Skip to main content

सावध

जव्हेरगंज यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
रात्री वडाच्या बुंध्याशी मी सुक्षात निजतो. खोल काळोखात घुबडांचे चित्कार मला घाबरवुन सोडतात. सुकलेली पाने टपाटप खाली ओघळत राहतात. मधुनच पक्ष्याचा एक भलामोठा थवा झाडावर येऊन विसावतो. माझी झोप चाळवली जाते. कान टवकारुन मी ईकडे तिकडे बघतो.भयाण काळोखात चमकणारे दोन डोळे दिसतात. डोळे विस्फारुन मी त्यांच्याकडे पाहतो. तो पक्या, गब्र्या कि सुशी याचा अंदाज लागत नाहीये. कि अजुन काही निराळचं प्रकरण. ओळख पटवण्यासाठी मी बसुनच तालासुरात लांबलचक साद घालतो. प्रत्युतरादाखल सतराशेसाठ केविलवाण्या किंकाळ्या माझ्यावर येऊन आदळतात. त्यांचे प्रतिध्वनी गावशिवारात घुमत राहतात. हा अंधारातला राक्षस आज माझ्याकडे दैत्यासारखा नजर रोखून पाहतोय. मी उठतो. दबकत दबकत चालत जाऊन त्याचा कानोसा घेतो. त्याच्या अगदीच जवळ जायचे धाडस माझ्याकडे नाही. मी भिंतीचा आधार घेत तिकडे डोकावतो. आणि ते डोळे माझ्याकडेच वळतात. माझा थरकाप उडतो. तोंडातून आवाजही बाहेर पडत नाही. लूत मारल्यासारखा मी तसाच कितीतरी वेळ घाबरुन ऊभा राहतो. आता मात्र मी पाठीमागून वार करायचे ठरवतो. विहीरीला वळसा घालून ओढ्यात उतरतो. आवाज न करता हळूहळू पुढे चालत राहतो. प्रसंग बाका असतो. अशावेळी दोस्त नेहमी धावून येतात, पण यावेळी त्यांनी टांग दिली. मात्र ऐनवेळी माझ्या हाकेला ओ देतील याची पक्की खात्री होती. मग मी पुढे जातच राहतो. कडुलिंबाच्या झाडाखाली एक गोठा होता. ईथेच तो दैत्य असावा. जरा जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर अचानक काहितरी धडपड करुन जागेवरुन ऊठलं. मग एक जोरदार हंबरडा. ते दोन डोळेही माझ्याकडे रोखले गेले. ही तर म्हैस निघाली. पुन्हा एकदा मी तिथे तसाच सुन्न डोक्याने ऊभा राहतो. साली ही म्हसरंसुध्दा आम्हाला घाबरवून सोडतात. खाली माग घालून मी निराश हताश मनाने परत वडाखाली येतो. अंग झाडतो. बुंधा गाठतो. आणि पुन्हा एकदा सुक्ष्मात निजतो.
जव्हेरगंज

In reply to by जेपी

च्यामारी !! पण मी कुठेच प्रकाशित केलं नव्हतं. SO,
नेशन वॉन्ट्स टू नो
व्हेअर यू हॅव रीड धीस !!
06/03/2016 - 17:57 Permalink
जेपी

In reply to by जव्हेरगंज

जव्हेरगंज साहेब, अश्या प्रकारची कथा मिपावर लिहीली होती अस वाटतय.. मी वाचली होती अस ही वाटतय.. कदाचीत मला भ्रम झाला असेल... चुभुदेघे... बाकी चालु द्या..
06/03/2016 - 18:54 Permalink
नीलमोहर

In reply to by जेपी

वाचलीय असे वाटतेय मलाही, कुठे तेही आठवतंय पण.. जाऊ दे :)
07/03/2016 - 12:01 Permalink
जव्हेरगंज

In reply to by नीलमोहर

जाऊ दे :)
जाऊ दे कसं !! सांगा सांगा कुठे वाचलतं ते !! :)
07/03/2016 - 18:12 Permalink
गामा पैलवान

जव्हेरगंज, नेहमीप्रमाणे कथा झकास आहे. पण प्रत्ययी नाही. का ते कळले असेलंच! ;-) आ.न., -गा.पै.
07/03/2016 - 03:12 Permalink
नाखु

दिवसा तुम्ही आम्हाला म्हसरांवर लक्ष्य ठिवायला सांगता, अन सोत्ता त्यांच्याव रात्री लक्ष्य ठिवता हे वागनं बरं नव्हं !!! त्या म्हसरांना (रात्री तरी) काय निवांतपणा नको का जरा !!! मिपावरच्या (अजब-गजब) प्राण्यांच्या सानिद्ध्यातला नाखुस मिपाकरवाला
07/03/2016 - 11:48 Permalink