नाही म्हणजे नाही

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
2 Mar 2016 - 11:40 am

बायको: पोह्यात मीठ विसरले, चव का तुम्हाला कळत नाही,
खाताय कि चरताय, तुमचं काही खरं नाही.
नवरा: अॉफिसला उशिर होतोय, क्षणाचीही उसंत नाही,
जीवनच माझं चवदार केलंस, पोह्यांची मला तमा नाही.
बायको: वायफळ बडबड थांबवा, वेळेत तुम्ही कधी निघत नाही,
एवढं डोकं आहे तर, हेल्मेट का बरं वापरत नाही.
नवरा: नेहमीची तुझी कटकट, मला मुळीच पसंत नाही,
मनातली तुझी प्रेमळ चिंता, मला कधीच कळत नाही.
बायको: अॉफिसमधून लवकर आलात, तब्ब्येत तर बिघडली नाही,

फ्री स्टाइलकविताविडंबन

::: मिपा विडंबन स्पर्धा :::

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
2 Mar 2016 - 1:10 am

अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है...
अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा...
आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...

काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे.

कविताविडंबनमौजमजासद्भावनाआस्वादप्रतिभा

जीवनशाळा

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
1 Mar 2016 - 11:21 pm

गणिताच्या तासाला, उत्तर फारच सोपं असतं
एक अधिक एक बरोबर दोनच असतं
शाळेच्या पायऱ्या उतरताच कळतं
इथे मात्र एक नि एक 'अकरा'च करावं लागतं.

फळ्यावर सोडविली कितीशी किचकट समीकरणं
लांबच लांब सूत्रांची कसली ती प्रकरणं
यशाच्या पायऱ्या चढताच कळतं
इथे मात्र एकच यावं लागतं 'बेरजेचं' राजकारणं.

ते म्हणाले, आम्ही उंचावतो तुमच्या पिढीची बुद्धिमत्ता (IQ)
मग का बरं खालावली आज समाजजीवनाची गुणवत्ता
नोकरी-व्यवसायात उतरताच कळतं
इथे महत्त्वाची असते फक्त तुमची मालमत्ता.

कविताविडंबनशिक्षण

शब्दांची ताकद

shawshanky's picture
shawshanky in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 10:06 pm

मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी
अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द
किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही
शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस
उभा राहतो. माणसामुळे समाज, समाजामुळे एखादं गाव, गावांपासून
राज्य,असा अनंत प्रवास छोट्याशा शब्दांपासून सुरू होतो.कौतुकाच्या

धोरणमांडणीसंस्कृतीकलावाङ्मयभाषाशब्दक्रीडाशब्दार्थजीवनमानराहणीशिक्षण

दंगा कथा : छोटू

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 7:59 pm

बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतिया खान असा शाळेत जाण्याचा मार्ग. शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३ किलोमीटर पाई चालण्यामुळे चप्पल आणि जोड्यांचे बारा वाजयचेच. मोतिया खान जवळ एक चांभार होता. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याचा मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते.

कथाआस्वाद

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सना पर्यायी आहार ?

माहितगार's picture
माहितगार in पाककृती
1 Mar 2016 - 12:23 pm

तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक नसलेले पर्यायी आहार कोणते ? मिपावरील आणि इतरत्रच्या सुयोग्य पाककृतींचे दुवे देणे आणि तेल, तुप, साखर, कार्बोहायड्रेड्सचा अतिरेक टाळून समतोल आहार कसा घ्यावा ? हे या धागा लेखाचे मुख्य प्रश्न आहेत.

बसते बिचारी एकटी आजी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
1 Mar 2016 - 11:20 am

बसते बिचारी एकटी आजी
देवापुढती वाती वळत
असते मुखात नामस्मरण
कधी तिचे ना कंटाळत..

गत आयुष्याचा पाढा
असते स्वत:शीच उगाळत
गालावर एखादा अश्रू
नकळत येई ओघळत..

सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..

सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..
.

करुणकविता

माहिती हवी - ठाणे परिसरात शास्त्रीय संगीत शिकवणी

उमेश पाटील's picture
उमेश पाटील in जनातलं, मनातलं
1 Mar 2016 - 10:31 am

ठाणे पश्चिम परिसरात शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी चांगला गुरु अथवा चांगली संस्था असल्यास सुचवावे, स्वानुभवावरून सुचविल्यास अगदी उत्तम

सविस्तर माहिती : मला स्वतासाठी शिकवणी हवी आहे आणि आधी ३ वर्ष शास्त्रीय संगीतात शिक्षण घेतले आहे सध्या घराजवळच शिकवणी हवी असल्याने माहितीसाठी विनंती

संगीतमाहिती