दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

सतिश पाटील's picture
सतिश पाटील in भटकंती
24 Sep 2015 - 3:33 pm

पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर,मनाली,लेह,कारगिल,श्रीनगर,जम्मू.

सकाळी सकाळी शिव्यांच्या आवाजानेच जाग आली, खूप मुश्किलीने डोळे उघडले आणि मनगटाच्या घड्याळात पहिले तर सकाळचे ७-१५ वाजले होते, खालच्या बर्थवरचे बाबा आणि जुली दोघे गायब. कुठेले तरी स्टेशन आले होते आणि तो फेरीवाला बोंबलत होता " ले वडे ले वडे गरम गरम वडे लो वडे आलू के वडे लो वडे".
कोण कोणाला शिव्या घालत होते याचा उलगडा झाला.
वरच्या बर्थवरून खाली टून्नकण उडी मारली आणि खिडकीतून बाहेर पाहू लागलो तर ते दोघेही बाहेर स्टेशनवर फोटो काढत बसले होते. ट्रेन सुरु झाल्यावर ते परत आत आले आणि मी परत वर जाऊन झोपलो. गुलाबी थंडीत छान झोप लागली.

..
अनुक्रमे-बाबा चमत्कार आणि जुली

थोड्या वेळाने पुन्हा शिव्यांचा आवाज ऐकू येऊ लागला, पुन्हा कोणीतरी फेरीवाला लोकांना वडे घ्या म्हणून दरडावत असेल असे वाटून मी कूस बदलून झोपलो, तर कोणीतरी मालाच अस्सालीखीत मराठीत शिव्या घालत असल्याचे कानावर पडले, वळून खाली पहिले तर तर ते जुली आणि बाबा मलाच शिव्या घालत होते, "उठ भडव्या, किती झोपतोस ११ वाजलेत, काल रात्री झोपलायस १२ वाजता, उठ आता आणि बाहेर बघ किती मस्त शेती वेगैरे आहे".
शेती निदान माझ्यासाठी तरी नवीन न्हवती, आणि ती पाहण्यासाठी स्वतःची झोपमोड करून घ्यायची माझी मुळीच इच्छा न्हवती, तरीसुद्धा मला पडणाऱ्या शिव्या लोकांनी ऐकू नये म्हणून शिव्यांची परतफेड करतच उठलो.

पोहे सामोसे असा नाश्ता समोर तयारच होता, त्याच्यवर ताव वेगैरे मारून झाला. थोड्या वेळाने आजपासून आम्ही आणि स्पेशाली मी काय काय करायचे आणि काय काय करायचे नाही याची आठवण ते दोघे मला करून देऊ लागले. जुली मला समजावत होता, " आपण फिरायला जातोय तेव्हा नवीन ठिकाणी मारामाऱ्या करायच्या नाहीत," मी गुणी बाळासारखी मान डोलावली, "भांडणे वेगैरे करायचे नाहीत" मी पुन्हा पुन्हा मान डोलावली, "पोलिसांशी तर आजिबातच नाही," मी पुन्हा पुन्हा मान डोलावली, "आणि आधी गेल्या गेल्या तू तुझ्या गाडीची मराठी नंबरप्लेट बदलणार आहेस." मी मान डोलावली नाही. " पप्या नाटकं नको करूस उगाच, आपल्या महाराष्ट्राची हद्द संपली, कोणी तिकडच्या पोलिसांनी अडवून विचारले तर काय सांगणार आहेस त्याला? तू उगाच म्याटर करणार.आणि आर्मी ने अडवले तर ते गोळ्याच घालतील भांडण केलेस तर त्यांच्याशी."

मी म्हटले " म्याटर नाही करणार मी,विंग्रजी नंबर प्लेट मी क्यारी केलीये, कोणी आक्षेप घेतलाच तर मी जागेवर बदलेन, आणि आर्मी अश्या नंबरप्लेटच्या वेगैरे भानगडीत पडत नाही. "जुलीचे काहीसे समाधान झाले, बाबा मात्र उगाच वरच्या बर्थवर बसून दात काढत होता .
दुपारी गुलाबी थंडी जाऊन गर्मी जाणवू लागली. अंग चिकट व्हायला लागले, डोक्यात खाज यायला लागली, तोंड काळपट झाले होते, आमचे चेहरे भिकाऱ्यासारखे दिसत होते, अंगात कपडे तरी निदान बरे होते म्हणून आत्मविश्वास टिकून होता. फेरीवाले, भिकारी, छक्के, आणि आम्ही यांच्यामुळे ट्रेनचा डबा एखाद्या मार्केट सारखा झाला होता. परतीचे तिकीटसुद्धा नोन एसी होते ते आम्ही तिथेच बसून ३ एसी करून घेतले. दिवसभर आता बसून काय करायचे, कंटाळा येत होता, माझ्या डोक्यात एक आयडिया आली.

संध्याकाळी गळा शेकायचा प्लान केला, "पण बंदोबस्त करायचा कुठून? " बाबा मला विचारात होता. मी म्हटले "मी करतो बंदोबस्त."

कालपासून प्यांट्रीचा एका अपंग फेरीवाल्याला मी हेरले होते, तो जे काही घेऊन यायचा ते आम्ही विकत घेत होतो, त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तो प्रत्येक गोष्ट आमच्या पुढ्यात आणून ठेवत होता आणि आम्ही ते घेत असू. त्यालाच दुपारी कोपच्यात घेतले आधी तो " नाही साब मै ऐसा कूच नाही करता ऐसा किधर होता ही क्या" म्हणत ढाचे देत होता, नंतर तयार झाला. कोडवर्ड होता "" आयीस्क्रीम""
जुली मात्र अस कस शक्य आहे विचारात होता, " या देशात बांगलादेशींना भारताचे नागरिक म्हणून २-२ पासपोर्ट मिळतात तिथे हे काय अशक्य आहे " तेव्हा जुलीने मान डोलावली.

मथुरा आग्रा दिल्ली जवळ यायला लागली तशी सामानाची खबरदारी घ्यायला लागलो. उद्या सकाळीच १५ ऑगस्टला आपण अमृतसर ला पोहोचणार तेव्हा काय मस्त माहोल असेल तिकडे अश्या कल्पना करायला लागलो, सगळीकडे देशभक्तीपर गाणी वेगैरे लागली असतील, भारताचे तिरंगे असतील जिकडे तिकडे मस्त मज्जा येईल.

अंधार पडला साधारण ९ वाजले असतील, ट्रेन बऱ्यापैकी रिकामी झाली होती, तो फेरीवाला आला, त्याच्या हातात एक पाटी होती आणि त्यात एक रुमाल, त्यारुमालाखाली त्याने आमचे " आयीस्क्रीम " आणले होते, तो जवळ आला आणि बोंबलायला लागला "आयीस्क्रीम लो साब, " तेव्हा बाबा वरच्या बर्थ्मधून खाली पाहत म्हणाला " अरे इसमे तो मथुरा का पेठा ही तू आयीस्क्रीम कायको बोलता ही इसको" तेव्हा आजूबाजूचे लोक आमच्याकडे आणि त्या फेरीवाल्याकडे पाहायला लागले. तसा तो थरथरायला लागला, जुलीने बाबाच्या पायाला मजबूत चिमटा काढला म्हणाला "गप्प बस रे तू जरा, हे आयीस्क्रीमच आहे." आयीस्क्रीम हे कोडवर्ड आहे बाबाला माहीतच न्हवते

" आयीस्क्रीम खाता खाता आमचे हावभाव बदलले, आम्ही सोडून बाकीचा डबा झोपला होता, आणि आम्ही फिदीफिदी हसत होतो, महिफ़िलच जमवली होती आम्ही गपचूप.
मग समोरचा म्हातारा हळूच तोंडावरची चादर बाजूला करून पाहत होता, त्याला समजले होते कि कूच तो गडबड जरूर है.
मग मी त्या म्हाताऱ्याची आणि त्या सोबत असलेल्या म्ह्तारीची मिमिक्री त्याच्यासमोरच सुरु केली तसा तो पुन्हा झोपी गेला.( किंवा त्याने तशी अक्टिंग केली.) मिमिक्रीमध्ये मग मग बरेच लोक येउन गेले.
जेवण वेगैरे करून मी पुन्हा वरच्या बर्थवर झोपायला गेलो, बाबा घोरत पडला होता बाजूच्या बर्थवर, जुलीने पुन्हा सोशल नेट्वर्किंग मध्ये तोंड घातले.

आता काही तासातच आम्ही पोहोचणार होतो अमृतसरला.

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

24 Sep 2015 - 3:35 pm | बाबा योगिराज

दूसरा भाग टाकायला जरासा उशिरच झालाय.
पुभाप्र.

सतिश पाटील's picture

1 Oct 2015 - 5:38 pm | सतिश पाटील

योगी भाऊ, फोटो चिकटवणे आणि लिंक देण्याबाबत आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

बाबा योगिराज's picture

1 Oct 2015 - 7:17 pm | बाबा योगिराज

पुढील भाग लवकर येऊ द्या

प्रचेतस's picture

24 Sep 2015 - 5:14 pm | प्रचेतस

दुसरा फ़ोटू पाहून एकचक्रा नगरीतले दृश्य डोळ्यांसमोर आले.

मांत्रिक's picture

20 Oct 2015 - 8:12 pm | मांत्रिक

अगदी अगदी!!!

मीउमेश's picture

19 Oct 2015 - 4:10 pm | मीउमेश

पुढील भाग लवकर येऊ द्या

बाबा योगिराज's picture

20 Oct 2015 - 12:00 am | बाबा योगिराज

पाचवा दिवस उजाडला व्हता का नव्हता???

असंका's picture

20 Oct 2015 - 8:31 am | असंका

+१

पैसा's picture

20 Oct 2015 - 8:05 pm | पैसा

चांगलं लिहिता भाऊ, पण अनोळखी लोकांची मिमिक्री काय पटली नाय!