अनवट किल्ले २०: बहिर्जी नाईकांची स्मॄती जपणारा, भुपालगड, बाणुरगड(Bhupalgad, Banurgad )
शाहिस्तेखानाने चाकणच्या भुईकोटाचा ताबा पंचावन्न दिवसांच्या तिखट प्रतिकारानंतर मिळवला (१४ ऑगस्ट १६६०) आणि या कोटाचे हवालदार काहीसे हताश होउन राजगडाच्या पायर्या चढत होता, आता राजे काय शिक्षा सुनावताहेत या चिंतेने ग्रासलेला हा किल्लेदार राजांसमोर उभा राहिला आणि राजांनी त्यांना शिक्षा सुनावली, आदिलशाही सरहद्दीवरच्या भुपालगडाची किल्लेदारी. हे किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळा. राजांना अश्याच ह्ट्टी किल्लेदाराची आदिलशाही सरहद्दीवर आवश्यकता होती.शिवाजी राजांनी हा गड अफजलखानाच्या वधानंतर १५ नोव्हेंबर १६५९ ते मार्च १६६० या दरम्यान ताब्यात घेतला असावा.