साहित्यविषयक अभिरुची अत्यंत हीन दर्जाची आहे याची जाणीव मला संयत शब्दांत करून दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

च्यायला..कसलं काय ओ. मला

बॅटमॅन
Wed, 07/09/2014 - 15:07 नवीन
च्यायला..कसलं काय ओ. :( मला व्हाईट टायगर आज्याबात आवडलं नव्हतं इतकंच खरं. तुम्हांला आवडलं असेल तर असेलही त्यात तसं काहीतरी. त्याबद्दल वाचायला आवडेल. हीनाभिरुचीचा संबंध नै ओ लावत मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

प्रचंड सहमत..

पिलीयन रायडर
गुरुवार, 07/10/2014 - 16:42 नवीन
प्रचंड सहमत.. मला "रुखवत" म्हणुन पुस्तकं दिली होती.. त्यात अनेक उत्तम पुस्तकं होती..पण कही कही अशी उगाच हाईप झालेली पण माहेरच्यांनी कौतुकानी दिली.. त्यामुळे हे फेकुन / दान पण करता येत नाहीये कुणाला...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तसच...

अर्धवटराव
Sun, 07/06/2014 - 09:59 नवीन
कादंबरी म्हणुन नाहि तर नाटक, आणि नावडतं म्हणुन नाहि तर अतिरीक्त कौतुक म्हणुन... सखाराम बाईण्डारला एव्हढं ग्लॅमर का मिळालं अजुनही कळलं नाहि. कदाचीत त्याकाळाच्या मानाने ते नाटक फार बोल्ड होतं... अभिनेत्यांनी फार उंचावर नेऊन ठेवलं असावं म्हणुन देखील... पण चार दु:खी मनांचं नियतीपुढे हतबल आक्रोश करण्यापलिकडे नाटकात काहि नाहि. त्याला बंडखोरीचा बाज तर अजीबात नाहि. मग त्या नाटकाच्या नावाने एव्ह्ढी आदळआपट का झाली कोण जाणे.
  • Log in or register to post comments

एकुणात मिपावरची मंडळी

इष्टुर फाकडा
Sun, 07/06/2014 - 12:30 नवीन
एकुणात मिपावरची मंडळी 'व्यक्तिगत मत' या सदराखाली पुलं वगैरे सुमार लेखकांवर समीक्षा करण्याइतपत समृद्ध झाली म्हणायची ;)
  • Log in or register to post comments

इफा, समीक्षा वगैरे करत नाहीये

यशोधरा
Sun, 07/06/2014 - 12:36 नवीन
इफा, समीक्षा वगैरे करत नाहीये कोणी, स्वतःच्या आवडीनिवडीबद्दल बोलत आहेत. तुमची आवड निवड सांगा बघू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

(No subject)

प्रचेतस
Sun, 07/06/2014 - 13:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

पुलंची व्यक्तिचित्रणे अतिशय

किसन शिंदे
Sun, 07/06/2014 - 13:17 नवीन
पुलंची व्यक्तिचित्रणे अतिशय खास आहेत त्याबद्दल दुमतच नाही. बाकी त्याचं मैत्र तेवढं खास वाटलं नाही. गोनिदांचे कादंबरीमय शिवकाल वाचल्यानंतर पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती वाचायला हातात घेतले, पण तेव्हा त्यातली एकुण भाषा बाळबोध वाटली वाचायला. मग एक खंड कसाबसा वाचल्यावर दूसरा खंड वाचायला घेतलाच नाही हातात. पुढे मागे दोन तीन वर्षांनी वाचेनही कदाचित.
  • Log in or register to post comments

टू लाइव्ज

एस
Sun, 07/06/2014 - 14:53 नवीन
विक्रम सेठ यांच्या सूटेबल बॉय मुळे अपेक्षा वाढल्याने हे पुस्तक प्रीऑर्डर करून ठेवले होते तेव्हा. अक्षरशः कसेबसे अर्धेमुर्धे संपवले. तीच गोष्ट माइन काम्फ ची. हिटलरची आत्मप्रौढी इतकी डोक्यात जाते की हे पुस्तक वाचवतच नाही. दोन्ही कादंबर्‍या नाहीत. पण माझ्या सहनशीलतेचा अंत पाहिलेली पुस्तके. म्हणून नमूद केली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा