Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आनंदमयी on Sat, 07/05/2014 - 08:13
श्वासांतून वाहे सावळा मुरारी.. पायी चाले वारी पंढरीची|| सावळ्या डोहात सावळा तरंग भक्तिरूपी दंग वारकरी|| बंधने जुनी का भासती विजोड देहा लागे ओढ विठ्ठलाची..|| अधिरश्या जिवा पावलांची साथ वसे अंतरात भक्तियोग || पाहता लोचनी विठ्ठल सावळा तप्त जीव भोळा श्रांत होई || विष्णुरूपी लीन होवून मरावे अंतास उरावे विष्णूरूप || अदिती जोशी

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 07/05/2014 - 09:14

Permalink

सहज सरळ असे

सहज सरळ असे काव्य भक्तिरूप मना भावे खूप वाचताना...
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Sat, 07/05/2014 - 09:51

In reply to सहज सरळ असे by अत्रुप्त आत्मा

Permalink

+१

छान व मनाला भावनारी कविता. फक्त एक बदल सुचवू इच्छितो: विष्णुरूपी लीन होवून जगावे अंतास उरावे विष्णूरूप ||
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sat, 07/05/2014 - 10:08

Permalink

साधी सोपी गोड कविता.

साधी सोपी गोड कविता. :)
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 07/06/2014 - 09:04

Permalink

आवडलं!

आवडलं!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 07/06/2014 - 09:06

Permalink

सुरेख...

सुरेख... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaj Phir Tumpe Pyaar Aaya Ha... ;) :- Hate Story 2
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Sun, 07/06/2014 - 10:10

Permalink

आवडली कविता.

आवडली कविता. एक शंका: देवद्वार वृत्त यालाच म्हणतात का?
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 07/06/2014 - 10:20

Permalink

सुरेख!!

एकदम मनभावन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 07/06/2014 - 11:56

Permalink

सुंदर.

सुंदर. आयुर्हित ह्यांनी सुचवलेला बदल जास्त समर्पक.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3268 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com