सावध

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 2:49 pm

रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात. त्यांचे प्रतिध्वनी गावशिवारात घुमत राहतात.

कथामौजमजाप्रतिभा

पहिली चाचणी

कवि मनाचा's picture
कवि मनाचा in जे न देखे रवी...
6 Mar 2016 - 2:40 pm

कविता लिहिल्यावर करतो मी गुणवत्ता तपासणी,
अर्थात बायकोवरच असते त्याची पहिली चाचणी,
कवितेचे नाव काढताच पडते ती बुचकळ्यात,
पण ऐकल्यानंतर, निष्कर्ष लगेच कळतो तिच्या डोळ्यांत !!

डोळ्यांत हरवते ती माझ्या, लवते न तिची पापणी,
लगेच टपकतो अश्रू, जणू सुखावता माहेरच्या आठवणी,
ग्यासवर दूध ऊतू गेल्याचे, शल्य मनी नसते या क्षणी,
विविधभारतीवर रमतो दोघे, ऐकत सुरेल प्रणय-गाणी.

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कविताकविताचारोळ्याविडंबन

मोदी सरकारच्या नवीन योजना

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 12:38 pm

मेक-अप इंडिया-
या योजनेअंतर्गत स्त्रियांना मेक-अप चे साहित्य कमी किमतीत उपलब्ध करून दिले जाईल. तसेच हे साहित्य वापरून सेल्फ़ी काढून 57855 या नं. वर पाठवून द्यावी, निवडक 100 स्त्रियांना 5kg तुरडाळ मोफत दिली जाईल.

वेक अप इंडिया-
या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेक अप इंडिया नावाचे ऍप इनस्टॉल करावे लागेल. सकाळी 4 वाजता हे ऍप आपणास आपण सेट केलेली रिंगटोन वाजवून उठवेल. अर्थात डिफ़ॉल्ट रिंगटोन "नमो नमः" ही असेल. शिवाय आपल्या वाढदिवसाच्या वगैरे दिवशी मोदींच्या आवाजातील शुभेच्छा सन्देश देईल.

धोरणप्रकटन

ठळक बातम्या

डॉ. एस. पी. दोरुगडे's picture
डॉ. एस. पी. दोरुगडे in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 10:51 am

राजकीय-
> पंतप्रधान मोदी अजूनही भारतातच.
> राहुल गांधी यांनी आज कुठलाही मूर्खपणा केला नाही.
> अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार मध्ये (पुन्हा) "जंग".

कला-
> "BA पास" नंतर "MA पास" चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित. "NET/ SET Qualified" आणि "Doctorate" या त्यापुढिल भागांचीही उत्सुकता.
> शाहरुख़ चा FAN लौकरच प्रदर्शित होणार. " जबरा फ़ैन" गाण्यात कंगना राणावत चा जलवा.
(चुकीची दुरुस्ती- "जबरा फैन" गाण्यात शाहरुख़च आहे, जरी कंगना सारखा दिसत असला तरी.)

क्रीड़ा-
> भारताकडून पराभूत होण्यास बांगलादेश सज्ज.

राजकारणबातमी

'साप'सफाई

Dinesh Satpute's picture
Dinesh Satpute in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 10:48 am

रविवार सुट्टीचा दिवस ....माझा मुलगा , पप्पा पप्पा आवाज देत दरवाजाची बेल वाजवत होता...काय झाले असेल म्हणून मी सुद्धा धावत येत दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मुलाने सुरवात केली... खाली चला लवकर ..सोसायटीतील सर्व लोक खाली जमा झालेत...लहान मुलांनी खेळताना साप पाहिला असं बोलतायेत..मी सुद्धा उत्सुकतेपोटी लगेच खाली गेलो..खाली जमा झालेली गर्दी पाहून आपल्या सोसायटीत एवढी लोकं राहतात यावर विश्वास बसेना.

समाजअनुभव

डाक्टर डाक्टर-2

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 2:44 am

आपला भारत देस लैच झक्कास. इथलचि लोकं (मजी मह्या गावातलीच) सगळ्यात भारी. त्याहीचे इच्चार, वागणूक- बिगनुक, कामं-धंदे एकदम जबरदस्त. अपुन त्याहीचे एक नंबर फॅन.
बिचारी दावखान्या मोहरुण जाताना आदबीनि वाकुन 'राम-राम' घालत्यात. वाटात कुढं भेटली की लग्गीच् "काय डाक्टर साहेब? बरं हाय ना?" असं इच्चारतात. आपल्याला त् भौ त्यहिच्या कडून तपासायची फि घ्यायची बी इच्छा हूत नै. पर मनलं आपल्याला बी पोट हाय, मनुन आलं पेशंट की आपुण तेला पैलं सलायण लावतु अन सलायणचं अन त्यात सोलड्याल्या इंजकशनाचं तेवढं दोन अडीचसं रुपय घेतु बाकी भायेरच्या डाक्टरवानी तपासा बिपासाचा एक रूपा लावत नै. अन ती बिचारी देतात बी.

कथाविनोद

परीकथा भाग ६ - (फेसबूक स्टेटस पावणेदोन ते दोन वर्षे)

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 9:45 pm

२१ डिसेंबर २०१५

खाली डोके वर पाय, शीर्षासन करणे..
पाठीच्या कण्याला हाडच नसल्यासारखे शरीराची उलटी कमान करणे..
हाताच्या अंगठ्या ऐवजी पायाचा अंगठा चोखणे..
पटापटा श्वास घेत पोटाची पिशवी आतबाहेर करणे..
आत्ताच ही लक्षणे आहेत, तर मोठी होत पतंजली नूडल्स खायला लागेल तेव्हा तर विचारायलाच नको :)

.
.

२३ डिसेंबर २०१५

प्रत्येक देशाची जशी एक खाद्य संस्कृती असते तशी प्रत्येक मुलाचीही एक असते. एक आमचीही आहे.

बालकथालेख

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
5 Mar 2016 - 6:44 pm

श्रीसमर्थकृत - अन्तर्भाव

जय जय रघुवीर समर्थ !

प्रस्तावना :
( माघकृष्ण नवमी , गुरुवार मार्च ३, २०१६)
सर्व साधकांना दासनवमीनिमित्त सादर प्रणाम!

सज्जनगडावरील दासनवमी निमित्तची विशेष पुजा
ram

धर्मशिक्षणप्रश्नोत्तरे

दिवस सातवा आणि आठवा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
5 Mar 2016 - 4:22 pm

५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
5 Mar 2016 - 4:09 pm

बर्‍याच दिवसानी पुन्हा थोडे कवितेत लिहावे म्हणतोय .. आवडले तर सांगा...

चोचभर दाण्यासाठी
वेशी बाहेर पाखरं
टीचभर पोटासाठी
घर उंबर्याशी वैर ||

पाणी आटलं डोळ्यात
शेत जळलं रानात
पोर धाडलं शरात
गाव दुष्काळ पिडित ||

कविता माझीकविता