मनाचा एकांत - ब्लड

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
20 Aug 2016 - 2:21 pm

'ब्लड आहे..... फास्ट सोडून नाही चालत!'
मऊ शीर, तीक्ष्ण सुई
लक्क काळीज, डोळ्यात पाणी
थंड एसी, मंद दिवे
पांढऱ्या भिंती, एकट रात्री!
तासाला थेंबभर या गतीने
ठि ब क ते रक्त रात्रभर....
जखडलेल्या शरीराने
श्रमलेल्या डोळ्यांनी
हुं कि चू न करता
बघत राहतो आपण
रक्ताची journey........
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

-- शिवकन्या

कविता माझीकाणकोणकरुणमांडणीवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमानऔषधोपचार

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 2:40 pm | किसन शिंदे

हा इस्पितळातल्या खाटेवरचा एकान्त आहे का?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Aug 2016 - 12:11 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट कल्पना...

अभ्या..'s picture

22 Aug 2016 - 1:42 pm | अभ्या..

हे बेक्कार असतं.
.
म्या काढलाय असला १५ दिवसाचा एकांत.

चांदणे संदीप's picture

22 Aug 2016 - 2:39 pm | चांदणे संदीप

पण एकांत म्हणजे अजून बरंच काही असत! सो मेरकू कूच जम्या नै!

Sandy