णमस्कार्स मंडली ,
सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे.
दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है ..
"चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..."
व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच !