Skip to main content

वावर

महामहोपाध्याय, जैन आणि अंगवस्त्र

लेखक भडकमकर मास्तर यांनी रविवार, 17/04/2011 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
अशोक जैन.. एक ज्येष्ठ वगैरे पत्रकार.... सर्व साहित्यिक वगैरे मंडळींचे पाय कसे मातीचेच असतात हे सांगणारे त्यांचा एका दिवाळी अंकातला लेख मित्राने खास रेकमेंड केल्याचे स्मरते... बर्‍याच थोरांची टर उडवणारा तो गंमतीदार लेख आवडला होता...

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

फोरिनची पाटलीण

लेखक मृत्युन्जय यांनी बुधवार, 13/04/2011 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक तृप्तीचा ढेकर देउन शंकरराव पाटावरुन उठले आणि ओसरीवर येउन बसले. आता एकेक करत मंडळी येतील आणि दुपारचा चहा होइस्तोवर पंचायतीची कामं उरकुन घेता येतील असा शंकररावांचा कयास होता. शंकररावांकडे तशी गावची पाटीलकी पिढीजात होती त्यात सरपंचपद पण त्यांच्याकडेच होते. त्यामुळे ते गावात आब राखुन होते. वर्षाकाठी एकदा पालकमंत्री, शिक्षणमंत्री गावच्या शाळेला भेट देउन जातील याकडे ते जातीने लक्ष घालत त्यामुळे आजुबाजुच्या गावांमध्ये पण त्यांचा वट होता.

मेघस्पर्षी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/04/2011 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळचा ७.३० चा गजर झाला आणि "तो" नाइलाजाने उठला. त्या आधी सव्वासातचा आणि सातचा गजरही वाजुन बंद झाला होता. कुंभकर्णापुढे नगारे वाजवले तरी तो उठणार नाही हे सरावाने माहिती झाल्यामुळे घरच्यांनीही दुर्लक्ष केले. उठताना त्याचा हात चुकुन उशीला लागला आणि स्वतःचीच लाळ हाताला लागली. झोपताना खंडाळ्याच्या बोगद्यासारखे सताड उघडे असलेले तोंड, त्यातुन आघाडीच्या सरकारमधुन आतबाहेर करणार्‍या प्रादेशिक पक्षांसारखे आतबाहेर करणारे डास आणि तोडातुन लिटर दीड लिटर बाहेर पडणारी लाळ या सगळ्याचीच त्याला किळस यायची. स्वतः बद्दल त्याला न आवडणार्‍या अनेक गोष्टींपैकी ती एक होती.

उमलू द्या कळ्यांना : लहान मुलांचे शोषण, माहिती, खबरदारी व कायदा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 10/04/2011 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
''मुले म्हणजे देवाघरची फुले'' या उक्तीला लाजिरवाणी, न साजेशी अपकृत्ये जेव्हा भोवतालच्या समाजात घडून येताना आढळतात तेव्हा मुलांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेणार्‍या, त्यांना कुस्करणार्‍या कुप्रवृत्तींचा राग आल्यावाचून राहवत नाही. परंतु कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर हे विषय उघडपणे मांडणे हेही अनेकदा निषिध्द मानले जाते. अतिशय गंभीर अशा ह्या विषयावर घरात किंवा घराबाहेरही चर्चाविचार करण्यास लोक अनुत्सुक दिसतात. ''माझा काय संबंध?'' ह्या प्रवृत्तीपासून ते ''असले विषय दूर राहिलेलेच बरे'' इथपर्यंत असलेली सामाजिक उदासीनता कायदा व सुव्यवस्थेला आणि समाजाला घातकच ठरते.

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 07/04/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल. ----------------------------------------------------------- दि.

तीचे डोळे

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 04/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते. ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले. ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते.

रविवारी भल्या सकाळी

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/02/2011 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : सकाळी ७:०० वाजता स्थळ : एका तारांकित हॉटेलातील कॉफी शॉप वार : रविवार काचेच्या एका भल्या मोठ्या फ्रेंच विंडोजवळची दोन - तीन टेबले पकडून गुबगुबीत सोफ्याच्या आणि मखमली खुर्च्यांच्या आत रुतलेले अस्मादिक. आजूबाजूला स्वतःला आजही तरुण म्हणवून घेणार्‍या एके काळच्या सहाध्यायांचे नळकोंडाळे. बहुतेकांच्या चेहर्‍यावर रविवारी भल्या पारी उठायला लागल्याची उद्विग्नता. कोणी पालथ्या हाताने तोंड झाकून जांभई दडपतंय तर कोणी नाक चिमटीत पकडून बसलंय. अजून डोळ्यांवरची झापड गेली नसल्याने वातावरणात एक प्रकारचे चिंतनशील झोपाळू स्पंदन!