अंदमानातले काळे पाणी,
कोलूबेड्याहंटरकदान्न
सोबत तीव्र अपमानाचा overtime !
साम्राज्याचा उग्र दर्प अन
देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा.......
असे सगळे, अन वरती थोडी
जयहिंदची जाळी !
या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही,
काही काही रक्तांचे
malnourishment कि काय ते झालेच नाही!
उलट,
तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही
त्यांच्या जहालहळव्या लेखणीने
cultured झाल्या!
मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी,
.
.
.
दुसरं काय होता
एकांत म्हणजे तरी!
- शिवकन्या
वाचने
4694
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार सुरेख! वेगळी कल्पना आवडली
+१
In reply to फार सुरेख! वेगळी कल्पना आवडली by रातराणी
सहमत!
In reply to फार सुरेख! वेगळी कल्पना आवडली by रातराणी
फार सुंदर.
प्रभावी,
अतिशय सुरेख!
या मालेतील सर्वच कविता सुंदर आहेत,सहमत आहे.