तर्राट

खटासि खट's picture
खटासि खट in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 6:59 pm

नमस्कार

आम्ही एक सिनेमा बनवत आहोत ज्याचे नाव आहे तर्राट. हा एका सामाजिक विषयाला ब ब .. वाचा फोडणारा सिनेमा असेल. सिनेमा बनवण्यासाठी जुळवाजुळव सुरू आहे. आपल्या मिपावर अनेक गुणी, होतकरू, सहृदय, ज्ञानी लोक आहेत. यातूनच तर्राटची टीम बनवावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. खालील डिपार्टमेंट मधे भरती करणे आहे. आपापला कौशल्याधारित बायोडेटा व्यनीतून पाठवावा. आणि आपणास काय येते याची झलक म्हणून प्रतिसादातून गुण उधळावेत ही नम्र विनंती

१. कथा - गरजू लेखकांनी तर्राट या विषयाला न्याय देईल अशी संवेदनशील कथा लिहावी. अनेकांनी मिळून लिहीली तर प्रत्येकाला संधी मिळेल (मानधनाचे नंतर पाहू).

संस्कृतीकलामौजमजाविरंगुळा

सविता कोर्कू... भाग - २ शेवटचा.

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 6:03 pm

सविता कोर्कू... भाग - १
दुसरा लिहून झालाय आत्ताच. म्हणून लगेचच टाकला आहे... :-)
....‘‘देशमुख, मी म्हणतो तुम्ही कशाला असल्या मित्रांच्या नादी लागता ? तुमच्या गावात शेतीवाडी असेल ना ? ती कसा, सुखात रहा. या अशा वागण्यात तुमचे काही भले नाही...!’’

त्याच्या नजरेत काहीतरी वेगळीच चमक दिसली मला. तो एकदम म्हणाला, ‘काका मी फौजेत भरती होणार बस्स !’’ असे म्हणून तो उठला आणि एकदम चालू लागला......

थोड्याच वेळात सविता आली. मी तिला काय घडले ते सांगितले.

कथाविरंगुळा

सैराट

समीर_happy go lucky's picture
समीर_happy go lucky in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 5:58 pm

मराठी चित्रपटांना लोकाश्रय मिळत नाही यासम सूर आपण बरेचदा बघतो आणि तो खराही असल्याचे तिकीट काढताना बरेचदा अनुभवतो पण बरेच काळानंतर किंबहुना काही वर्षानंतर एक असा मराठी सिनेमा आलेला आहे जो रिलीज होण्याच्या ९ दिवसानंतरही त्याचे तिकीट मिळत नाहीये. अक्षरश: प्रचंड लोकाश्रय सर्व वयोगटातून मिळालेला एक मराठी सिनेमा. बजरंगी भाईजान नंतर कोणत्याही सिनेमाचे तिकीट मिळण्यासाठी इतकी ईर्ष्या पहिल्यांदा अनुभवली लेख लिहिणार्याने आणि मराठीसाठी तर पहिल्यांदाच. त्यामुळे बाकी सगळे जाऊ द्या पण लेखक-दिग्दर्शक-निर्माते नागराज मंजूळेन्चे त्यासाठी विशेष अभिनंदन.

चित्रपटसमीक्षा

शृंगार १३

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 5:43 pm

दुस-याला काही शिकवणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे स्वतः दोनदा शिकणे अस म्हणतात . याचाच प्रत्यय यायला लागला होता . मलाही आता त्या सामाजिक कोप-याची गरज भासू लागली होती . याची सुरूवात सोसायटीमधून करायच ठरवल . ज्यांची थोडीफार तोंडओळख होती त्यांना जाता-येता स्माईल द्यायला सुरूवात केली . हळूहळू त्याला प्रतिउत्तरही मिळू लागल . ज्या लोकांशी थोडस बोलत होतो त्यांच्याशी संवाद थोडा वाढवला . सुरूवातीला बोलायला काही विषयच नाही सुचायचा पण अगदी जनरल टॉपिक पासून सुरूवात करून मग हळूहळू टॉपिक मिळू लागले . जितके वाटतात तितके लोक रूक्ष अबोल नसतात . फक्त एका स्टार्टरची गरज असते त्यांना .

कथा

श्वानांचे प्रेम

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 2:56 pm

तस पाहिलं तर कुत्रा या प्राण्याबद्दल मला फारस कधी प्रेम नव्हत . पण या प्राण्याला माझ्याबद्दल नेहमी प्रेम वाटत आलेले आहे . पूर्वी अगदी फार भुंकणारे कुत्रेहि मला भुंकत नसत . याच कारण काही माहित नाही . पण बहुधा माझा अंधविश्वास याला कारणीभूत असावा असे वाटते . मला असे वाटायचे कि आपण जीन्स घातली

कथालेख

सैराट - याड लागलं!

समीरसूर's picture
समीरसूर in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 2:35 pm

'सैराट'वर सध्या बरीच चर्चा होतेय. माझे मत नोंदवण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून हा लेख-प्रपंच! आता हा विषय चघळून कंटाळा आला असल्यास क्षमस्व. लेख उडवला तरी नो हरकत!

चित्रपटसमीक्षा

आधार संलग्न डिजिटल वॉलेट - फसवणूक करणा-यांसाठी खजिना

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
9 May 2016 - 12:44 pm

‘डिजिटल वॉलेट’ हे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैसे अदा करण्याची एक प्रणाली आहे. ही सेवा पुरवणा-या कंपन्या आकर्षक जाहिरातींद्वारे आपले आधार संलग्न बँक खाते या प्रणालीशी जोडण्याचे आवाहन करतात. अशा प्रकारची खाती उघडण्यासाठी लागणारे कागदपत्रं फार नाहीत, तसेच फार काही माहितीही द्यावी लागत नाही. याचाच फायदा घेऊन काही ‘सुपीक’ डोक्याच्या ठगांनी याचा गैरवापर केला.

धोरणमांडणीवावरसमाजजीवनमानअर्थकारणप्रकटनअनुभवमाहिती

आखाजीना सन

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 May 2016 - 12:08 pm

खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -

नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू

माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात

आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार

गवराई चला ग मांडूया
पुजा तिची करूया

आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे

माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे

(अहीराणी भाषेवर एवढी हुकूमत नसल्याने चुकभूल द्या घ्या)
- पाभे

मुक्त कविताकविताभाषासमाजजीवनमान

आखाजीचा सण

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 May 2016 - 11:45 am

गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला

सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या

आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो

माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या

कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे

नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही

- पाभे

भावकविताकवितासमाजजीवनमान

समरस व्हावे ऐसे

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2016 - 10:49 am

थांबल्या पळी या प्रेमाच्या
क्षण एक तू डोळ्यांत पहा
कृत्रीमतेचा उतरवून साज
रेशमी मिठीत सजून पहा

दे शब्दांना आधार तुझ्या
गंधीत मौनाच्या साथीचा
दे स्पर्श पुन्हा हळुवारपणे
थरथरत्या हळव्या अधरांचा

शीतल छाया, मी घनदाट तरू
तू वळणारी खळखळ सरिता
मी एक डोलता प्राण अचल
तुज पाहून, अविचल वाहता

मी धागा अतूट प्रितीचा
तू फूल एक नाजूकसे
गुंफता प्रित, गुंतता हृदय
प्रेममाला सुरेख शोभतसे

परिणीती, धुंद श्वासांची
लयदार काव्यात व्हावी
सूर जुळता ही तमवसने
कोमल स्वरात न्हावी

कविता माझीप्रेम कविताभावकविताशांतरससंस्कृतीकलावाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिक