::: मिपा विडंबन स्पर्धा :::

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
2 Mar 2016 - 1:10 am

अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है...
अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा...
आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...

काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे.

रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात. अनेक रंग, अनेक ढंग यांनी हे कवितांचं जग बहरलेलं आहे. त्यापैकी एक रंग असा आहे की जो बोंबा मारत येतो; आणि तो ज्या रंगात म्हणून मिसळेल त्या रंगाला खुलवून टाकतो; आणि एक वेगळाच रंग तयार होतो. विडंबन. रंगीबेरंगी काव्यविश्वातला हा अतरंग. याच रंगात आपण आपलं मिपा रंगवायचंय.

मराठी विडंबनविश्व ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही अशा आचार्य अत्र्यांचं, किंवा केशव कुमारांचं प्रथम स्मरण करुयात.

मिपा विडंबन स्पर्धा

तर विडंबनहौशींनो सज्ज व्हा. विडंबनहौशी नसाल तरीही सज्ज व्हा. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे असतील.

१. विडंबन कुठल्याही मराठी कवितेचं/गाण्याचं करता येईल. म्हणजेच, कच्चा माल तुम्ही आपापल्या पसंतीचा निवडायचाय. पण अट अशी आहे की विडंबनातून तयार होणारं नवकाव्य हे खाली दिलेल्या तीन पैकी एका रंगात रंगलेलं असायला हवं, म्हणजेच ते खालीलपैकी एका विषयावरचं काव्य व्हायला हवं.
२. प्रत्येक स्पर्धक प्रत्येक विषयाची एक अशा एकूण तीन प्रवेशिका विडंबन स्पर्धेसाठी देऊ शकतो.
३. विडंबनाची भाषा मराठीच असायला हवी.
४. मूळ काव्याच्या चौकटीला कमीत कमी धक्का लावून विडंबन केलं जावं. म्हणजेच, वृत्त, मात्रा, गण इत्यादींचे नियम पाळून केल्या गेलेल्या विडंबनाला जास्त मार्क असतील.
५. विडंबनाची भाषा अश्लील नसावी.
६. विडंबनाला समर्पक शीर्षक देणे आवश्यक आहे.
७. कोपरखळ्या, टोमणे चालतील, परंतु व्यक्तिगत टीका, ताशेरे असलेली काव्य ग्राह्य धरली जाणार नाहीत.
८. विडंबन मिपावर पूर्वप्रकाशित नसावे.

प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत.

विजेता निवडण्याकरता मतदान पद्धत अवलंबली जाईल. तीन विषयांच्या कवितांचे तीन स्वतंत्र धागे काढले जातील व त्यावर ग्राह्य प्रवेशिका प्रकाशित होतील. मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल.

आज दिनांक २ मार्च पासून १७ मार्च पर्यंत प्रवेशिका पाठवण्यासाठीची मुदत असेल.
१८ ते २४ मार्च पर्यंत मतदानासाठी वेळ असेल.
२८ मार्च रंगपंचमीच्या दिवशी स्पर्धेचे विजेते जाहीर केले जातील.

मग तयार आहात रंगांची उधळण करायला?

विडंबन करायचे विषय खालीलप्रमाणे

  • प्रेम
  • राजकारण
  • फजिती

चला तर.... मुरलेले मिपाकर एव्हाना सरसावले असतीलच. पण नवमिपाकरांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्याकडून आग्रहाचं निमंत्रण आहे.

'विडंबनी नव्या दिसोत नव रंग हे लोकहो
उडून कल्ला मिळोत बहुरंग मिपास हो'

किती भिजवू नि रंगवू कुणाला
रंगपंचमीचा सण आला
रंगपंचमीचा सण आला

फुगे फुगवू चला
पिचकारी भरा
आला आला हा बकरा आला

चला चला, येऊदेत एक से एक काव्य!

कविताविडंबनमौजमजासद्भावनाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

2 Mar 2016 - 6:34 am | बाजीप्रभू

कुनी 'ट' ला 'ट' आनि 'फ' ला 'फ' जुळिवनार,
अनं पब्लिक त्ये आतून आलंय म्हननार,
आमास्नी नाय कवा आतून आल्यागत वाटनार,
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार!!

चांदणे संदीप's picture

2 Mar 2016 - 6:52 am | चांदणे संदीप

हे तत्तर तत्तर तत्तर...

भारीच है! आता फूल्ल्ल टू धिंगाणा!

एखाद्या गोष्टीला 'अधिकृत' कसे करावे, हे मिपाकडून शिकले पाहिजे!

Sandy

एक एकटा एकटाच's picture

2 Mar 2016 - 7:13 am | एक एकटा एकटाच

हा हा हा

अब आएगा मजा

स्वामी संकेतानंद's picture

2 Mar 2016 - 8:17 am | स्वामी संकेतानंद

आयला! सुचायला पाहिजे विडंबन!
जुने पण कुठेही(फेसबुक वगळता) प्रकाशित न झालेले चालतील का?

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2016 - 1:28 pm | प्राची अश्विनी

तुम्ही तर यात अव्वल आहात. शुभेच्छा!!!

अजया's picture

2 Mar 2016 - 8:24 am | अजया

धमाल स्पर्धा होईल ही.विडंबनकारांना पायघड्या घालुन आमंत्रण!
फेका फुगे मारा बोंब!

मितान's picture

2 Mar 2016 - 8:29 am | मितान

मजा येणार !!!!

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 8:34 am | राजेश घासकडवी

मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची जावे
तरी हास्य हो पाविजे ते स्वभावे
कपाळीस आठ्यांस सोडून द्यावे
जनीं दंत ते सर्व दावीत जावे

जय जय रघुवीर समर्थ!

मुक्त विहारि's picture

2 Mar 2016 - 9:28 am | मुक्त विहारि

जय जय मिपावीर समर्थ.

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 10:31 am | राजेश घासकडवी

हे छाणच आहे हो, पण त्या शिंच्या लघुगुरू मात्रांमध्ये बसत नै ना! आता ही एंट्री नसली म्हणून काय झालं, सगळं कसं पद्धतशीरप्रमाणे व्हायला पायजेल नाय का?

टवाळा मिपाते तुवां चेष्टिजावे

बाकी सर्व लघुगुरू बरोबर आहे.

आमचे एक मित्र ह्या स्पर्धेत मनापासून भाग घेतील असे वाटते.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2016 - 10:01 am | अत्रुप्त आत्मा

डंडुकात्मा-फटकहत्ती!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry009.gif

सस्नेह's picture

2 Mar 2016 - 10:09 am | सस्नेह

हे मित्र तुमच्या चांगल्याच परिचयाचे दिसतात !
कोण हो, कोण ?

भीडस्त's picture

2 Mar 2016 - 10:24 am | भीडस्त

पूछते है वोह कि गालिब कौन है

कोई बतलाओ के हम बतलाये क्या

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2016 - 7:45 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्यांना परवानगी मिळेल का पण? हल्ली ते रोज होम-हवनही होममिनिष्टरांच्या परवानगीशिवाय करत नाहित असं नाखुकाका म्हणाले बॉ परवा. खखोदेजा.

मला विडंबने वाचायला आवडत नाही आणि करायला तर त्याहूनही आवडत नाही.

प्रत्येक कवितेच्या निर्मिती मागे एक प्रचंड मोठा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र असते.

काहीच भाग्यवान कवी असे असतात ज्यांना कळ आल्या आल्या कविता होते. त्यातले सुध्दा फार थोडे कवी सुखसारक वटीच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या सारख्या कविता पाडत असतात. पण हे भाग्य सर्व कविंच्या नशिबी असतेच असे नाही.

कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते. बराच वेळ जोर लावल्यावर देखिल कविता होत नसली तरी सुध्दा हे कवी लोक चिकाटी सोडत नाहीत, कुंथुन कुंथुन तो शेवटी ते एकदाची कविता पाडतातच. मग आपले ते डाउनलोडवलेले पुण्यसंचित विनय पूर्वक रसिकांच्या चरणी सादर करतात. हि सर्व प्रक्रियाच मोठी कष्टदायक आहे. आणि आपण त्यावर विडंबनाचे पाणी ओतायचे? छे छे त्या कोमल कवी मनाला काय वाटत असेल?

नाही नाही माझ्या हातुन हे असले पातक कदापि घडणार नाही. हे परमेश्वरा या असल्या स्पर्धा भरवणार्यांना आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेणार्या पाषाण हृदयी विडंबकांना तू सद्बुद्धी दे.

एक मिपाकर म्हणुन.... जाऊ दे......

समस्त कविवृंदा तर्फे मिपा च्या सा. सं मंडळाचा जाहीर णिशेढ.

आणि इथुन पुढे जो पर्यंत सासं मंडळाचे संपूर्ण मण:परिवर्तन होत नाही तो पर्यंत मी दुपारच्या चहा बरोबर आठ ऐवजी केवळ सात बिस्कीटे खाउन प्राणांतिक उपोषण करणार आहे.

पैजारबुवा,

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 11:02 am | राजेश घासकडवी

कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते.

अडला हरी गाढवाचे पाय धरी
अडला कवी बाटलीला ओठ लावी

अगगागा. पैजारबुवा म्हणजे अशा कवींचे कर्दनकाळच जणू.

सस्नेह's picture

2 Mar 2016 - 11:32 am | सस्नेह

विडंबनारिष्टचं ब्यारल संपलं वाट्टं ? :D

शब्दबम्बाळ's picture

2 Mar 2016 - 11:35 am | शब्दबम्बाळ

पण,
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे... हे एकदम वर्जिनल म्हणायचं का? ;)

म्हणजे विडम्बनाचे पाणी ओतण्याऐवजी तर्री ओतावी!! :)

अजया's picture

2 Mar 2016 - 10:59 am | अजया

ऐसी कुंथण्याची कळा
येऊ द्यावी मिपाबाळां
कवींचा तो कळवळा
सोडून द्यावा

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:24 am | माहितगार

=)) =))

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:27 am | माहितगार

फुगे फुगवू चला
पिचकारी भरा
आला आला हा बकरा आला

;) सासं अवघड हो हे

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:28 am | माहितगार

ह. घ्या. हे लिहायचे राहीलेच :)

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:31 am | माहितगार

हे प्रा डॉ रचीत आहे का ?

माहितगार's picture

2 Mar 2016 - 11:32 am | माहितगार

प्रा डॉ तुम्ही नसाल तर क्षमा करा हं

राजेश घासकडवी's picture

2 Mar 2016 - 11:38 am | राजेश घासकडवी

हा तुमचा आपुलाचि संवाद आपणासि वाचून मला एकदम कोणाचंतरी फोनवर बोलणं एका बाजूने ऐकल्याचा भास झाला.

"हो हो, नक्की. मी स्वतःच जाईन ना"
....
"नाही, काहीच टेन्शन नाही. गेली दहा वर्षं करतो आहे मी हे."
....
"आता गावचं पाणी ते शेवटी गावचं पाणीच ना. तुम्हीसुद्धा काय बोलता राव."
....
वगैरे वगैरे...

माहितगार's picture

2 Mar 2016 - 1:21 pm | माहितगार

:) :) प्रतिक्रीया द्यावी की नाही, दिली तर काय द्यावी अशा मनस्थितीत होतो.

प्राची अश्विनी's picture

2 Mar 2016 - 1:23 pm | प्राची अश्विनी

:)

सुमीत भातखंडे's picture

2 Mar 2016 - 1:26 pm | सुमीत भातखंडे

मस्त स्पर्धा!
(एकाहून एक विडंबनांच्या प्रतिक्षेत) सुमीत भातखंडे

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2016 - 1:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी आयड्या !

आता सर्व आयड्या / डुआयड्या बाहू सरसावून कीबोर्डातून पिचकार्‍या मारायला तयार झाल्या असतील.

मज्जाच मजा येणार ! =))

सूड's picture

2 Mar 2016 - 2:28 pm | सूड

यमक्या कवींचा पसारा, न साहावे संपादकसागरा..
तेणे वैतागोनि क्षणभरा, विडंबनस्पर्धा योजिलीसे...

स्वामी संकेतानंद's picture

2 Mar 2016 - 2:52 pm | स्वामी संकेतानंद

वाह!!

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 10:00 pm | सतिश गावडे

देवाचिये दादुलेपणाचा उभारा, न साहवेची साता सागरा
भेण वोसरोनी राजभरा, दिधली द्वारावती

सूड's picture

3 Mar 2016 - 10:54 pm | सूड

पर्फेक्ट!! =))

दमामिंनाही आवताण धाडा.

स्वाती दिनेश's picture

2 Mar 2016 - 5:34 pm | स्वाती दिनेश

केसु गुर्जी, रंगाशेट, खोडसाळ अँड सो ऑन..

गौरी लेले's picture

2 Mar 2016 - 5:59 pm | गौरी लेले

खुपच छान !

मिसळपाववरील असल्या अभिनव उपक्रमांमुळेच मिपा अखिल मराठी साहित्य संकेत स्थळां मध्ये शोभुन दिसते !

मराठी भाषा टिकवण्यात मिसळपावाचे अमुल्य योगदान आहे !

स्पर्धेला शुभेछा :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

2 Mar 2016 - 7:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तांबीय काव्य नको हे राहिलं.

त्यासाठी 'परसाकडल्या कविता' असं वेगळं सदर सुरु करावं असा प्रस्ताव ठेवतो. =))

बोका-ए-आझम's picture

3 Mar 2016 - 10:04 am | बोका-ए-आझम

काय खरं नाही भौ!

जेपी's picture

3 Mar 2016 - 9:47 am | जेपी

चांगलय..
आता होळीच्या प्रतिक्षेत ..

प्रमोद देर्देकर's picture

3 Mar 2016 - 11:06 am | प्रमोद देर्देकर

कवीता थेट इथेच प्रसिध्द करायची आहे कि संपादकांना धाडायची आहे की आणि मग ते ती प्रसिध्द करणार?

प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत.

प्राची अश्विनी's picture

3 Mar 2016 - 11:32 am | प्राची अश्विनी

विडंबनकाराचे नाव न लिहिता विडंबने प्रसिद्ध करावीत असे वाटते.

स्वामी संकेतानंद's picture

3 Mar 2016 - 9:13 pm | स्वामी संकेतानंद

+1

विडंबनकाराचे नाव नसेल.प्रवेशिका दिसेल.

जव्हेरगंज's picture

3 Mar 2016 - 8:05 pm | जव्हेरगंज

ल य भा री !

नीलमोहर's picture

3 Mar 2016 - 10:02 pm | नीलमोहर

म्हणजे आता मिपावर दंगा करायला ऑफिशियली परवानगी,
लेखकाचे नाव देऊ नये याच्याशी सहमत, प्रत्येक एन्ट्रीला क्रंमाक वगैरे देता येईल.
कितीही नाही म्हटले तरी, काय लिहिले पेक्षा कोणी लिहिले याला महत्व.. वगैरे वगैरे :)

तर्राट जोकर's picture

3 Mar 2016 - 10:10 pm | तर्राट जोकर

+१००

कच्चा माल फॅक्टरी वाले मेरा विडंबण बना दो

( डीजे वाले बाबु मेरा गाना....... ) =))

लेखकोंको जुतोके निचे
तू कहे तो छपवाऊ पीजे
दिन रात निकालू धांगे
मराठी इंग्लिस नये पुराने...

हुकुम चला रिक्वेष्ट न कर
पढ़ती जा बेबी रेष्ट न कर
पेशंट हु अनहितोंका
पेशंस मेरी टेस्ट न कर

ओय फेक्टरी वाले वाले विडंबन बनादे
कबसे पब्लिक कह रही है
बाकी पूरी करदुंगा मै कोई कसर जो रेह रही है....

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 6:09 pm | वेल्लाभट

(सरणार कधी रण...)
स्फुरणार विडंबन कधी तरी हे
कुठवर पाहू वाट परी

काका प्रेरणा देताय तुम्ही!!

वेल्लाभट's picture

11 Mar 2016 - 6:18 pm | वेल्लाभट

चंगलच्च्च की मग...
लिवाच.

पैसा's picture

14 Mar 2016 - 4:45 pm | पैसा

कोणी कोणी पाठवलीत विडंबने?

प्रमोद देर्देकर's picture

18 Mar 2016 - 1:44 pm | प्रमोद देर्देकर

आज १८ तारीख आली तेव्हा विडंबन स्पर्धेत पाठविलेली विडंबने कधी प्रसिध्द करणार सा. सं. मं?

सूड's picture

18 Mar 2016 - 9:53 pm | सूड

विडंबने?

विडंबने उद्या प्रकाशित होतील.