आखाजीचा सण
गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला
सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या
आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो
माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्या लगडल्या
कैरी हाले कैरी डुले वार्यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे
नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही
- पाभे
क्या बात है पाभे...!! मस्तच.
वा! फार छान कविता.
मस्तच की पाभेराव. मस्त मस्त.
आवडली, वसंतात झाडांना झोके
मस्त !
आवडेश.
पाभे
छानच !
मस्तच!
क्या बात!!
कविता आवडली ..
चैत्रा गौरी असेल
मस्तं!